Homemade Tasty Methi Parathe|स्वादिष्ट मेथीचे पराठे2025
Homemade Tasty Methi Parathमेथी पराठा हा चविष्ट आणि पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ असून तो नाश्ता, जेवण किंवा डब्यासाठी नेहमीच पसंतीचा असतो. ताज्या हिरव्या मेथीची किंचित कडसर चव, योग्य मसाल्यांची सांगड आणि गहू आणि बेसन पिठाची मऊसर कणीक यामुळे हा पराठा अतिशय रुचकर लागतो. कमी वेळात तयार होणारा हा पराठा आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. Homemade Tasty Methi Paratheघरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारा मेथी पराठा रोजच्या स्वयंपाकात एक पौष्टिक आणि चवदार बदल म्हणून नक्कीच करून पाहावा असा आहे.नेहमीची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो आणि मग काहीतरी वेगळं, चविष्ट पण तरीही घरगुती खावंसं वाटतं. अशावेळी मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. रोजच्या भाजी-पोळीपेक्षा वेगळी चव देणारा, पण तितकाच पौष्टिक आणि पोटभरून तृप्त करणारा हा पदार्थ अगदी सहज करता येतो. भाजीऐवजी किंवा भाजीसोबत बदल म्हणून मेथी पराठा केला तर जेवणात नवा स्वाद येतो आणि खाण्याची मजाही वाढते.
साहित्य:
Homemade Tasty Methi Parathe
- गव्हाचं पीठ – २ कप
- मेथीची पाने ( बारीक चिरलेली) – १½ कप
- तिखट – १ टीस्पून
- हळद – ¼ टीस्पून
- धणेपूड – १ टीस्पून
- ओवा – चिमूटभर
- जिरे – चिमूटभर
- लसूण-हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून
- पांढरे तीळ – १ टेबलस्पून
- बेसन –२ टेबलस्पून
- मैदा -२ टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल/तूप – भाजण्यासाठी
- पाणी – आवश्यकतेनुसार
कृती:
Homemade Tasty Methi Parathe
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Step 1: मेथीची तयारीHomemade Tasty Methi Parathe
मेथी आणली कि सुरुवातीला मेथी स्वच्छ निवडून घ्यायची पराठ्यासाठी फक्त पाने निवडून घ्यायची. ती स्वच्छ धुऊन थोडी निथळून घ्यायची . नंतर पाने बारीक चिरून घ्यायची.
Step 2: कोरडे साहित्य मिसळणे
एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. त्यात बेसन,मैदा , तिखट, हळद, धणेपूड, ओवा, जिरे, पांढरे तीळ आणि मीठ घालून सगळं कोरडं साहित्य नीट मिसळा.
Step 3: मसाल्याची चव वाढवणे
आता तयार केलेल्या पिठात लसूण-हिरवी मिरची पेस्ट घाला. यामुळे पराठ्याला छान चव आणि सुगंध येतो.
Step 4: मेथी घालणे
मसाल्याच्या पिठात चिरलेली मेथी घालायची . आधी थोडंसं पाणी शिंपडा आणि मेथी पिठात नीट मिसळा. मेथीमधून ओलावा सुटतो, त्यामुळे पाणी कमी लागते.त्यामुळे आवश्यकतेवर पाणी घालायचे.
Step 5: कणीक मळणे
थोडं-थोडं पाणी घालत जरा घट्ट कणीक मळा. ही कणीक नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट असावी.
Step 6: तेल घालून कणीक मळणे
कणकेत सुमारे १ ते २ टीस्पून तेल घालून पुन्हा एकदा नीट मळून घ्यायचे . व नंतर कणीक १५–२० मिनिटं झाकून ठेवायची .
यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतात.
Step 8: गोळे तयार करणे
नंतर कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे उरलेले गोळे झाकून ठेवा.
Step 9: पराठे लाटणे
एक गोळा घ्या, कोरड्या पिठात घोळवा आणि जरा जाडसर पराठा लाटून घ्या. फार पातळ लाटू नका.
Step 10: पराठा भाजणे
गरम तव्यावर पराठा टाका. वर फुग्या दिसू लागल्या की पराठा पलटा आणि दुसऱ्या बाजूने भाजा.
Step 11: तूप/तेल लावणे
एका बाजूला थोडं तूप किंवा तेल लावा, पराठा उलटवा आणि छान खरपूस भाजा. दुसऱ्या बाजूलाही तूप/तेल लावून दोन्ही बाजूंनी पराठा नीट भाजा.
Step 12: सर्व्ह करणे

Homemade Tasty Methi Parathe
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
पराठा दोन्ही बाजूंनी छान भाजून झाला की सर्व्हिंग डिशमध्ये काढा. अशाच पद्धतीने उरलेले पराठे तयार करा.गरमागरम मेथी पराठा लोणी, दही, चटणी किंवा लोणच्यासोबत छान लागतो.
हे पराठे २–३ दिवस टिकतात, त्यामुळे डबा किंवा प्रवासासाठीही उत्तम आहेत.
मेथी पराठा हा चविष्ट आणि पौष्टिक असा पारंपरिक पदार्थ असून तो नाश्ता, जेवण किंवा डब्यासाठी नेहमीच पसंतीचा असतो. ताज्या हिरव्या मेथीची किंचित कडू चव, योग्य मसाल्यांची सांगड आणि गव्हाच्या पिठाची मऊसर कणीक यामुळे हा पराठा अतिशय रुचकर लागतो. कमी वेळात तयार होणारा हा पराठा आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनणारा मेथी पराठा रोजच्या स्वयंपाकात एक पौष्टिक आणि चवदार बदल म्हणून नक्कीच करून पाहावा असा आहे.
Homemade Tasty Methi Parathe
नेहमीची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो आणि मग काहीतरी वेगळं, चविष्ट पण तरीही घरगुती खावंसं वाटतं. अशावेळी मेथी पराठा हा एक उत्तम पर्याय ठरतो. रोजच्या भाजी-पोळीपेक्षा वेगळी चव देणारा, पण तितकाच पौष्टिक आणि पोटभरून तृप्त करणारा हा पदार्थ अगदी सहज करता येतो. भाजीऐवजी किंवा भाजीसोबत बदल म्हणून मेथी पराठा केला तर जेवणात नवा स्वाद येतो आणि खाण्याची मजाही वाढते.