Masaledar Aloo Paratha|मसालेदार आलू पराठा १० मिनिटात

Masaledar Aloo Paratha|मसालेदार आलू पराठा १० मिनिटात

Masaledar Aloo Parathaआलू पराठा हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मसालेदार बटाट्याच्या स्टफिंगने भरलेला हा पराठा खाल्ला की पोटभर तृप्ती मिळते. गरमागरम तव्यावर भाजलेला आलू पराठा, त्यावर थोडंसं लोणी आणि बाजूला दही किंवा लोणचं असलं की साधा नाश्ताही खास बनतो. जरी अनेकांना आलू पराठा बनवणं अवघड वाटत असलं, तरी योग्य पद्धत आणि थोड्या सरावाने हा पराठा Masaledar Aloo Parathaघरी सहज करता येतो. चव, पौष्टिकता आणि परंपरेचा सुंदर संगम असलेला आलू पराठा आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मानाचं स्थान राखून आहे.Masaledar Aloo Paratha

साहित्य:  Masaledar Aloo Paratha

मैदा – १/२ कप

गव्हाचे पीठ – २ कप

हिरव्या मिरच्या – २

लसूण पाकळ्या – २

तेल – ४ टीस्पून

आलं – १ इंचाचा तुकडा

चवीनुसार मीठ

लिंबाचा रस – २ टीस्पून

कोथिंबीर – बारीक चिरलेली

पाणी – आवश्यकतेनुसार

जिरेपूड – १ टीस्पून

ओवा – ½ टीस्पून

बटाटे – २ ते ३(उकडून खिसलेले )

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कृती :  Masaledar Aloo Paratha

स्टेप १-कणिक मळणे
सुरुवातीला एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि मैदा चाळून घ्यायचा . त्यात चवीनुसार मीठ घालून नीट मिसळा. आता त्यात गरम तेल घाला आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करा. नंतर हळूहळू पाणी घालत मऊ कणीक मळून घ्या. कणीक फार कडक किंवा फार सैल नसावी; ती मऊ आणि लवचिक असावी. मळलेली कणीक झाकून साधारण ३० मिनिटे बाजूला ठेवा.

स्टेप २-स्टफिंग तयार करणे
मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्यायच्या. कढईत तेल गरम करून त्यात ही वाटलेली पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर हळद घाला. नंतर उकडून खिसलेले बटाटे घालून सगळं नीट मिसळा. शेवटी लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून स्टफिंग एकत्र करा.वरून त्यामध्ये जिरेपूड ,ओवा ,कोथिंबीर घाला. स्टफिंग कोरडी आणि छान मसालेदार असावी.

स्टेप ३-पराठा लाटणे
कणकेचा थोडा मोठा गोळा घ्या. तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि लाटण्याने मध्यम आकाराची पोळी लाटा. किंवा ( पुरणपोळी करताना कणकेमध्ये पूरण भरताना जसा साचा बनवतो तसा साचा बनवून घ्यायचा) त्यावर तयार केलेली बटाट्याची स्टफिंग ठेवायचे . आता पोळीच्या कडा हळूच वर खेचून मधोमध आणा आणि बोटांच्या टोकांनी नीट बंद करा. पोळी फुटू नये याची काळजी घ्या.

बंद केलेला गोळा हलक्या हाताने पुन्हा लाटून घ्या. लाटताना थोडं पीठ भुरभुरवा, म्हणजे पराठा पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटणार नाही. स्टफिंग बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.

स्टेप ४ -पराठा भाजणे
तवा चांगला गरम करून त्यावर पराठा ठेवा. थोडं तेल पराठ्यावर शिंपडा. पराठा ३ ते ४ वेळा उलटवून मध्यम आचेवर भाजा, जेणेकरून तो जळणार नाही आणि दोन्ही बाजूंनी चांगला भाजला जाईल

स्टेप ५ – पराठा भाजून झाले कि त्यावर थोडेसे लाल तिखट भुरभुरायचे आणि थोडेसे साजूक तूप घालून भाजायचे अशाप्रकारे आपला

गरमागरम आलू पराठा तयार होतो.

 अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

आलू पराठा टिप्स  : 

Masaledar Aloo Paratha

  1. आलू सालासकट उकडा
    आलू सोलून उकडल्यास ते पाणचट होतात. सालासकट उकडल्याने आलू कोरडे राहतात आणि भरणं घट्ट बनतं.

  2. आलू पूर्ण थंड झाल्यावरच कुस्करा
    गरम आलू मॅश केल्यास ओलावा सुटतो, त्यामुळे पराठा लाटताना फुटतो.

  3. गाठी नसतील असं बारीक मॅश करा
    आलू अगदी स्मूद मॅश असतील तर भरणं पराठ्यात समान पसरतं.

  4. मीठ शेवटी घाला
    मीठ लवकर घातल्यास आलू पाणी सोडतात आणि भरणं ओलसर होतं.

  5. मसाल्याचं प्रमाण संतुलित ठेवा
    फार मसाले घातल्यास आलू पराठ्याची मूळ चव दडपली जाते.

  6. लिंबाचा रस/आमचूर शेवटी वापरा
    यामुळे भरण्याला ताजेपणा आणि छान चव येते.

  7. कणिक मऊ पण चिकट नसावी
    घट्ट कणिक असल्यास पराठा कडक होतो, तर सैल कणिक लाटताना फाटते.

  8. कणिक 20–30 मिनिटे झाकून ठेवा
    पीठ मुरल्यामुळे पराठे जास्त मऊ आणि लवचिक होतात.

  9. भरणं नीट बंद करा
    कडा व्यवस्थित बंद केल्यास लाटताना भरणं बाहेर येत नाही.

  10. पराठा हलक्या हाताने लाटा
    जास्त दाब दिल्यास भरणं बाहेर येण्याची शक्यता वाढते.

  11. तवा मध्यम आचेवर तापवा
    फार जास्त आचेवर पराठा जळतो आणि आतून कच्चा राहतो.

  12. आधी कोरडा भाजा, नंतर तेल/तूप लावा
    यामुळे पराठा आतून नीट शिजतो आणि वरून कुरकुरीत होतो.

  13. दोन्ही बाजूंना सोनेरी डाग येईपर्यंत भाजा
    हाच परफेक्ट भाजणीचा संकेत आहे.

  14. गरमागरमच सर्व्ह करा
    लोणी/तूप, दही किंवा लोणच्यासोबत आलू पराठा जास्त स्वादिष्ट लागतो.

Leave a Comment