झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|InstantRava Uttapa Recipe in Marathi2025भारतीय नाश्त्यांमध्ये रव्यापासून बनणाऱ्या पदार्थांना नेहमीच विशेष स्थान आहे. त्यातीलच एक अतिशय लोकप्रिय, खुसखुशीत ,झटपट होणारा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे रवा उत्तप्पा . सकाळच्या घाईत पटकन तयार होणारा हा उत्तप्पा केवळ चवीसाठीच नाही तर त्याच्या साधेपणामुळेही सर्वांना आवडतो. विशेषतः लहान मुलांना हा उत्तपा खूप आवडतो तसेच मूळ शाळेत जाणारे असतील तर त्यांना आपण हा उत्तप्पा टिफिन ला पण देऊ शकतो. दही आणि काही निवडक मसाले यांचा उत्तम संगम म्हणजे रवा उत्तप्पा—ज्यामुळे तो मऊ, खमंग आणि हलका वाटतो.

रवा उत्तप्पा हा दक्षिण भारतीय झटपट तयार होणारा पदार्थ आहे. यासाठी पीठ वाटणे किंवा आंबवणे यासारख्या प्रक्रिया नसतात. फक्त पीठ ८ ते ९ तास भिजवणे आणि झटपट बनणाऱ्या या रेसिपीमुळे तो झटपट नाश्ता, टिफिन किंवा संध्याकाळचा हलका खाऊ म्हणून उत्तम पर्याय ठरतो. वरून घातलेला बारीक कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर यामुळे याला सुंदर रंग, सुगंध आणि चव येते.

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

४ लोकांसाठी रवा उत्तप्पा बनवण्याची सोपी पद्धत :

साहित्य :

  1. रवा (सूजी) – ४ ते ५ कप
  2. दही – ½ कप
  3. पाणी -आवश्यकतेनुसार
  4. 1 कांदा (बारीक चिरलेला)
  5. 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
  6. 2 ते ३ हिरव्या मिरच्या
  7. आले (किसलेले) (आवडीनुसार)
  8. कोथिंबीर
  9. मीठ
  10. जिरे
  11. तेल

कृती :

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

1. पीठ तयार करणे

एका मोठ्या भांड्यात रवा आणि दही एकत्र मिसळा. त्यामध्ये रवा भिजून पाणी वरपर्यंत राहील एवढे पाणी घालून रवा ८ ते ९ तास झाकण ठेऊन भिजत घाला . नंतर उत्तप्पा करताना रवा ज्या भांड्यामधे भिजवला आहे त्यामधील वर आलेले सर्व पाणी काढून टाका. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.

2. टॉपिंग तयार करणे

एका प्लेटमध्ये बारीक चिरलेले (आवडीनुसार ) कांदा, टोमॅटो, मिरची, आले आणि कोथिंबीर एकत्र करा. हवे असल्यास कॅप्सिकम किंवा किसलेले गाजरही घालू शकता. यामुळे उटप्पा स्वादिष्ट व पौष्टिक होतो.

3. उतप्पा तयार करणे

सुरुवातीला नॉनस्टिक तवा गरम करा आणि किंचित तेल लावा. भिजवलेल्या रव्यामध्ये (आवडीनुसार ) कांदा, टोमॅटो, मिरची, आले आणि कोथिंबीर घाला . आणि चांगले मिक्स करून घ्या .. नंतर पळीमध्ये पिठ घेऊन तव्यावर घाला आणि हलकेच पसरवा. नंतर झाकण ठेवून एक बाजू खमंग होईपर्यंत भाजून घ्या. आणि नंतर पलटा आणि दुसरी बाजूही सोनेरी रंग येईपर्यंत भाजा . अशाप्रकारे आपला चविष्ट असा उत्तप्पा तयार होतो ..

4. सर्व्ह करताना

गरमागरम रवा उत्तप्पा नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा. याची चव इतकी अप्रतिम असते की एक उत्तप्पा खाल्यानंतर दुसरा घ्यावासा नक्की वाटतो.

5. रवा उत्तप्पा बनवण्याच्या टिप्स:

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

  • पीठ खूप पातळ करू नका, उत्तप्पा फाटू शकतो.
  • तिखटपणा आवडत असल्यास लाल तिखट किंवा चाट मसाला शिंपडा.
  • मुलांच्या टिफिनसाठी उटप्पा छोट्या आकारात बनवा.
  • अधिक हेल्दी व्हर्जनसाठी किसलेले गाजर, बीट किंवा स्वीट कॉर्न घाला.

उत्तप्पा बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या खास टिप्स

झटपट रवा उत्तप्पा रेसिपी|Instant Rava Uttapa Recipe in Marathi2025

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

1. पीठाची कंसिस्टन्सी

उत्तप्पाचे पीठ नेहमी जाडसर असावे पण खूप पातळ नसावे.

डोश्यापेक्षा थोडे घट्ट ठेवले की उत्तप्पा उत्तम फुलतो.

2. तवा योग्य तापमानावर ठेवावा

तवा खूप गरम नको, नाही तर उत्तप्पा पटकन करपतो .

तवा मध्यम तापमानावर ठेवा आणि एक-दोन थेंब पाणी टाकून पाण्याचाआवाज आला की तवा तयार होतो

3. तेलाची योग्य प्रमाण ठेवायचे

उत्तप्पा जाड असतो, त्यामुळे कडांना 1–2 टीस्पून तेल टाकल्याने तो छान कुरकुरीत होतो.

4. भाज्या बारीक चिरा

कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर बारीक चिरली की उत्तप्पाच्या वरती नीट बसतात आणि शिजतातही चांगले.

5. उत्तप्पा थोडा गोडसर पाहिजे असेल तर

पीठात चिमूटभर साखर घातल्याने उत्तप्पाला हलकी झाक येते आणि रंगही सुंदर येतो.

6. उलटताना घाई करू नका

वरचा भाग सुकून खालील बाजू कुरकुरीत झाली कीच उलटावे; नाहीतर उत्तप्पा तूटतो.

7. तवा कोरडा करू नका

प्रत्येक उत्तप्प्याआधी तव्याला हलके पाणी/तेल पसरून घ्या; तवा अतिगरम झाल्यास उत्तप्पा चिकटू शकतो.

8. चीज, मसाला किंवा साजूक तूप वापरू शकता

चवीत विविधता हवी असल्यास वरूनसाजूक तूप , चीज, किंवा स्पेशल उत्तप्पा मसाला भुरभुरा.

9. सर्व्ह करताना

उत्तप्पा गरम असताना नारळ चटणी आणि सांबारसह सर्व्ह केल्यास चव दुप्पट !

Leave a Comment