Table of Contents

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी. आजची ही पद्धत थोडी वेगळी आणि विशेष म्हणजे — नवशिक्यांनाही सहज समजेल अशी अगदी सोपी आणि झटपट होणारी खास पद्धत आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि परफेक्ट चव!

कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य:

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025

  1. एक जुडी ताजी कोथिंबीर
  2. ३ ते ४ कप बेसन
  3. ३–४ टीस्पून तांदळाचे पीठ (वडी क्रिस्पी होण्यासाठी)
  4. २ ते ३ टीस्पून पांढरे तीळ
  5. ½ टीस्पून जिरे
  6. ½ टीस्पून ओवा
  7. १ टेबलस्पून लसूण–हिरवी मिरची पेस्ट
    (७–८ लसणीच्या पाकळ्या + ३–४ हिरव्या मिरच्या)
  8. ½ टीस्पून हळद
  9. १ टीस्पून तिखट
  10. मीठ चवीनुसार

 

crispy kothibmbir vadi recipe

crispy kothibmbir vadi recipe

 

कृती:

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025

1)कोथिंबीर वडीचे पीठ कसे तयार करावे?

सर्वात प्रथम कोथिंबीरचे जाडसर देठ काढून कोथिंबीर निवडून घ्या नंतर कोथिंबीर चांगली धुऊन निथळत ठेऊन पूर्ण कोरडी करून घ्या.
आणि नंतर बारीक चिरा.
चिरलेल्या कोथिंबिरीत बेसन, तांदळाचे पीठ, जिरे,ओवा , तीळ, हळद, तिखट, लसूण–मिरची पेस्ट आणि मीठ घाला.
सर्व मिश्रण कोथिंबिरीत नीट मिसळा.
मिश्रण हाताने हलके दाबून मिसळा — यामुळे कोथिंबिरीतील ओल सुटते आणि पाणी अगदीच कमी लागते. आवश्यकता असल्यास फक्त १–२ टेबलस्पून पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.
पीठावर थोडेसे तेल लावून चांगले कोट करा.
तयार केलेले पीठच खूप हिरवेगारअप्रतिम असते. आणि हीच असते वडीची खरी चव !

2) वाफवण्याची (Steaming) प्रक्रिया

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025

एका ताटलीला किंवा थाळीला तेल लावून ग्रीस करा.ताटलीच्या तळाशी थोडे तीळ शिंपडा – यामुळे वडी सुंदर दिसते. तयार पीठ ताटलीत घालून समान पसरवा. आवडीनुसार वडी जाड किंवा पातळ ठेऊ शकता.वरून पुन्हा थोडे तीळ शिंपडा.. कुकरमध्ये 1 ते 1½ इंच पाणी गरम करा.. ताटली कुकरमध्ये ठेवा आणि शिट्टी न लावता १५–२० मिनिटे मध्यम आचेवर वाफवा. गॅस बंद झाल्यावर आणखी १०–१५ मिनिटे कुकरमध्येच थंड होऊ द्या.सुरी घालून तपासा — सुरी कोरडी बाहेर आली तर वडी छान शिजली आहे असे समजा .किंवा दुसरी एक वडी वाफवण्याची पद्धत आहे .त्यामध्ये आपण चाळणीचा वापर करणार आहोत.आपल्या घरात जी स्टील ची चाळणी असते तिला तेल लावून ग्रीस करा. मळलेल्या पिठाचे गोळे करून त्याला दोन्ही हातांनी वडीसाठी गोलाकार वळकुटा बनवून घ्या .असेच जेवढे होतील तेवढे पीठ मळून घ्यायचे .आणि एक एक करून चाळणीत ठेवायचे. गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायचे आणि पातेल्यावर चाळणी ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवायचे. आणि १० ते १५ मिनिट वाफवून घ्यायचे. नंतर वाडी थंड झाली कि एकसमान आकारात सुरीने वड्या कापायच्या.

crispy kothimbir vadi recipe
crispy kothimbir vadi recipe
3) वडी कापणे आणि तळणे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025

वाफवलेली वडी काढून चौकोनी आकारात कापा.कढईत तेल तापवा. वड्या डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय दोन्ही करता येतात.मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. निथळून टिश्यू पेपरवर काढा.

4) खुसखुशीत कोथिंबीर वडी सर्व्हिंग

वड्या बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर अशी तयार होते.

‘खस्ता’ टेक्स्चर — बघताक्षणी खावसं  !

याला चटणी किंवा सॉसची गरज नाही.

गरमागरम वड्या चहा-बरोबर किंवा तसेच खाण्यासाठी खूपच छान लागतात.

कोथिंबीर वडी बनवताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या टिप्स:

खुसखुशीत, कुरकुरीत आणि क्रिस्पी कोथिंबीर वडी|crispy kothimbir vadi recipe2025

1. कोथिंबीर कोरडी असणे खूप आवश्यक

कोथिंबीर धुतल्यानंतर ती पूर्ण कोरडी करून घ्या. ओलसरपणा राहिला तर पीठ मऊ होते आणि वडी नीट सेट होत नाही.

2. पाण्याचे प्रमाण कमी ठेवा

वडीच्या पीठात फार कमी पाणी लागते. कोथिंबिरीतून निघणाऱ्या नैसर्गिक ओलामुळेच पीठ छान मळते.
फक्त १–२ टेबलस्पून पाणी पुरेसे!

3. तांदळाचे पीठ अनिवार्य

तांदळाचे पीठ वडीला खुसखुशीतपणा देते.
जास्त क्रिस्पी हवी असल्यास १ टेबलस्पून जास्त वापरू शकता.

4. तीळ आणि जिरे सुगंध व टेक्स्चर वाढवतात

तिळाची कुरकुरी आणि जिर्‍याचा हलका सुगंध वडीची चव वेगळीच बनवतो.
वरून तिळाचे टॉपिंग लावल्यास वडी आकर्षक दिसते.

5. पीठ घट्ट असावे

पातळ पीठ वडीला चिखलासारखे बनवते.
पीठ हातात घेतल्यावर गोळा घट्ट बसला पाहिजे.

6. वडी वाफवल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या

गरम वडी लगेच कापल्यास ती तुटते.
थंड झाल्यावर तुकडे सुंदर आणि स्वच्छ कापता येतात.

7. डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय – दोन्ही चालतात

शॅलो फ्राय वड्या थोड्या हेल्दी आणि तरीही क्रिस्पी होतात.
डीप फ्राय वड्यांना परफेक्ट खुसखुशीत सोनेरी रंग येतो.

8. तेल चांगले गरम असावे

तेल मंद असले तर वडी जास्त तेल शोषते.
तेल गरम असेल तर वडी लगेच कुरकुरीत होते.

9. मसाला संतुलित ठेवा

लसूण–मिरची पेस्ट आणि तिखट यांचा संतुलित वापर केल्यास चव छान तयार होते.
जास्त तीखट हवे असल्यास मिरची पेस्ट वाढवू शकता.

10. आधी वाफवा, नंतर तळा – सर्वोत्तम टेक्स्चर मिळते

ही पारंपारिक पद्धत वडीला परफेक्ट मऊ आतून आणि क्रिस्पी बाहेरून बनवते.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment