Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी आज आपण पाहणार आहोत तांदूळ आणि डाळीपासून बनणारे अप्पे.अप्पे हा पदार्थ दक्षिण भारतीय पारंपरिक, हलके आणि अत्यंत पौष्टिक असे नाश्त्यातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. बाहेरून खमंग आणि आतून मऊ अशी याची खास टेक्स्चरमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. अप्पे बनवताना आंबवलेले पीठ वापरल्याने त्यात हलकी आंबटशी चव येते आणि पचनाला देखील ते उत्तम असतात. सकाळच्या न्याहारीत, दुपारच्या डब्यात किंवा संध्याकाळच्या मेनूसाठी हे अप्पे अतिशय छान लागतात.
अप्पे म्हणजे काय?
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
अप्पे हे लहान गोलसर आकाराचे तळणाविना बनणारे स्नॅक आहेत.
ते विशेष अप्पे पॅन (Appe Pan ) मध्ये बनवले जातात. या पॅनमध्ये छोटे-छोटे गोल खळगे असतात, त्यात थोडे तेल घालून पीठ ओतले जाते आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतले जाते.
अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
- तांदूळ – ४ कप
- उडीद डाळ – १ कप
- मेथी दाणे – ½ टीस्पून
- पाणी – आवश्यकतेनुसार
- मीठ – चवीनुसार
- तडका (फ्लेव्हर साठी)
- तेल – 2 टीस्पून
- मोहरी – ½ टीस्पून
- कढीपत्ता – काही पानं
- हिरवी मिरची – 1 बारीक चिरलेली
- आले – ½ टीस्पून किसलेले
- कांदा (ऑप्शनल) – 4 टेबलस्पून बारीक चिरलेला
- अप्पे शिजवण्यासाठी अप्पे पॅन (Appe Pan)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कृती:
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
1) पीठ बनवण्याची प्रक्रिया :
सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन ८ ते ९ तास भिजत ठेवायचे . डाळीमध्ये थोडेसे मेथी दाणे घातल्याने पीठ हलके व फुलदार बनते. भिजलेले तांदूळ आणि डाळ स्वतंत्रपणे मऊसर, पण बारीक असे वाटून घ्यावीत. दोन्ही वाटणं एकत्र करून थोडं घट्टसर मिश्रण बनवावे. हे पीठ रात्रभर किंवा किमान 8–10 तास आंबायला ठेवले की अप्प्यांना छान आंबटपणा मिळतो.
2) तडका देऊन पीठ तयार करणे :
एक छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले टाकून छान परतून घ्यावे. हव असल्यास बारीक चिरलेला कांदाही हलका परतून घालता येतो. हा तडका आंबलेल्या पिठात घालून नीट मिसळावा. शेवटी चवीनुसार मीठ घालून अप्पेसाठी बॅटर तयार होते.
3)अप्पे तयार करण्याची प्रक्रिया :
अप्पे पॅन मध्यम आचेवर गरम करून प्रत्येक खाचेशी हलके तेल लावावे. तयार केलेल्या पिठाचा एक मोठा चमचा प्रत्येक खाचेत सहज बसवावा. झाकण लावून मंद–मध्यम आचेवर अप्पे शिजू द्यावेत. काही मिनिटांत तळाचा भाग सोनेरी होऊ लागतो; तेव्हा अप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही शिजवावेत. दोन्ही बाजूंनी सोनेरी–तपकिरी रंग येऊन खमंग सुगंध आला की अप्पे सर्व्ह करण्यास तयार होतात.
4) सर्व्हिंग – अप्पे कसे खायला छान लागतात?
अप्पे हे सांबर ,नारळाची चटणी, कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत अप्रतिम लागतात. गरम गरम अप्पे बाहेर कुरकुरीत आणि आतून मऊ असे अप्रतिम होतात . आवडीनुसार अप्प्यासोबत थोडीशी गूळ-पाणी चटणी किंवा सांबारही सर्व्ह करून दक्षिण भारतीय स्वाद आणता येतो.
अप्पे बनवण्याचे खास टिप्स :
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
- आंबवलेले पीठ जितके फुगते , तितके अप्पे नरम व हलके बनतात.
- डाळ वाटताना अतिबारीक पेस्ट बनवू नका, नाही तर अप्पे चिकट होतात.पीठ थोडेसे जाडसर ठेवायचे .
- पिठात बारीक चिरलेला टोमॅटो ,कांदा घातल्यास चव अप्रतिम होते.
- पॅन जास्त तापवू नका; नाहीतर अप्पे बाहेरून शिजून आतून कच्चे राहतील.
- हेल्दी व्हर्जनसाठी तेल कमी वापरा.
अप्पेचे प्रकार | Appe Types
Rice Dal Recipe|तांदूळ–डाळ अप्पे रेसिपी
1) तांदूळ–डाळ अप्पे (Rice–Dal Appe)
भिजवलेल्या तांदूळ आणि डाळींच्या पीठातून बनवलेले हलके, कुरकुरीत आणि पारंपरिक अप्पे.
2) रवा अप्पे (Rava Appe / Suji Appe)
रव्यापासून पटकन तयार होणारे, नेहमीपेक्षा मऊ आणि झटपट नाश्त्यासाठी उत्तम.
3) मसाला अप्पे (Masala Appe)
बटाट्याचा मसाला, कांदा, हिरवी मिरची व मसाले घालून बनवलेले चविष्ट अप्पे.
4) वेजिटेबल अप्पे (Vegetable Appe)
गाजर, कोबी, ढोबळी मिरची, कांदा अशा भाज्यांनी भरलेले पौष्टिक अप्पे; मुलांसाठी बेस्ट.
5) मेथी अप्पे (Methi Appe)
मेथीची पानं घालून पौष्टिक, सुगंधी अप्पे; हलके आणि साधे.
6) पालक अप्पे (Spinach Appe)
पालक प्युरी मिसळून बनवलेले हिरवे, हेल्दी आणि आयर्न–रिच अप्पे.
7) कोथिंबीर अप्पे (Coriander Appe)
कोथिंबीर व मसाले घालून बनणारे झणझणीत आणि ताज्या सुगंधाचे अप्पे.
8) ओट्स अप्पे (Oats Appe)
ओट्स + दही वापरून बनवलेले डायेट-फ्रेंडली, लो-कॅलरी अप्पे.
9) चीज अप्पे (Cheese Appe)
मुलांचे फेव्हरेट! अप्पेमध्ये चीज भरून बनवलेले मऊ आणि चवदार अप्पे.
10) इडली–डोसा बॅटर अप्पे (Leftover Batter Appe)
उरलेल्या इडली/डोसा पीठापासून तयार होणारे झटपट, क्रिस्पी आणि टेस्टी अप्पे.
11) पनीर अप्पे (Paneer Appe)
किसलेले पनीर, मसाले आणि हर्ब्स मिसळून बनवलेले प्रोटीन-रिच अप्पे.
12) नारळ अप्पे (Coconut Appe)
नारळाचा हलका स्वाद असलेले, मऊ आणि दक्षिण भारतीय टच असलेले अप्पे.