“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
“वडापाव” हा महाराष्ट्राच्या रस्त्यांवरचा जीवंतपणा सांगणारा, प्रत्येकाला भुरळ घालणारा आणि अगदी साधेपणातही अप्रतिम चव देणारा पदार्थ आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वेळ कमी असला, तरी पोट भरायलाही आणि मन तृप्त करायलाही हा “मराठी बर्गर” कोणालाही कधीच निराश करत नाही. ऑफिसला धावणारा माणूस असो किंवा कॉलेजला जाणारा विद्यार्थी, स्टेशनसमोर उभा असलेला छोटासा टपरीवाला असो किंवा रात्री उशिरापर्यंत चालणारी स्ट्रीट फूड गाड्यांची रांग — “वडापाव” सर्वत्र दिसतो, आणि सर्वांना आवडतो.
“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, मसालेदार बटाट्याच्या वड्याचा प्रत्येक घास हा महाराष्ट्राच्या चवीची आठवण करून देतो. त्यासोबत लसूण चटणीने येणारा तिखटपणा, हिरव्या चटणीची तजेलदार चव किंवा मग मीठ लावून तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि गरम पावाचा मऊपणा — म्हणजेच आपला “वडापाव”
वडापाव बनविण्याचे साहित्य :
“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
१) बटाटे वडा:
- बटाटे उकडलेले – 4 ते ५ मध्यम
- हिरव्या मिरच्या – 2-3 (बारीक)
- आलं-लसूण पेस्ट – 1 चमचा
- हळद – ½ चमचा
- मोहरी – ½ चमचा
- कढीपत्ता – 6-7 पाने
- हिंग – चिमूटभर
- कोथिंबीर – 2 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – फोडणीसाठी
२) बेसनाचं पिठ (कव्हर)
- बेसन – 1 कप
- हळद – ¼ चमचा
- लाल तिखट – ½ चमचा
- मीठ – चवीनुसार
- बेकिंग सोडा – चिमूटभर
- पाणी – आवश्यकतेनुसार
- तेल – तळण्यासाठी 3)सर्व्ह करण्यासाठी:
- लादी पाव
- लसूण चटणी
- हिरवी चटणी
- तळलेल्या हिरव्या मिरच्या अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा
कृती:
“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
१) बटाटे वडे करण्यासाठी बटाट्याची भाजी तयार करणे
सुरुवातीला बटाट्याची भाजी करण्यासाठी कढईत थोडे तेल गरम करा.
मोहरी टाकून फोडणी द्या.नंतर कढीपत्ता, हिंग, हिरव्या मिरचीची पेस्ट , आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
हळद घाला आणि लगेच मॅश केलेले बटाटे टाका.
मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.
हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे चपटे गोळे बनवा.
२) बेसनाचे पिठ बनवा
एका बाऊलमध्ये बेसन, हळद, तिखट, मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा.
आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर पिठ तयार करा.
हे पिठ गुठळ्या न होता एकसारखे करून घ्या.
३) बटाटेवडा तळा.
कढईत तेल गरम करा.बटाट्याचे गोळे बनविलेल्या पिठात बुडवून गरम तेलात सोडा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत तळा.
तयार वडे टिशू पेपरवर काढा.
४) वडा पाव सर्व्ह करा
पाव आडवा उघडा.
आवडीनुसार आतून हिरवी चटणी ,बारीक चिरलेला कांदा आणि लसूण चटणी किंवा चिंचपाणी भाजीत लावा.
मध्ये गरम वडा ठेवा.
बाजूला तळलेली हिरवी मिरची ठेवा.
मस्त गरमागरम खा आणि आनंद घ्या!
वडा पाव टिप्स (खास आणि उपयुक्त)
“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
✅ 1) बटाट्याचे मिश्रण परफेक्ट ठेवण्यासाठी
-
बटाटे फार जास्त मऊ शिजवू नका; थोडे firm राहिले तर वडे फुटत नाहीत.
-
बटाटे मॅश करताना फार गुळगुळीत करू नका. थोडे दाणे राहिल्यास चव आणि टेक्स्चर उत्तम येते.
-
हळद आणि हिरव्या मिरचीची चव चांगली यावी म्हणून फोडणी नीट परतून घ्या.
✅ 2) बेसनाच्या पिठासाठी खास टिप्स
-
पिठात एक चमचा गरम तेल (मोहन) टाका — वडे फुलतात आणि खुसखुशीत होतात.
-
पिठ फार पातळ किंवा फार घट्ट नको — मध्यम जाडसर असेल तर कव्हर सुंदर बसते.
-
तळताना पिठ वड्यावर व्यवस्थित कोट होतंय ना ते पाहा.
✅ 3) तळणीसाठी योग्य तापमान
-
तेल मध्यम गरम पाहिजे. जास्त गरम तेलात वडे पटकन काळे होतात आणि आतून कच्चे राहतात.
-
कमी गरम तेलात वडे तेलकट होतात.
-
तापमान तपासण्यासाठी पिठाचा थेंब सोडा — तो वर आला तर तेल योग्य गरम.
✅ 4) वडे फुटू नयेत यासाठी
-
बटाट्याच्या मिश्रणात ओलावा कमी ठेवा.
-
बेसनाचे पिठ जाडसर ठेवा.
-
बटाट्याच्या गोळ्यात भेगा न राहू देऊ नका.
✅ 5) चटणीला खास चव देण्यासाठी
-
लसूण चटणी थोडी भाजल्यास तिचा रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येते.
-
हिरवी चटणी ताजी आणि पातळ करून लावली की वडा पावची चव दुप्पट होते. अधिकृत माहितीसाठी येथे क्लीक करा
“खमंग वडापाव – मुंबईची ओळख, महाराष्ट्राची शान”
आज मोठमोठ्या रेस्टॉरंट्समध्येही वडा पावच्या वेगवेगळ्या स्टाईल्स दिसू लागल्या — चीज वडा पाव, शेजवान वडा पाव, बटर वडा पाव, तंदूरी वडा पाव आणि अजून बरेच काही. परंतु तरीही लोकांच्या मनात स्थान मिळवतो तो साधा, मस्त गरमागरम, पारंपरिक वडा पाव.
हा एक असा पदार्थ आहे जो चवीने, सुगंधाने आणि परंपरेने प्रत्येक मराठी माणसाला जोडतो. रस्त्यावरची टपरी असो किंवा घरात बनवलेला वडा पाव — दोन्हीचा आनंद वेगळाच, आणि आठवणी मात्र कायमच्या मनात घर करून बसतात.
