खमंग उडीद वडा आणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच परफेक्ट उडीद वडा, त्यासोबत  चटणी.
बाहेरून खुसखुशीत, आतून जाळीदार आणि हलका असा हा वडा अगदी घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण सविस्तर पाहणार आहोत.


 *आवश्यक साहित्य :

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

*उडीद वडा बनविण्यासाठी

  • उडीद डाळ – 4 वाटी

  • मीठ – चवीनुसार

  • थोडं पाणी (गरजेनुसार, कमीत कमी वापरायचं)

  • तेल – तळण्यासाठी

  • (ऐच्छिक) बारीक चिरलेला कांदा, जिरं

    • नारळाचे काप – आवडीनुसार

*चटणीसाठी आवश्यक साहित्य:

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

  • ओला नारळ – १ कप

  • हिरव्या मिरच्या – ३ ते ४

  • थोडं आलं आणि लसणाची पाकळी

  • डाळवं (भिजवलेली चणाडाळ देखील चालेल) – १ टेबलस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • कोथिंबीर – थोडीशी (ऐच्छिक)

  • पुदिन्याची पाने-थोडीशी (ऐच्छिक)
  • फोडणीसाठी – मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, सुक्या मिरच्या

  • दही दोन चमचे

*उडीद वडा बनवण्याची कृती:

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

  1. डाळ भिजवणे
    खमंग उडीद वडा रेसिपी बनविण्यासाठी सुरुवातीला उडीद डाळ मोजून घ्या आणि तीन ते चार तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्या डाळीमध्ये दुप्पट पाणी टाकून झाकून ठेवा. उन्हाळ्यामध्ये सहा तास डाळ भिजवली तरी पुरेसे असते. परंतु इतर वेळी आठ ते नऊ तास डाळ भिजवून द्यावी.
    डाळ जास्त वेळ भिजवू नका – ओव्हरसोक झाली की वडा तेलकट होतो.

  2. डाळ वाटणे
    भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या.डाळ बारीक होत नसेल तर किंचित पाणी टाका.
    त्यामुळे पीठ चांगले अंबवले जाते म्हणजेच पीठ थोडेसे फुगून वर येते आणि त्यामुळे वडे हलके होतात आणि तळताना जास्त तेल शोषून घेत नाही.

  3. मिश्रण फेटणे
    वाटलेली डाळ एका भांड्यात काढा, त्यात मीठ घाला आणि हाताने किंवा चमच्याने ७–८ मिनिटे हलवून फेटा.
    यामुळे मिश्रण हलकं होतं आणि वडे जाळीदार बनतात.

  4. वडे तयार करणे
    वडे करताना डिश मध्ये पाणी घ्या व दोन्ही हाताला पाणी लावून वड्याच्या पिठाचा गोळा एका हातावर ठेवून दुसऱ्या हाताने त्याला गोलाकार बनवा आणि मध्ये त्याला छोटेसे बोटाने छिद्र पाडा. हाताला पाणी लावल्यामुळे वडा हाताला चिकटत नाही.नंतर हा वडा अलगद गरम तेलात सोडा.

  5. तळणे
    वडे तळताना सुरुवातीला कढईमध्ये पुरेशा प्रमाणात तेल घेऊन ते मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आणि नंतर त्या तेलामध्ये आपण बनवलेला वडा हळुवार सोडायचा. एकावेळी दोन ते तीन वडे तुम्ही एकत्रितपणे तळू शकता तळताना वडे मोठ्या चमच्याच्या साहाय्याने खालीवर करायचे व हलकासा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा आणि टिश्यूवर काढा.


🥥 चटणी बनवण्याची कृती:

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

  1. मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळ, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, डाळवं,दोन चमचे दहीआणि मीठ घालून पाणी न घालता दळा.

  2. नंतर थोडं पाणी घालून सरसरीत चटणी तयार करा.

  3. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून मोहरी तडतडली की त्याची गरम  फोडणी करून चटणीवर ओता – खमंग चव येईल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


 परफेक्ट उडीद वडा बनवण्याच्या खास टिप्स

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

  1. उडीद डाळ ओव्हरनाईट भिजवू नका.

  2. वाटताना पाण्याचा वापर कमीत कमी करा.

  3. मिश्रण छान फेटल्याने वडे हलके आणि जाळीदार होतात.

  4. खायचा सोडा अजिबात घालू नका.

  5. तेल गरम असावं पण जळणार नाही इतकं.

  6. मंद आचेवर वडे तळू नका

  7. वडे टिश्यूवर ठेवून तेल निथळू द्या.


अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

🍽 सर्व्हिंग आयडिया

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

गरमागरम वडे प्लेटमध्ये ठेवा, त्यावर गरम सांबर ओता, बाजूला नारळाची चटणी घाला.
एक घास घेतल्यावर क्रिस्पी टेक्स्चर, सांबरचा झणझणीत स्वाद आणि चटणीचा खमंगपणा — परफेक्ट कॉम्बिनेशन!

थोडक्यात माहिती:

उडीद वड्याचा उगम दक्षिण भारतात झाला. विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटक येथे हा पदार्थ लोकप्रिय आहे. हॉटेल, उपहारगृह, मंदिर प्रसाद किंवा घरगुती न्याहारीत हा नियमित केला जातो.

उडीद वडा हा दक्षिण भारतीय पारंपरिक खाद्यप्रकार आहे. त्याला मेदा वडा / मेदू वडा / उडदाचा वडा असेही म्हणतात. हा वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. साधारणपणे सांबार आणि नारळ चटणीसोबत खाण्यात येतो.

उडीद वड्यात प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स व ऊर्जा असते. तळलेला पदार्थ असल्याने कॅलरी थोडी जास्त असते पण ऊर्जा देणारा व पोटभरणारा असतो.

कॉम्बिनेशन आयडिया:

खमंग उडीद वडाआणि चटणी रेसिपी|udidvada recipe2025

प्रत्येकाच्या आवडीनुसार उडीद वडा किंवा मेदुवडा वेगवेगळ्या वेगवेगळे प्रकार असतात, जसे की

  • वडा सांबार

  • वडा सांबार रसम

  • दही वडा (Curd Vada)

  • वडा पाव-स्टाईल (फ्युजन)

  • वडा कट (सांबारवर वडा कट करून)



Leave a Comment