बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
भारतीय घरात सणासुदीला किंवा कोणत्याही खास प्रसंगी जे पहिल्यांदा मनात येतं ते म्हणजे बेसनाचे लाडू.बेसन लाडू पौष्टिक तर आहेच तसेच स्वादिष्ट आहेत सुवर्ण रंग, तुपाचा मोहक सुवास, वेलचीची सुगंधी झाक आणि दाणेदार टेक्सचर — हे सर्व एकत्र आले की तोंडात विरघळणारा अप्रतिम स्वाद मिळतो.म्हणून आज आपण बघणार आहोत 100% परफेक्ट बेसनाचे लाडू बनवण्याची खास पद्धत.या पद्धतीमध्ये तुम्ही अगदी घरी असणाऱ्या साध्या बेसनातूनही रवाळ, सुटसुटीत आणि दाणेदार लाडू बनवू शकता.
साहित्य (Ingredients)
बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
| साहित्य | प्रमाण |
|---|---|
| बेसन (साधा) | 600 ग्रॅम / 6 कप |
| साजूक तूप | 250 ग्रॅम |
| बताशाची पूड / पिठीसाखर | 300 ग्रॅम |
| वेलची पूड | 1 टीस्पून |
| पिस्ते ,काजू बदाम किंवा मनुके(ऐच्छिक) | सजावटीसाठी |
नोट: प्युअर देसी तूप = स्वाद + सुगंध + टेक्सचर यासाठी खूप महत्त्वाचं.
सविस्तर कृती / Method
बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
१) बेसन भाजणे:
-
सुरुवातीला मध्यम आचेवर कढई गरम करून घ्या नंतर त्यामध्ये साजूक तूप घाला तूप वितळायला लागले की त्यामध्ये चाळून घेतलेले बेसन पीठ घाला आणि नंतर तूप आणि बेसन पीठ एकत्रितपणे मंद आचेवर हलवत रहा बेसन पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे ते हलवत रहा बेसन पीठ भाजताना एक काळजी घ्यायची की ते कढईला चिकटले नाही पाहिजे त्यामुळे लाडूला करपट वास लागू शकतो. आणि जसे बेसन पीठ भाजत येईल तसा बेसन पिठाचा सुगंध दरवळतो आणि बेसन पीठ आणि तूप एकत्र भाजल्यामुळे त्याला चांगली चमक येते आणि मिश्रण थोडेसे पातळ दिसू लागते
✔️ या टप्प्यात बेसनमधील कच्चेपणा निघतो.
✔️ दाणेदार टेक्सचर तयार होऊ लागते. लाडू एकदम समान, सुटसुटीत आणि दाणेदार होतात.
2) मिश्रण थंड होऊ देणे
बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
बेसन पीठ भाजून झाल्यानंतर ते एका मोठ्या ताटात किंवा पराती मध्ये काढून घ्या आणि ते मिश्रण थंड होऊ द्यात. मिश्रण थंड होत आले की त्यामध्ये आपण बनविलेली पिठीसाखर आणि वेलची पूड घालायची वेलची पूड घातल्यामुळे लाडूला सुगंध येतो आणि लाडू चविष्ट होतात. नंतर मिश्रण चांगले चमच्याने एकत्र करून घ्यायचे मिश्रण एकत्र करून झाले की दोन्ही हातांच्या साहाय्याने तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू तुम्ही हातावर पीठ घेऊन थोडेसे एकत्र करून छान लाडू बांधू शकता नंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाडूला काजू किंवा पिस्ता लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे त्या आकाराचे लाडू बनवू शकता.
3)झटपट लाडू तयार
बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
अशाप्रकारे खूप कमी साहित्य वापरून आणि खूप सोप्या पद्धतीने आपण चविष्ट असे बेसन लाडू बनवता येतात. जेव्हा आपण कोणतेही पदार्थ घरी बनवतो तेव्हा तो पदार्थ बनवताना आनंद तर असतोच परंतु बाहेर कुठेही तसा पदार्थ तुम्हाला शोधून सापडणार नाही त्यामुळे थोडेसे कष्ट पडतात परंतु आपल्या कुटुंबीयांसाठी आपण खूप छान असे पदार्थ बनवतो आणि घरी केलेले पदार्थ जास्त दिवस टिकतात कारण आपण त्यामध्ये कोणतेही बाहेरचे घटक घालत नाही.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
बेसन लाडू बनवण्याच्या सोप्या टिप्स:बेसन लाडू रेसिपी टिप्स आणि ट्रिक्स|Besanladu recipe2025
-
बेसनपीठ चाळणे
बेसन चाळून चाळून म्हणजे लाडू अतिशय मऊ आणि स्मूद होतात. -
स्लो गॅसवर भाजा
बेसन नेहमी स्लो गॅसवर भाजा. घाई केली तर बेसन कच्चं राहील किंवा जळेल. -
एकसारखी हलवा
भाजताना सतत हलवत राहा म्हणजे बेसनचा रंग एकसारखा येतो. -
बेसनाचा वास तपासा
नीट भाजल्यावर छान खमंग सुगंध येतो — तेव्हा बेसन तयार! -
गळ सोडू नका
बेसनाचा गळ होऊ देऊ नका — सतत हलवत राहा. -
तूप हळूहळू घाला
गरम तूप छोटे छोटे चमचे घालत ढवळा — लाडू दाणेदार बनतात. -
थोडं थंड झाल्यावरच आकार द्या
अगदी गरम मिश्रणाला लाडू आकार देऊ नका — हाताला चिकटते. -
बारीक साखरेचा वापर
साखर पिठी (पावडर) वापरा म्हणजे लाडू खमंग आणि मऊ होतात. -
कोरडे ड्रायफ्रूट्स घाला
ड्रायफ्रूट्स तुपात न तळता कोरडे भाजून घालले तर चव वाढते. -
साठवण
लाडू पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा, म्हणजे ओलावा राहणार नाही. - लाडू चा दुसरा प्रकार बेसन पिठाचे लाडू बनवितो तसेच ज्या लोकांना बेसन पिठाचे लाडू खायचे नाहीत त्यांच्यासाठी आपण डाळीच्या पिठाचे लाडू बनवू शकतो जिसे बेसन पिठाचे लाडू ची पद्धत आहे त्याचप्रमाणे मूग डाळीच्या पिठाचे लाडू बनवले जातात फक्त बेसन पिठाऐवजी तिथे तुम्ही मूग डाळीचे पीठ वापरू शकता युवा कोणाला किंवा कोणाला डायबिटीस वगैरे असेल आणि साखर खायची नसेल तर साखरे ऐवजी गुळाचा वापर करू शकता