रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

रवा ढोकळा ही एक अतिशय झटपट, सोपी आणि हमखास यशस्वी होणारी नाश्त्याची रेसिपी आहे. अनेक वेळा बेसनचा ढोकळा नीट फुलत नाही, पण रव्याचा ढोकळा मात्र नेहमी मऊ, स्पॉंजी आणि हलका बनतो. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव यामुळे ही रेसिपी प्रत्येकाच्या किचनमध्ये हमखास बनवली जाते. अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी रवा ढोकळा हा एक परफेक्ट पर्याय आहे.

रवा ढोकळ्याचे साहित्य:

रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

  1. १ कप जाडसर रवा

  2. १ टीस्पून लिंबाचा रस

  3. मीठ – चवीपुरते

  4. साखर – 1 टीस्पून
  5. १ टेबलस्पून तेल (पिठात)

  6. हिरवी मिरची-आलं पेस्ट – 1 टीस्पून

  7. दही – ½ कप

  8. १ टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट (साधा किंवा लिंबू फ्लेवर)

  9. आवश्यकतेनुसार पाणी

    |Rava Dhokla Recipe2025
    रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

बनविलेल्या रवा ढोकळ्याला तडक देण्यासाठी साहित्य:

  1. १ टेबलस्पून तेल

  2. ½ टीस्पून मोहरी

  3. चिमूटभर हिंग

  4. १ हिरवी मिरची (चिरलेली)

  5. कढीपत्ता – 6–7 पाने

  6. तीळ – 1 टीस्पून

  7. बारीक चिरलेली कोथिंबीर – सजावटीसाठी

  8. तिखट पावडर – वरून शिंपडण्यासाठी (ऐच्छिक)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कृती:

रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

1)आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट, सोपी आणि हमखास यशस्वी होणारी रवा ढोकळा रेसिपी. आपण नेहमी बेसनपीठचा ढोकळा बघत असतो पण आज आपण बेसनपीठ न वापरता फक्त रवा वापरून ढोकळा बनवणार आहोत,आणि रव्याचा ढोकळा नेहमीच छान फुलतो, मऊ आणि स्पॉंजी होतो.

2)सुरुवातीला एका भांड्यात १ कप जाडसर रवा घ्या, रवा भाजण्याची अजिबात गरज नाही. त्यात १ टीस्पून लिंबाचा रस घाला आणि मध्यम घट्टसर भिजेल इतके पाणी घालून पीठ तयार करा.पाणी प्रमाणात घाला पीठ ना जास्त घट्ट ना पातळ असावे. रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे पीठ १५–२० मिनिटे झाकून ठेवा. नंतर त्यात १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ चवीपुरते आणि १ टेबलस्पून तेल घालून नीट मिसळा.

3)आता १ टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट (साधा किंवा लिंबू फ्लेवर) घालून थोडेसे पाणी टाकून लगेच हलक्या हाताने मिसळा. ६ इंचाचा साचा (टिन) तेलाने चांगला ग्रीस करून त्यात हे मिश्रण ओता. वरून थोडीशी तिखट पावडर शिंपडा, त्यामुळे ढोकळ्याचा रंग खूप सुंदर दिसतो. स्टीमरमध्ये खाली २–३ इंच पाणी गरम करून मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे ढोकळा वाफवा. स्टीमर नसेल तर आपण कढई, मोठे भांडे किंवा कुकरमध्ये शिट्टी काढूनही ढोकळा वाफवू शकतो.

4)ढोकळा शिजल्यानंतर १० मिनिटे थांबा, टूथपिक घालून पाहा—स्वच्छ बाहेर आला तर ढोकळा परफेक्ट तयार झालाय. थोडा गार झाल्यावर ढोकळ्यांच्या कडांना चाकू फिरवून चौकोनी तुकडे करा. तडका देण्यासाठी एका छोट्या कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात मोहरी, चिमूटभर हिंग, चिरलेली हिरवी मिरची घालून झाकण ठेवा, आणि नंतर हा खमंग तडका ढोकळ्यावर घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा.

Rava Dhokla Recipe2025
रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

5)हा रवा ढोकळा खूपच मऊ, फुललेला, स्पॉंजी आणि हलका लागतो. अगदी मोजक्याच घरगुती साहित्यापासून हा ढोकळा तयार होतो आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे. चिंचेच्या गोड चटणीसोबत किंवा तिखट हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत हा अप्रतिम लागतो.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

रवा ढोकळा परफेक्ट होण्यासाठी सुपर टिप्स:

रवा ढोकळा रेसिपी | झटपट, मऊ आणि स्पॉंजी रवा ढोकळा|Rava Dhokla Recipe2025

  1. रवा जाडसरच वापरा – फार बारीक रवा वापरला तर ढोकळा चिकट होतो.

  2. बॅटर 15 मिनिटे मुरू द्या – यामुळे रवा छान फुलतो.

  3. दही फ्रेश आणि आंबट नसलेले असावे – जास्त आंबट दही असेल तर चव बिघडते.

  4. इनो शेवटीच घाला – आधी घातला तर ढोकळा फुलणार नाही.

  5. इनो घातल्यानंतर ढवळू नका – फक्त 3–4 हलक्या फेऱ्या पुरेशा आहेत.

  6. स्टीमर आधीच गरम ठेवा – थंड स्टीमरमध्ये ठेवला तर ढोकळा बसतो.

  7. मध्यम गॅसवरच वाफवा – मोठ्या आचेवर ढोकळा फाटतो.

  8. बॅटर खूप पातळ करू नका – नाहीतर ढोकळा बसतो.

  9. वाफेवेळी झाकण उघडू नका – मध्येच उघडल्याने ढोकळा खाली बसतो.

  10. कापण्याआधी 5 मिनिटे थंड होऊ द्या – गरम असताना कापल्यावर ढोकळा तुटतो.

  11. बॅटरमध्ये थोडी चिरलेली कोथिंबीर घाला.

  12. गाजर किस किंवा स्वीट कॉर्न घातले तर किड्सना खूप आवडतो.

  13. थोडी साखर + लिंबाचा रस फोडणीत घातला तर परफेक्ट खट्टा-गोड स्वाद मिळतो

Leave a Comment