इडली सांबार रेसिपी | Idali Sambar Recipe in Marathi2025 घरच्या घरी मऊ, जाळीदार इडली आणि झणझणीत सांबार बनवण्याची परफेक्ट रेसिपी जाणून घ्या. पारंपरिक चव, पौष्टिकता आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा नाश्ता – इडली सांबार रेसिपी मराठीत!
दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थांपैकी एक म्हणजे इडली-सांबार.
मऊ, जाळीदार इडली आणि त्यावर ओतलेलं झणझणीत, आंबट-गोड सांबार – ही जोडी म्हणजे चवीचं परिपूर्ण संतुलन.
आज आपण अगदी घरच्या घरी, खास टिप्स आणि प्रमाणांसह ही इडली सांबार रेसिपी पाहणार आहोत.
इडली बनविण्यासाठी आवश्यक साहित्य:(Ingredients)
इडली सांबार रेसिपी | Idali Sambar Recipe in Marathi2025
| घटक | प्रमाण |
|---|---|
| बासमती तांदूळ | 4 वाटी |
| उडीद डाळ | 1 वाटी |
| पोहे | ½ कप |
| सोडा | टेबलस्पून |
| मीठ | चवीनुसार |
| पाणी | आवश्यकतेनुसार |
| तेल | आवश्यकतेनुसार |
सांबार बनविण्यासाठी आवश्यक साहित्य:
इडली सांबार रेसिपी | Idali Sambar Recipe in Marathi2025
| घटक | प्रमाण |
|---|---|
| तूर डाळ | 1 वाटी |
| चिंच | छोटा लिंबाएवढा गोळा |
| कांदा | 2 मध्यम |
| टोमॅटो | 2 मध्यम |
| दुधी भोपळा | 1 लहान |
| सांबार मसाला | 4 चमचे |
| हळद | ¼ चमचा |
| लाल तिखट | 1 चमचा |
| गूळ | 1 चमचा |
| मीठ | चवीनुसार |
| तेल | 3 चमचे |
| मोहरी, कढीपत्ता, हिंग,कोथिंबीर
सुहाना किंवा एव्हरेस्ट |
फोडणीसाठी
4 चमचे |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कृती Step-by-Step process :
इडली सांबार रेसिपी | Idali Sambar Recipe in Marathi2025
step 1: इडलीचं मिश्रण तयार करणे
-
तांदूळ, उडीद डाळ वेगवेगळे धुऊन 9–10 तास भिजवा.
-
उडीद डाळ स्वतंत्रपणे बारीक वाटून घ्या.
-
तांदूळ आणि पोहे थोडे जाडसर वाटा.
-
दोन्ही पिठं एकत्र करून झाकून 9-10 तास आंबवण्यासाठी ठेवा.
-
आंबल्यावर पीठ हलके होते.
step 2: इडली स्टीम करणे
-
आंबवलेल्या पिठात आवश्यकतेनुसार मिठ घाला.सेच खायचा सोडा अर्धा चमचा घाला.
-
इडली साचा तेलाने ग्रीस करा.
-
साच्यात पीठ ¾ भागापर्यंत भरा.
-
आधी उकळत असलेल्या पाण्यात साचा ठेवून 10 मिनिटे वाफवा.
-
थोड्या थंड झाल्यावर इडल्या बाहेर काढा — मऊ, शुभ्र आणि फुललेल्या! step 3: सांबार तयार करणे
-
तूर डाळ आणि दुधीभोपळा शिजवून घ्या (3–4 शिट्ट्या).
-
तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, हिंगाची फोडणी द्या.
-
कांदा, टोमॅटो, हळद, तिखट आणि सांबार मसाला घालून परतवा.
-
शिजवलेली तूर डाळ आणि दुधी भोपळा एकत्रित स्मॅश करून फोडणी मध्ये टाका
- आवश्यकतेनुसार पाणी घाला.
-
चिंचेचं पाणी आणि गूळ घालून आणखी 5 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
step 4: सर्व्हिंग
-
प्लेटमध्ये गरम इडल्या ठेवा.
-
त्यावर झणझणीत सांबार ओता.
-
वरून आवडीनुसार थोडं तूप आणि कोथिंबीर.
-
सोबत नारळाची चटणी ठेवा – आणि तयार झाली स्वर्गीय प्लेट !
उपयुक्त टिप्स :
इडली सांबार रेसिपी | Idali Sambar Recipe in Marathi2025
✅ तांदूळ नेहमी बासमती प्रकारचा वापरा — इडली अधिक मऊ होते.
✅ फर्मेंटेशनसाठी उबदार जागा आवश्यक आहे.
✅ सांबारमध्ये गूळ घातल्याने आंबट आणि तिखट चव संतुलित राहते.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
थोडक्यात माहिती:
घरच्या घरी बनवलेली इडली-सांबार रेसिपी म्हणजे पौष्टिक, हलकी आणि पोटभर न्याहारी.
मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती —
गरमागरम इडली, झणझणीत सांबार आणि तुपाचा सुवास — हीच आहे खरी “स्वाद मॅजिक” अनुभवाची गोष्ट! ✨
इडलीचे अनेक स्वादिष्ट प्रकार भारतात बनवले जातात. खाली काही लोकप्रिय इडलीचे प्रकार दिले आहेत
1. पारंपरिक इडली (Traditional Idli)
तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे वापरून बनवली जाणारी ही सर्वात सामान्य व लोकप्रिय इडली आहे. मऊ, हलकी आणि जालीदार असते.
2.रवा इडली (Rava Idli / Semolina Idli)
ही इडली तांदळाऐवजी रव्यापासून तयार केली जाते. फर्मेंटेशन न करता झटपट तयार होते. दक्षिण भारतातील कर्नाटक स्पेशल प्रकार आहे.
3. व्हेजिटेबल इडली (Vegetable Idli)
इडलीच्या पीठात किसलेली गाजर, बीट, वाटाणा, कांदा, कोथिंबीर व हिरवी मिरची मिसळून रंगीत आणि पौष्टिक इडली बनवतात.
4. मसाला इडली (Masala Idli)
शिल्लक इडली तळून किंवा भाजून त्यात मसाले, कांदा आणि कोथिंबीर टाकून तयार केलेली झणझणीत डिश. इडली उपमा म्हणूनही ओळखली जाते.
5. कांचीपुरम इडली (Kanchipuram Idli)
तमिळनाडूमधील प्रसिद्ध इडली प्रकार. यात मिरी, जिरे, आलं, कढीपत्ता, हिंग आणि तूप टाकतात. सुगंधी आणि मसालेदार चव असते.
6. पनियारम इडली / Appe Idli
इडलीचं पीठ अप्पे पात्रात तूपात शिजवून कुरकुरीत बाहेरून आणि मऊ आतून असा प्रकार तयार होतो.
7. मटकी / मूग डाळ इडली (Moong Dal Idli)
फर्मेंटेशनशिवाय मूग डाळ आणि थोडा रवा वापरून बनवलेली हेल्दी आणि प्रथिनयुक्त इडली. डायटसाठी योग्य.
8. ओट्स इडली (Oats Idli)
ओट्स, दही आणि भाज्या वापरून तयार होणारी ही इडली हेल्दी, फायबरयुक्त आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त असते.
9. रागी इडली (Ragi Idli)
रागी पीठ वापरून बनवलेली ही इडली कॅल्शियम व लोहयुक्त असते. डाएट आणि डायबेटीससाठी उत्तम पर्याय.