लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

Table of Contents

लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

दिवाळीचा फराळ म्हणजे प्रत्येक घरात सुगंध, आनंद आणि चव यांचा सुंदर संगम! आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो बेसन वापरून मस्त खमंग, खुसखुशीत लसूण शेव. अतिशय सोपी आणि तरीही तितकीच चविष्ट!

साहित्य (अर्धा किलो बेसनसाठी)

लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

साहित्य प्रमाण
बेसन ½ किलो
तांदळाचे पीठ ½ कप
लसूण (पेस्टसाठी) ¼ कप पाकळ्या
लाल तिखट 1 मोठा चमचा
हळद ½ चमचा
मीठ चवीनुसार
जिरं पूड थोडीशी
खायचा सोडा ¼ चमचा (ऐच्छिक)
तेल तळण्यासाठी
पाणी लसूण पेस्टसाठी (1 कप)

📌 ओवा आवडत असल्यास ½ टीस्पून ओवा पण घालू शकता.
📌 सोडा नसेल तर ¼ कप गरम तेल (मोहन) घाला.

अधिकमाहितीसाठी येथे क्लिक करा

कृती:

लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

1)लसूण पेस्ट तयार करा

सुरुवातीला अर्धी वाटी सोलून घ्यायचा नंतर सोललेला लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून परत ते मिश्रण फिरवून घ्यायचे नंतर गाळणी च्या सहाय्याने ते लसुन पाणी गाळून घ्यायचे या लसूण पाण्याचा उपयोग आपण पीठ मळताना करणार आहोत

2)पीठ मळून घ्या

पीठ मळताना एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा पराती मध्ये बेसन पीठ चाळून घ्यायचे नंतर त्या पिठामध्ये दिलेल्या प्रमाणामध्ये तांदळाचे पीठ ,मीठ,ओवा, जिरेपूड, खायचा सोडा, हळद आणि लाल तिखट घालायचे व नंतर कोरडे असतानाच हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून तेलाचे मोहन घालायचे व नंतर आपण लसना पासून बनविलेले लसणाचे पाणी जे आहे ते थोडे थोडे करून पिठामध्ये टाकायचे आणि पीठ मऊ मळून घ्यायचे पीठ जास्त घट्ट मळायचे नाही आणि मऊ पण मळायचे नाही.

➡️ चकलीपेक्षा शेवचं पीठ मऊ असतं.


3) शेव तळणे:

  • कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन मध्यम आचेवर गरम होऊन द्यायचे.शेव साच्यात पीठ भरून गरम तेलात गोल गोल घाला.गॅस मंद आचेवर ठेवा.शेव तळताना कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन मध्यम आचेवर गरम होऊन द्या शिव तळताना शेव तळताना तेलामध्ये शेव घातली की सुरुवातीला बुडबुडे येतात आणि नंतर शेव तळून होत आली की कमी होतात यावरून आपल्याला समजते की शेव तळून झाली आहे मी नंतर मोठ्या चमच्याच्या साह्याने शेव टिशू पेपरवर काढून घ्यायची.दोन्ही बाजू छान खमंग होईपर्यंत तळा.शेव पूर्ण थंड होऊ द्या.
    हवाबंद डब्यात भरा. १–१.५ महिने टिकते.

खमंग शेव होण्यासाठी स्वाद मॅजिकच्या टिप्स अँड ट्रिक्स :

✅ पीठ मळताना लसणाचं पाणीच वापरल्यामुळे अप्रतिम स्वाद  येतो.
✅ ओवा टाकल्यामुळे  शेव खमंग होते व पचनास ही हलकी असते.
✅ मंद आचेवर तळा — शेव रंग, चव दोन्ही परफेक्ट
✅ जाड किंवा पातळ — साचा/प्लेट बदलून हवी तशी शेव करा.

चवीनुसार,आकारानुसार शेवचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील काही ठराविक प्रकार खाली दिले आहेत:

लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

 

प्रकार घटक पदार्थ
साधी शेव बेसिक मसाल्यांपासून बनवलेली हलकी कुरकुरीत शेव
लसूण शेव लसूण पेस्ट वापरून बनवलेली तिखट व सुगंधी शेव
ओवा शेव ओव्याचा खास सुगंध व पचनास मदत करणारी शेव
मसाला शेव लाल तिखट, हिंग, मसाले घालून केलेली तिखट शेव
लिंबू शेव लिंबाचा आंबटपणा असलेली तोंडाला पाणी आणणारी शेव
मिरी शेव काळी मिरी घालून बनवलेली हलकी तिखट शेव
मेथी शेव मेथी पावडरमुळे किंचित कडू पण खमंग चवीची शेव
पालक शेव पालक प्युरी वापरून बनवलेली हलकी हिरव्या रंगाची शेव
बीट शेव बीट रसामुळे हलकी गोडसर व सुंदर गुलाबी शेव
बटाटा शेव बटाट्यामुळे मऊसर व मुलांना आवडणारी शेव
चीज शेव चीज फ्लेवर असलेली मॉडर्न, किड्स फेव्हरेट शेव
चाट मसाला शेव चाट मसाला वापरून बनवलेली खट्टी-तिखट शेव

आकारानुसार प्रकार आणि उपयोग

लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

प्रकार स्पष्टीकरण
बारीक शेव / Nylon Sev अतिशय पातळ, हलकी आणि स्नॅक्स topping साठी
जाड शेव कुरकुरीत व घट्ट बांधणीची शेव
गाठिया जाड व थोडी मऊसर तुकतुकीत गुजराती शेव
फर्साण शेव मिक्स फर्साणमध्ये वापरली जाणारी खुसखुशीत शेव
बुंदी शेव शेवच्या मिश्रणातून बनलेली लहान गोल बुंदी
पापडी शेव थोडी क्रिस्पी व पापडी सारखी चव
लसूण शेव रेसिपी2025| Lasun shev recipe2025

अशाप्रकारे आपली खमंग कुरकुरीत अशी शेव तयार होते ही शेव आपण दिवाळीच्या पदार्थांसोबत किंवा मग इतर वेळी केली तरी चालते शेव सर्वांची आवडती असते ते आपण चहा सोबत हलका नाश्ता म्हणून घेऊ शकतो किंवा जेव्हा कधी मिसळ करायची असते , भेळ करायची असते तेव्हाही घरगुती शेव वापरू शकतो लहान मुलांना देखील शेव खूप आवडते लहान मुलांच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त आपण करू शकतो आणि घरी केलेले पदार्थ चटपटीत आणि भरपूर दिवस टिकतात

दिवाळीचा फराळ म्हणजे प्रेम, परंपरा आणि चव!
ही लसूणी शेव एकदा करून बघा — घरभर सुगंध, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद!

Leave a Comment