हिरव्या मुगाचा डोसा बनवा १० मिनिटात|Green moong dosa recipeGreen moong dosa recipe:instant and healthy green gram dosa recipe:तुम्हाला कधी पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ खायचा असेल तर अगदी कमी वेळेत १० ते १५ मिनिटात आणि सोप्या पद्धतीने तयार होणार कुरकुरीत हिरव्या मुगाचा डोसा नक्की करून बघा. हिरव्या मूगापासून बनणारा हा डोसा हा आरोग्यदायी, हलका आणि प्रोटीनयुक्त असा नाश्ता किंवा जेवणाचा उत्तम पर्याय आहे. दक्षिण भारतीय डोशासारखाच दिसायला आकर्षक, पण त्याहून अधिक पौष्टिक असा हा हिरवे मूग डोसा उपवासानंतर, डायटमध्ये किंवा लहान मुलांसाठी सुद्धा खूप उपयोगी ठरतो.
साहित्य:
हिरव्या मुगाचा डोसा बनवा १० मिनिटात|Green moong dosa recipe
(Easy and Tasty Green moong dosa recipe in 10 minutes)
- हिरवे मूग – 2 कप (भिजवलेले)
- आले – 1 इंच तुकडा
- लसूण – ७ ते ८ पाकळ्या
- हिरवी मिरच्या – २ ते ४ (चवीनुसार)
- जिरे – 1 टीस्पून
- हळद – ½ टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार (बॅटरसाठी)
- तेल – डोसा भाजण्यासाठी
- कोथिंबीर – आवश्यकतेनुसार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कृती:हिरव्या मुगाचा डोसा बनवा १० मिनिटात|Green moong dosa recipe
step by step process Green moong dosa recipe
1)सर्वप्रथम 1 कप हिरवे मूग स्वच्छ धुवून ते 6 ते 8 तास किंवा रात्रभर पुरेसे पाण्यात भिजत घालावे. मूग नीट फुगले की त्यातील पाणी पूर्ण गाळून घ्यावे.
2)नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मूग, 1 इंच आले, २ ते ३ हिरव्या मिरच्या,लसूण पाकळ्या , 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालावे. थोडे थोडे पाणी घालत हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. तयार बॅटर डोशासाठी मध्यम जाडसर असावा, फार पातळ किंवा फार घट्ट नसावा याची काळजी घ्यावी.
3)आता तवा मध्यम आचेवर चांगला गरम करून त्यावर थोडे तेल पसरावे. एक पळी बॅटर तव्यावर ओतून चमच्याने गोलाकार आकारात पसरवावा. मध्यम आचेवर डोसा शांतपणे भाजू द्यावा. Easy and Tasty Green moong dosa recipe in 10 minutes खालील बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत झाली की वर थोडे तेल सोडून डोसा सावकाश उलटावा. दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ भाजून डोसा छान कुरकुरीत झाला की तव्यावरून काढून घ्यावा.

4)अशाच प्रकारे सगळे डोसे तयार करावेत. हे गरमागरम हिरवे मूग डोसे नारळाची चटणी, हिरवी चटणी, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह केल्यास त्यांची चव आणखीनच खुलते. हा नाश्ता केवळ चविष्टच नाही तर अतिशय पौष्टिक, हलका आणि पोटभर समाधान देणारा असतो, त्यामुळे सकाळच्या वेळेसाठी हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
खास टिप्स :हिरव्या मुगाचा डोसा बनवा १० मिनिटात|Green moong dosa recipe
( Tips for Easy and Tasty Green moong dosa recipe in 10 minutes)
-
मूग नीट भिजवा – मूग किमान 6–8 तास भिजवले नाहीत तर डोसा कडक होतो.
-
बॅटर योग्य कन्सिस्टन्सीचा ठेवा – खूप पातळ असेल तर डोसा फुटतो, खूप घट्ट असेल तर पसरत नाही.
-
तवा योग्य तापमानाचा असावा – खूप गरम तव्यावर डोसा टाकल्यास तो लगेच चिकटतो.
-
पहिला डोसा थोडासा खराब गेला तरी काळजी करू नका – पुढचे सगळे परफेक्ट येतात.
-
जास्त कुरकुरीत डोसा हवा असेल तर झाकण लावू नका.
-
मुलांसाठी मिरची कमी वापरा किंवा मिरची टाळू शकता.
-
चव वाढवण्यासाठी बॅटरमध्ये कांदा, कोथिंबीर किंवा जिरे पूड घालू शकता.
-
डायटसाठी करायचा असेल तर तेल अतिशय कमी वापरा.
-
तवा दरवेळी पुसून घ्या म्हणजे डोसा नीट पसरतो.
-
डोसा उलटताना घाई करू नका – खालील बाजू नीट भाजली गेली कि मग उलथा.
हिरव्या मुगाचा डोसा बनवा १० मिनिटात|Green moong dosa recipeGreen moong dosa recipe:
Easy and Tasty Green moong dosa recipe in 10 minutesआजकालच्या धकाधकीच्या जीवनात खूप वेळ स्वयंपाक करणे अगदीच शक्य होत नाही. पण असे असले तरी पौष्टिक पदार्थ खाणे हि तर प्राथमिक गरज असते . सकाळची सुरुवात जर पौष्टिक, हलक्या आणि चवदार नाश्त्याने झाली, तर संपूर्ण दिवस उत्साही जातो. अशाच एका परफेक्ट मॉर्निंग ब्रेकफास्टचा उत्तम पर्याय म्हणजे हिरवे मूग डोसा. (Green moong dosa recipe)प्रोटीन, फायबर आणि आयर्नने परिपूर्ण असलेला हा डोसा पचनासाठी हलका असून शरीराला आवश्यक ती ऊर्जा देतो. सकाळी साहित्य ऑफिस, शाळा किंवा घरच्या कामांची घाई असताना हा नाश्ता झटपट तयार होतो आणि पोटही बराच वेळ भरलेले ठेवतो. कुरकुरीत बाहेरचा थर आणि मऊ आतला भाग, नारळाची चटणी किंवा दह्यासोबत घेतला तर याची चव अजूनच खुलते. वजन कमी करणाऱ्यांसाठी,(healthy green gram dosa recipe) डायट करणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठीही हा एक अत्यंत आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो.