रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

दिवाळी स्पेशल फराळातली राजकन्या — खुसखुशीत पुडाची करंजी!

करंजी हा एक पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे जो विशेषतः दिवाळीच्या फराळात बनवला जातो.
ही गोड करंजी म्हणजे खुसखुशीत आवरणात भरलेलं सुगंधी सारण — चव, सुगंध आणि टेक्स्चर यांचा सुंदर मिलाफ!

रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

करंजी हा एक पारंपरिक भारतीय गोड पदार्थ आहे जो विशेषतः दिवाळीच्या फराळात बनवला जातो.
ही गोड करंजी म्हणजे खुसखुशीत आवरणात भरलेलं सुगंधी सारण — चव, सुगंध आणि टेक्स्चर यांचा सुंदर मिलाफ!
बिस्किटासारखा रंग, खारीसारखी कुरकुरीत टेक्स्चर आणि जिभेवर विरघळणारी चव — ही करंजी खास आहे कारण यात मैदा अजिबात नाही! फक्त रव्याचा वापर करून ही अप्रतिम लेयर्स सुटणारी करंजी  कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत .

 आवश्यक साहित्य (साधारण १ किलो करंज्यांसाठी)

रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

आवरणासाठी:

  • बारीक रवा – ४ कप (किंवा ५०० ग्रॅम)

  • साजूक तूप – ¾ कप (१०० ग्रॅम)

  • तांदळाची पिठी – २ टेबलस्पून

  • चवीपुरते मीठ

  • पाणी – आवश्यकतेनुसार

  • दूध अर्धा कप

सारणासाठी:

रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

  • साजूक तूप – २ टेबलस्पून

  • खसखस – १ टेबलस्पून

  • बारीक रवा – ¼ कप

  • सुकं खोबरं (किसलेलं) – २ कप

  • पिठी साखर – २½ कप

  • वेलची पावडर – ½ टीस्पून

  • ड्रायफ्रूट्स – बदाम, काजू, पिस्ते, बेदाणे


 कृती :

रव्यापासून बनवलेली भरपूर पूड सुटलेली खुसखुशीत करंजी | पुडाची करंजी रेसिपी | Diwali Special

1️⃣ पीठ मळणे-

  • सुरवातीला आपण पराती मध्ये रवा घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ टाकणार आहोत नंतर साजूक तुपाचे कडकडीत मोहन तयार करून घेणार आहोत आणि ते त्या मिश्रणात गरम असताना घालणार आहोत.

  • कडकडीत तापवलेलं तूप घातल्यानंतर चमच्याने रवा आणि तूप एकत्र करायचे.

  • थोडं थोडं पाणी घालून सैलसर पीठ मळा आणि  एक ते दोन तास भिजण्यासाठी झाकून ठेवा.

  • नंतर ते पीठ थोडे थोडे करून मिक्सरमध्ये पाणी न घालता फिरवून घ्या त्यामुळे ते चांगले मऊ होते.

2️⃣ सारण तयार करणे-

  • खसखस मंद आचेवर भाजून घ्या.

  • खोबरं सोनेरी रंगावर भाजा आणि बाजूला काढा.

  • रवा सुद्धा हलका मंद आचेवर भाजून घ्या.

  • खोबरे भाजल्यानंतर ते कुरकुरीत होते त्यामुळे ते हाताने थोडेसे बारीक करून घ्या.

  • सर्व घटक (खोबरं, खसखस, रवा, पिठीसाखर, ड्रायफ्रूट्स, वेलची) एकत्र करून मिक्स करा.
    हे सारण ८–१० दिवस टिकू शकते.

3️⃣ साटा तयार करणे-

  • ३ टेबलस्पून तूप आणि ३–४ टेबलस्पून तांदळाची पिठी एकत्र करून चांगलं फेटा.

  • हे मिश्रण पांढरट झालं की साटा तयार.

4️⃣ लेयर तयार करणे

  • एकसारखे पिठाचे गोळे केल्यानंतर चपाती जशी लाटतो तसे पातळ लाटून घ्यायच्या तीन ते चार पोळ्या लाटून झाल्या की प्रत्येक पोळीवर हलकासा साटा लावून त्यावर दुसरी पोळी ठेवून परत त्यावर साटा लावणे अशाप्रकारे तीन ते चार पोळ्या एकत्र करून त्याचा हळुवार रोल करून घ्यायचा आणि नंतर तो पाहिजे त्या आकारात सुरीने कापून घ्यायच्या .

  • या तुकड्यांपासून पाऱ्या तयार करा आणि झाकून ठेवा.

5️⃣ करंजी बनवणे

  • प्रत्येक पारीला एकाच दिशेने हलकं लाटून मध्ये सारण भरा.

  • कडेने थोडं पाणी किंवा दूध लावून बंद करा.

  • कडा दाबताना फार जोर लावू नका म्हणजे पूड व्यवस्थित सुटते.

6️⃣ तळणे

  • तेल हलकं तापवून करंज्या मंद आचेवर सोडा.

  • झाऱ्याने वरून तेल टाकत हळूहळू तळा.

  • सोनेरी रंगावर आल्या की बाहेर काढा.


 टिप्स:

  • रवा भिजायला वेळ द्या – तोच करंजीचा बेस मऊसूत करतो.

  • साटा जास्त लावू नका, नाहीतर करंजी तेलकट होते.

  • मंद आचेवर तळल्यास पूड सुंदर सुटते.

  • एकावेळी कमी करंज्या तळा आणि उरलेल्या झाकून ठेवा.

खुसखुशीत, हलकी, बिस्किटासारखी करंजी जी जिभेवर विरघळते आणि दिसायला अगदी बाजारातल्या पेक्षा सुंदर!
या रेसिपीने तुम्हाला साधारण ३०–३२ करंज्या मिळतील.

करंजी हा भारतीय पारंपरिक गोड पदार्थ आहे जो विशेषतः दिवाळीच्या फराळात बनवला जातो. हा पदार्थ महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि दक्षिण भारतात विविध नावांनी ओळखला जातो — कुठे “करंजी”, कुठे “गुजिया” किंवा “कऱचिका” म्हणून.

करंजीचे प्रकार:

  1. मैद्याची करंजी – सर्वात पारंपरिक प्रकार; मैद्याच्या पिठाची पातळ पोळी लाटून त्यात नारळाचा गोड सारण भरले जाते.

  2. रव्याची पुडाची करंजी – रव्यापासून केलेली लेअर्स सुटणारी खुसखुशीत करंजी; मैदा वापरत नाहीत.

  3. खारी करंजी – गोडाऐवजी मसाल्याचे भरलेले सारण वापरून केलेली चविष्ट आवृत्ती.

  4. बेकरी करंजी – ओव्हनमध्ये बेक करून बनवली जाते; तेल कमी आणि आरोग्यदायी पर्याय.

Leave a Comment