मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ते म्हणजे “खमंग कुरकुरीत सामोसा” ! बाहेरून खुसखुशीत, तर आतून मसालेदार बटाट्याचे भरलेले सारण – “सामोसा” हा एक असा स्नॅक आहे जो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चहा बरोबर खायचा असो, पार्टीत वाढायचा असो किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी पटकन चमचमीत खायचे असेल तर समोसा नेहमीच सर्वांचा आवडता पर्याय ठरतो.

आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा बनवणार आहोत. ही रेसिपी खूपच सोपी आणि पटकन होणारी आहे , चला तर मग पाहुयात सुरवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण रेसिपी .

Table of Contents

1) समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

कणकेसाठी साहित्य:

  1. मैदा – 2 कप
  2. रवा – 1 टेबलस्पून (कुरकुरीतपणा वाढतो)
  3. तेल – 2 टेबलस्पून (मोहनसाठी)
  4. मीठ – 1 टीस्पून
  5. पाणी – आवश्यकतेनुसार

सारणासाठी साहित्य:

मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

  1. बटाटे – 4 मध्यम आकाराचे, उकडून कुस्करलेले
  2. हिरवी मटार – ½ कप
  3. तेल – 1 टेबलस्पून
  4. जिरे – 1 टीस्पून
  5. आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  6. हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
  7. हळद – ¼ टीस्पून
  8. लाल तिखट – 1 टीस्पून
  9. गरम मसाला – ½ टीस्पून
  10. आमचूर पावडर / लिंबाचा रस – ½ टीस्पून
  11. मीठ – चवीनुसार
  12. कोथिंबीर – 2 टेबलस्पून

कृती :

मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

१) कणीक मळणे – कुरकुरीतपणाचे रहस्य

समोसा खमंग व्हावा यासाठी कणीक योग्य पद्धतीने भिजवलेली असणे खूप गरजेचे आहे. एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा, मीठ आणि मोहन म्हणून तेल(गरम करून घालणे) घालून नीट मिक्स करा. नंतर थोडं-थोडं पाणी घालत कणीक घट्ट मळायची .पाणी जास्त घालायचे नाही. ही कणीक किमान 15–20 मिनिटे झाकून ठेवल्याने समोसा तळताना छान कुरकुरीत होतो.

२) सारण तयार करणे – मसाल्यांचा सुगंध

कढईत तेल गरम करून त्यात जिरे तडतडा. लगेच आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून हलकं परतून घ्या. आता मटार, कुस्करलेले बटाटे, हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून छान परतून घ्या. शेवटी आमचूर पावडर आणि ताजी कोथिंबीर मिसळली की सारण अतिशय सुगंधित आणि चविष्ट तयार होते.

हे सारण पूर्ण थंड झाल्यावरच समोस्यामध्ये भरावे.

३) समोसे आकार देणे – अगदी परफेक्ट कोन

कणकेचे लिंबाएवढे गोळे करून पातळ पोळी लाटा आणि तिला अर्धी कापा. अर्ध्या भागाचा कोन बनवण्यासाठी कडा थोड्याशा पाण्याने चिकटवा. कोन तयार झाल्यावर त्यात भरपूर बटाट्याचे सारण भरा आणि टोक व्यवस्थित बंद करा. सर्व समोसे एकदम समसमान आकाराने केल्यास दिसायलाही सुंदर आणि तळायलाही सोपे जाते.

४) तळणे – सोनेरी रंग

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून घ्या. तेल खूप गरम असेल तर समोसा बाहेरून तपकिरी होईल पण आतून कच्चा राहील. त्यामुळे मध्यम आचेवरच समोसे हळुवारपणे तळत राहा. ते सोनेरी रंगाचे कुरकुरीत दिसायला लागले की बाहेर काढा.

अधिक  माहितीसाठी येथे क्लिक करा

टीप – समोसा परफेक्ट होण्यासाठी :

  1. कणिक नेहमी घट्ट मळा.
  2. मोहन (तेल) नीट मिसळल्याने कवच खुसखुशीत होते.
  3. समोसे नेहमी मंद ते मध्यम आचेवर तळा.
  4. सारण थंड झाल्यावरच भरावे.
  5. कडांवर पाणी लावून व्यवस्थित सील केल्यास तळताना समोसे फुटत नाहीत.

🍽️ सर्व्हिंग आयडिया:

गरमागरम समोसे पुदिना चटणी, चिंच-गूळ चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत वाढा.
चहा बरोबरची त्यांची जोडी म्हणजे सुवर्णमध्य!

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

समोसाचे विविध प्रकार (Samosa Types List)

मस्त खमंग समोसा रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने|samosa recipe at Home

भारतभर आणि जगभरात समोसाच्या असंख्य व्हरायटीज मिळतात. भरणी, कवच, मसाले आणि प्रकारानुसार प्रत्येक समोसा चवीला वेगळाच!


1) पारंपरिक/क्लासिक समोसे

1. बटाटा समोसा (Aloo Samosa)

सर्वात लोकप्रिय. मसालेदार बटाट्याचे सारण आणि खमंग कवच.

2. पंजाबी समोसा

मोठा आकार, भरपूर मटार-बटाटा, मसालेदार आणि जाड कवच.

3. महाराष्ट्रीयन समोसा

थोडा हलका मसाला, चहा बरोबर जास्त आवडीने खाल्ला जातो.


2) व्हेज समोसा प्रकार

4. मटार समोसा (Green Peas Samosa)

हिवाळ्यात खास. ताज्या मटाराचा गोड-तिखट मिश्रण.

5. वेज मिक्स समोसा

गाजर, बीन्स, बटाटा, फ्लॉवर – मिश्र भाज्यांचे सारण.

6. कॉर्न समोसा

गोड कॉर्न, थोडा चीज आणि हलका मसाला.

7. पालक कॉर्न समोसा

हेल्दी आणि चवदार पर्याय.


3) चीज आधारित समोसे

8. चीज समोसा

मुले विशेष आवडीने खातात. मऊ चीज फिलिंग.

9. चीज कॉर्न समोसा

कॉर्न आणि चीजची परफेक्ट जोडी.

10. मोझरेला स्टफ्ड समोसा

ताणणारे चीज – पार्टीसाठी सुपरहिट.


4) नॉन-व्हेज समोसा प्रकार

11. चिकन समोसा

मसालेदार चिकन कीमा सारण.

12. मटण समोसा

समृद्ध, स्पायसी आणि भारी चवीचा.

13. अंडा/एग समोसा

उकडलेल्या अंड्याचे कुस्करलेले फिलिंग.


5) फ्युजन समोसे

14. नूडल्स समोसा

चायनीज ट्विस्ट – शेजवान किंवा हक्का नूडल्स भरणी.

15. पिझ्झा समोसा

चीज, ओरेगानो, पिझ्झा सॉस – मुलांचा फेव्हरेट.

16. पनीर टिक्का समोसा

मसालेदार तंदुरी पनीर फिलिंग.

17. मेक्सिकन समोसा

बीन्स, कॉर्न, सॉस आणि हलका स्पायसी फ्लेवर.

6) स्वीट समोसे (गोड समोसे)

19. चॉकलेट समोसा

चॉकलेट भरून तळलेले – डेसर्टसाठी बेस्ट.

20. नारळ-गूळ समोसा

गुळाचा गोडवा आणि खोबऱ्याची चव.

21. ड्रायफ्रूट समोसा

काजू, बदाम, मनुका, खजूर – श्रीमंत फ्लेवर.

Leave a Comment