Lemon Syrup Recipe|लिंबू सरबत सिरप
Lemon Syrup Recipeआज आपण बनवणार आहोत पटकन तयार होणारा लिंबू सरबत सिरप. ही रेसिपी खूपच सोपी, जलद आणि कमी कष्टाची आहे. हिवाळ्यात लिंबं स्वस्त दरात सहज मिळतात, त्यामुळे याच वेळी हा सिरप तयार करून ठेवा आणि उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबताचा मनसोक्त आनंद घ्या. या रेसिपीसाठी फार वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनतही करावी लागत नाही. सगळे साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते. हे लिंबू सरबत सिरप Lemon Syrup Recipeतुम्ही वर्षभर सहज साठवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा काही सेकंदांत सरबत तयार करू शकता. लिंबू सरबत हे सगळ्यांचेच आवडते पेय आहे. कधी अचानक सरबत प्यावेसे वाटते, पण घरी लिंबं नसतात किंवा वेळ कमी असतो. अशा वेळी हा तयार सिरप तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे.उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला ताजेतवाने आणि ऊर्जा देणारे पेय म्हणजे लिंबू सरबत. आंबट-गोड चवीचे हे सरबत क्षणात तहान भागवतेच, पण थकवा कमी करून शरीराला गारवा देते. लिंबामधील नैसर्गिक व्हिटॅमिन C, मीठ आणि साखरेचे योग्य प्रमाण शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. Lemon Syrup Recipeघरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार होणारे हे पारंपरिक पेय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.ही खरंच खूप झटपट बनणारी रेसिपी आहे. अतिशय सोपी आणि सहज तयार होणारी ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते, कारण अनेकदा अचानक लिंबू सरबत प्यावेसे वाटते. पण लिंबं पिळणे, साखर घालणे आणि सरबत तयार करणे हा प्रकार थोडा वेळखाऊ असतो.त्यामुळे आपण इच्छा असताना पण कंटाळा करतो म्हणून सरबत पिऊ शकत नाही पण जर हा सिरप आधीच तयार करून ठेवला, तर काही क्षणांतच थंडगार सरबत सर्व्ह करता येते. Lemon Syrup Recipeहिवाळ्यात लिंबं स्वस्त दरात उपलब्ध असतात, त्यामुळे आत्ताच हा सिरप करून ठेवा आणि उन्हाळ्यासाठी पूर्ण तयारी ठेवा!
साहित्य (Ingredients):Lemon Syrup Recipe
Lemon Syrup Recipe|लिंबू सरबत सिरप
- साखर – २ कप
- पाणी – १ कप
- लिंबाचा रस – १ कप

Instant Lemon Syrup Recipe
कृती :(step by step process)Lemon Syrup Recipe
Lemon Syrup Recipe|लिंबू सरबत सिरप
स्टेप 1: सुरुवातीला मध्यम आचेवर एक कढई गरम करा आणि त्यात साखर व पाणी घाला.
स्टेप 2: साखर व पाणी व्यवस्थित मिसळा आणि मध्यम आचेवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत शिजवा.शिजवताना चमच्याने हलवत रहा .
स्टेप 3: साखर पूर्ण विरघळल्यानंतर गॅस कमी आचेवर ठेवा आणि सिरप अजून ५ ते १० मिनिटे शिजू द्या.
स्टेप 4: सिरपची पाकाची घट्टपणा तपासा. चमच्यातून शेवटचा थेंब पडताना एक तारा तयार होत असेल, तर सिरप तयार झाला आहे.
स्टेप 5: गॅस बंद करा आणि सिरप पूर्णपणे थंड होऊ द्या.
स्टेप 6: सिरप थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घाला आणि छान मिसळा. मिश्रण चांगले एकत्रित झाले पाहिजे. अशाप्रकारे लिंबू सरबत सिरप तयार आहे.
स्टेप ७:तयार केलेले सिरप स्वच्छ काचेच्या बरणीत घट्ट झाकण लावून फ्रिज मध्ये ठेवावे .
स्टेप 7: सरबत बनवताना तयार सिरप, मीठ आणि पाणी एकत्र करून नीट मिसळा आणि लगेच सर्व्ह करा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
लिंबू सरबत सिरपसाठी उपयुक्त टिप्स:Lemon Syrup Recipe
- साखर आणि पाणी शिजवताना गॅस मध्यम आचेवर ठेवावे , जास्त आचेवर पाक जळू शकतो.
- पाक ढवळताना साखर पूर्ण विरघळली आहे याची खात्री करा, नाहीतर सिरपमध्ये साखरेचे कण राहू शकतात.
- एकतारी पाक झाला की मगच गॅस बंद करा. फार घट्ट पाक झाला तर सरबत करताना नीट मिसळत नाही.त्यामुळे पाक करताना लक्ष द्यावे लागते .
- लिंबाचा रस सिरप पूर्ण थंड झाल्यावरच घाला, नाहीतर चव कडू होऊ शकते.
- सिरप साठवण्यासाठी नेहमी स्वच्छ व कोरडी काचेची बाटली वापरा.
- सिरप फ्रिजमध्ये ठेवल्यास तो जास्त काळ टिकतो आणि रंगही चांगला राहतो.
- सरबत करताना चवीनुसार मीठ किंवा काळं मीठ घालू शकता.
- थंडगार सरबत बनवताना पाण्याबरोबर बर्फ वापरू शकता किंवा मग पाण्याऐवजी सोडा वापरल्यास छान चव येते.