हलके लुसलुशीत कांदे पोहे बनवण्याची सोपी पद्धत | kandepohe recipe2025
कांदेपोहे हा महाराष्ट्रातील एक साधा, पण मनाला भुरळ घालणारा पारंपरिक नाश्ता आहे. सकाळची वेळ असो वा संध्याकाळचा चहा, खमंग शेंगदाणे आणि सुगंधी कढीपत्त्याने फुललेले हे पोहे प्रत्येक घरात आवडीने खाल्ले जातात. हलका, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबात आनंदाने बनवला जातो. ‘कांदा’ आणि ‘पोहे’ यांचा सुंदर संगम म्हणजे कांदे पोहे.अगदी कमी वेळेत घरी असणाऱ्या साहित्यामध्ये होणारा नाष्टा म्हणजे “कांदेपोहे“.
कांदेपोहे रेसिपी साहित्यPerfect कांदेपोहे बनवण्याची सोपी पद्धत | Maharashtrian Kanda Pohe Recipe
-
पोहे – 5 कप
-
कांदा – 1 मोठा (बारीक चिरून)
-
हिरव्या मिरच्या – 2 (चिरून)
-
कढीपत्ता – 8–10 पाने
-
शेंगदाणे – 2 टेबलस्पून
-
रवा/बटाटा (ऐच्छिक)
-
साखर – 1 टीस्पून
-
हळद – ½ टीस्पून
-
मोहरी – ½ टीस्पून
-
जिरे – ¼ टीस्पून
-
मीठ – चवीनुसार
-
लिंबू रस – 1 टेबलस्पून
-
कोथिंबीर – 2 टेबलस्पून (चिरून)
-
तेल – 4 टेबलस्पून
- ओले किसलेले खोबरे अर्धी वाटी(सजावटीसाठी )
- बारीक शेव अर्धी वाटी(आवडीनुसार)
कृती:
हलके लुसलुशीत कांदे पोहे बनवण्याची सोपी पद्धत | kandepohe recipe2025
-
पोहे भिजवणे.सुरुवातीला पाच वाटी पोहे चाळणी मध्ये घेऊन, चाळून घ्यायचे म्हणजे त्यातील बारीक कण निघून जातात नंतर त्यामध्ये पोहे बुडतील एवढे पाणी टाकून पोहे स्वच्छ धुऊन लगेच पाणी निथळू द्यायचे आणि पाच मिनिट झाकून ठेवायचे.
-
फोडणी तयारी करणे. फोडणीसाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या.कढईत तेल गरम करा.मोहरी, जिरे टाकून फोडणी द्या.कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे टाकून परता. नंतर शेंगदाणे तळून झाले की कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता.हळद आणि मीठ घाला आणि नीट मिक्स करा.
-
पोहे घालणे
धुतलेले पोहे कढईत टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा.
झाकण ठेवून 2–3 मिनिटे मंद आचेवर वाफवून द्या.
गॅस बंद करून कोथिंबीर घाला.वरून किसलेलं नारळ आणि बारीक शेव टाकली तर अजून चवदार!Perfect Pohe Tips (मराठीत)
-
जाड पोहे वापरा
-
पातळ पोहे पटकन गळतात आणि चीकट होतात.
-
-
पोहे कमी वेळ धुवा
-
फक्त 5–10 सेकंद पाण्यातून धुवून निथळा.
-
जास्त वेळ भिजवल्याने पोहे मऊ पडतात.
-
-
मीठ + साखर आधी घाला
-
पोहे निथळताना त्यातच मीठ आणि साखर मिसळा.
-
यामुळे चव एकसारखी होते.
-
-
वाफ देणे महत्त्वाचे
-
पॅन झाकून फक्त 2–3 मिनिटं वाफ द्या.
-
जास्त शिजवले तर पोहे कोरडे होतात.
-
-
शेंगदाणे आधी भाजून ठेवा
-
खमंगपणा आणि चव छान येते.
-
-
कांदा गुलाबी होईपर्यंत परता
-
कच्चा राहिला तर चव बिघडते.
-
-
हळद कमी वापरा
-
जास्त हळद घातल्यास चव आणि टेक्स्चर दोन्ही बदलते.
-
-
पाणी कधीही थेट घालू नका
-
पाणी घातल्यास पोहे लगेच चीकट होतात.
-
-
शेवटी लिंबू रस घाला
-
ताजेपणा आणि फ्रेश चव येते.
-
-
सजावट महत्त्वाची
-
कोथिंबीर, नारळ आणि थोडी शेव वरून घातली तर अप्रतिम लागतात.
-
Perfect Pohe Tips (मराठीत)
हलके लुसलुशीत कांदे पोहे बनवण्याची सोपी पद्धत | kandepohe recipe2025
जाड पोहे वापरा
पातळ पोहे पटकन गळतात आणि चीकट होतात.
पोहे कमी वेळ धुवा
फक्त 5–10 सेकंद पाण्यातून धुवून निथळा.
जास्त वेळ भिजवल्याने पोहे मऊ पडतात.
मीठ + साखर आधी घाला
पोहे निथळताना त्यातच मीठ आणि साखर मिसळा.
यामुळे चव एकसारखी होते.
वाफ देणे महत्त्वाचे
पॅन झाकून फक्त 2–3 मिनिटं वाफ द्या.
जास्त शिजवले तर पोहे कोरडे होतात.
शेंगदाणे आधी भाजून ठेवा
खमंगपणा आणि चव छान येते.
कांदा गुलाबी होईपर्यंत परता
कच्चा राहिला तर चव बिघडते.
हळद कमी वापरा
जास्त हळद घातल्यास चव आणि टेक्स्चर दोन्ही बदलते.
पाणी कधीही थेट घालू नका
पाणी घातल्यास पोहे लगेच चीकट होतात.
शेवटी लिंबू रस घाला
ताजेपणा आणि फ्रेश चव येते.
सजावट महत्त्वाची
कोथिंबीर, नारळ आणि थोडी शेव वरून घातली तर अप्रतिम लागतात.
पोहे फार मऊ होऊ नयेत म्हणून जास्त पाणी लावू नये.
बटाटे घालणार असाल तर आधी उकडून परता.
-
महाराष्ट्रीयन पोहेचे प्रकार
-
हलके लुसलुशीत कांदे पोहे बनवण्याची सोपी पद्धत | kandepohe recipe2025
-
प्रकार घटक पदार्थ कांदे पोहे कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे यांसह पारंपरिक प्रकार बटाटे पोहे कांद्यासोबत उकडलेला किंवा तळलेला बटाटा घालून केलेले पोहे तर्री पोहे नागपूर–विदर्भ स्टाईल, मसालेदार तार्रीसोबत सर्व्ह दही पोहे दही मिसळून बनवलेले, उन्हाळ्यात लोकप्रिय चिवडा पोहे भाजून बनवलेले, खुसखुशीत स्नॅक कोकणी पोहे नारळ, करीपत्ता व थोडा गोडपणा असलेले कोकणातील पोहे पातळ पोहे / दही-गूळ पोहे पातळ पोहे पाण्यात हलके भिजवून, गूळ-दही-नारळासह तूप पोहे गरम तूप, साखर/गूळ, वेलची घालून तयार – प्रसंगी प्रसाद म्हणून