पारंपरिक चमचमीत भरलं वांग्याची भाजी|Tasty Brinjal Masala Recipe

पारंपरिक चमचमीत भरलं वांग्याची भाजी|Tasty Brinjal Masala Recipe

Tasty Brinjal Masala Recipeवांगं मसाल्याची चव म्हणजे तिखट, खमंग आणि हलक्या गोडव्याचा सुंदर संगम. वांग्याच्या मसाल्यातला भाजलेल्या शेंगदाण्याचा खमंगपणा, कांदा-लसूण मसाल्याची झणझणीत चव आणि वांग्याचा रसाळपणा —हे सगळं पहिल्या घासातच जाणवतं. वांगी मसाल्यात शिजताना इतकी छान मुरतात की प्रत्येक तुकड्यात मसाल्याचा सुगंध खोलवर उतरलेला असतो. भाजीचा लालसर रंग, घट्ट टेक्स्चर आणि हलका तेलकट चमक पाहूनच तोंडाला पाणी सुटतं.

Tasty Brinjal Masala Recipeलोकांना ही भाजी अत्यंत आवडण्याचं कारण म्हणजे तिचा घरगुती, पारंपरिक आणि पूर्णपणे समाधान देणारा स्वाद. कुणाला तिखट आवडतं, कुणाला खमंग—ही भाजी दोन्हींची परफेक्ट कॉम्बिनेशन घेऊन येते. ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भात—कशासोबतही ही भाजी तितकीच चविष्ट दिसते . विशेषतः गरम भाकरीवर वांग्याचा रस्सा घातला की त्याचा सुगंध आणि चव जेवणाला एक वेगळीच मजा देते.

साहित्य (Ingredients)Tasty Brinjal Masala Recipe

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

पारंपरिक चमचमीत भरलं वांग्याची भाजी|Tasty Brinjal Masala Recipe

  1. वांगी – ४ ते ५ (देठ असलेली, मध्यम आकाराची)
  2. कांदा – २ (बारीक चिरलेले)
  3. टोमॅटो -१ (बारीक चिरलेले)
  4. लसूण –८ ते १० पाकळ्या
  5. खोबरे -1/2 कप चिरलेले
  6. शेंगदाणा कूट – 1/2 कप (भाजलेले)
  7. कांदा-लसूण मसाला – 1 टेबलस्पून (घरचा अथवा बाजारचा)
  8. लाल तिखट – 1 टेबलस्पून (चवीनुसार कमी-जास्त)
  9. कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  10. मीठ – चवीनुसार
  11. तेल – 2 टेबलस्पून
  12. मोहरी -१ चमचा
  13. जिरे -१ चमचा
  14. गरम पाणी – आवश्यकतेनुसार (वांगी शिजवण्यासाठी)

कृती (Method)Tasty Brinjal Masala Recipe

पारंपरिक चमचमीत भरलं वांग्याची भाजी|Tasty Brinjal Masala Recipe

१)वांग्यांची तयारी
सुरुवातीला वांगी स्वच्छ धुवून घ्यायची.नंतर मागचे देठ थोडेसे कट करून अर्धे तसंच ठेवा. प्रत्येक वांग्याला मधोमध क्रॉस कट द्या, पण देठ पूर्ण कापू नका. वांगी किडलेली नाही हे तपासा.

२)मसाल्याचं मिश्रण तयार करणे
एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो ,शेंगदाणा कूट, खोबरे लसूण पेस्ट , लाल तिखट, कांदा-लसूण मसाला, कोथिंबीर थोडेसे तेल आणि मीठ घाला. सगळं चांगलं एकत्र मिसळा.नंतर त्यामध्ये २ ते ३ चमचे पाणी घालून थोडासा घट्ट मसाला तयार करा, जेणेकरून तो वांग्यात नीट बसेल.

३)वांग्यात मसाला भरणे Tasty Brinjal Masala Recipe
तयार मसाला प्रत्येक वांग्याच्या कापात भरून घ्या. वांगी हलक्या हाताने दाबा, म्हणजे मसाला घट्ट बसेल. उरलेला मसाला बाजूला ठेवा.

४)मसाला परतणे आणि वांगी शिजवणे
कढईत ३ ते ४ चमचे तेल गरम करा. त्यामध्ये भरलेली वांगी आणि उरलेला मसाला टाकून 4–5 मिनिटे छान परता.अंतर मसाल्याचा रंग बदलेल आणि मग झाकण ठेवून 3–4 मिनिटे वाफ येऊ द्या.नंतर गरम पाणी घाला आणि पुन्हा झाकण ठेवून 10–15 मिनिटे किंवा वांगी पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवा.
शिजत असताना झाकण काढून वांगी हलक्या हाताने पलटवा, जेणेकरून ती सर्व बाजूंनी छान शिजतील आणि मसाला नीट लागेल.
वांगी मऊ, चमचमीत आणि मसाल्याने भरलेली दिसली की गॅस बंद करा. भाजीचा रंग सुंदर लालसर आणि सुगंध एकदम अप्रतिम येतो.Tasty Brinjal Masala Recipe

वांगं मसाल्याची चव साधीसुधी नाही—ती आकर्षक, समाधानकारक आणि जेवणाला पूर्णता देणारी असते. म्हणूनच ही भाजी घरातील मोठ्यांना, लहानांना, पाहुण्यांना — सर्वांनाच आवडते. पहिला घास घेताच तिची चव मनात रेंगाळते, आणि प्रत्येकवेळी वाटतं—“हीच खरी घरगुती चव!”

Tasty Brinjal Masala Recipeअनेक घरगुती समारंभांत आणि ताटातील “स्पेशल डिश” म्हणून भरली वांगी नेहमीच पहिल्या पसंतीने दिली जाते.लग्नसमारंभ, वाढदिवस, नामकरण, गृहप्रवेश अशा विविध कार्यक्रमांमध्येवांग्याच्या भाजीची मागणी जास्त असते.

भरली वांगी / वांगं मसाला – टिप्स Tasty Brinjal Masala Recipe

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

पारंपरिक चमचमीत भरलं वांग्याची भाजी|Tasty Brinjal Masala Recipe

✔️ 1. वांगी निवडताना

टवटवीत, गडद जांभळ्या रंगाची आणि देठ हिरवा असलेली वांगी निवडा.

  • हलकी वांगी घ्या—यात बिया कमी असतात आणि भाजी मऊ होते.

✔️ 2. कट देताना काळजी

  • वांग्याला क्रॉस कट देताना देठ पूर्ण कापू नका.

  • देठ राहिला की वांगी शिजताना फुटत नाहीत आणि मसाला व्यवस्थित राहतो.

✔️ 3. मसाला घट्ट असावा

  • मसाल्यात पाणी कमी घालून तो घट्ट ठेवा.

  • पातळ मसाला भरला तर शिजताना वांग्यातून बाहेर येतो.

✔️ 4. शेंगदाणा कूट महत्वपूर्ण

  • भाजलेला, सुगंधी शेंगदाणा कूट वापरला तर मसाल्याची चव दुप्पट वाढते.

  • शेंगदाणा कूट भाजीला छान दाटपणा आणि खमंगपणा देतो.

✔️ 5. कांदा बारीक चिरलेला असावा

  • मोठे तुकडे राहिले तर मसाला नीट तयार होत नाही.

  • बारीक चिरलेला कांदा मसाल्यात नीट मिसळतो.

✔️ 6. लसूण सुगंध वाढवतो

  • लसूण कुटून वापरल्यास मसाल्याचा सुगंध जास्त उठून दिसतो.

✔️ 7. मसाला आधी परतणे महत्वाचे

  • उरलेला मसाला तेलात परतल्यावर त्याला उत्तम रंग आणि चव येते.

  • कच्चा स्वाद निघून जातो आणि मसाला छान खमंग होतो.

✔️ 8. वाफ देणे आवश्यक

  • वांगी घातल्यानंतर झाकण ठेवून पहिले 3–4 मिनिटे वाफ दिली तर ती लवकर मऊ होतात.

✔️ 9. गरम पाणीच वापरा

  • थंड पाणी घातल्यास वांगी कडक होतात.

  • गरम पाणी घातल्यामुळे शिजवण प्रक्रिया समान होते.

✔️ 11. मसाला चांगला लागण्यासाठी

  • भाजी शिजली की शेवटी कोथिंबीर टाकल्याने स्वाद वाढतो.

  • गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटे झाकण ठेवल्यास मसाला छान मुरतो.

✔️ 12. भाकरीसोबत सर्वात बेस्ट

  • भरली वांगी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत सर्वाधिक चविष्ट लागते.

Leave a Comment