Healthy Palak Paratha|पालक पराठा रेसिपी2025
Healthy Palak Parathaपालक पराठा हा आरोग्यदायी, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असा पदार्थ आहे. हिरव्यागार ताज्या पालकांपासून तयार होणारा हा पराठा लोह, जीवनसत्त्वे व फायबरने समृद्ध असल्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरतो. रोजच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा झटपट जेवणासाठी पालक पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. दही, लोणचं किंवा लोणीसोबत खाल्यास त्याची चव अजूनच खुलून येते आणि पराठ्याची चव खास बनते.Healthy Palak Parathaपालक पराठा केवळ चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. पालक ही लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (विशेषतः A, C आणि K) व फायबरने समृद्ध आहे, जी रक्ताची निर्मिती, हाडांची मजबुती आणि पचनप्रक्रियेसाठी लाभदायक ठरते. नियमितपणे पालक पराठा सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता कमी होते आणि ऊर्जा टिकवण्यास मदत होते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचा व डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, तर फायबरमुळे पचनसंस्था सुरळीत चालते. Healthy Palak Parathaतसेच, पालकाचे औषधी गुण हृदयसंबंधी समस्या, उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे पालक पराठा हा स्वादिष्ट तर आहेच त्याचबरोबर शरीरासाठी नैसर्गिक पौष्टिकता प्रदान करणारा पदार्थही आहे.त्यामुळे हा चवदार असा पालक पराठा नक्की करून बघा.Healthy Palak Paratha
पालक पराठा – साहित्य :Healthy Palak Paratha
- गव्हाचे पीठ – २ कप
- बेसनपीठ -२ ते ३ टीस्पून
- मैदा – २ टीस्पून
- बारीक चिरलेली पालक – १ ते १½ कप
- हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली / वाटलेली)
- आलं – १ टीस्पून (किसलेलं)
- जिरे – ½ टीस्पून
- हळद – ¼ टीस्पून
- लाल तिखट – ½ टीस्पून (चवीनुसार)
- मीठ – चवीनुसारHealthy Palak Paratha
- तेल / तूप – २ टीस्पून (कणीक मळण्यासाठी व भाजण्यासाठी)
- पाणी – आवश्यकतेनुसार

palak
पालक पराठा – कृती :Healthy Palak Paratha
Step 1: पालक स्वच्छ करणे
सर्वप्रथम ताजी, कोवळी पालक घ्या. ती निवडून २–३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा, पाणी निथळू द्या आणि नंतर बारीक चिरून ठेवा. ताजी पालक वापरल्याने पराठ्याला छान रंग व चव येते.
Step 2: पीठात साहित्य मिसळणे
एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ,बेसनपीठ ,मैदा घ्या. त्यात बारीक चिरलेली पालक, हिरवी मिरचीची पेस्ट , किसलेलं आलं, जिरे, हळद, लाल तिखट व मीठ घाला. सर्व मसाले नीट मिसळा, जेणेकरून चव समान पसरते.
Step 3: कणीक मळणे
आता थोडं-थोडं पाणी घालत मऊ आणि लवचिक कणीक मळा. पालक आधीच थोडा ओलसर येते, त्यामुळे पाणी जपून वापरा. कणीक फार घट्ट किंवा फार सैल नसावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Step 4: कणीक भिजवणे
मळलेल्या कणकेवर थोडं तेल लावून ती १०–१५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे कणीक मऊ होते आणि पराठे लाटायला सोपे जातात.
Step 5: गोळे तयार करणे
कणीक थोडी मळून मध्यम आकाराचे समान गोळे तयार करा.
Step 6: पराठे लाटणे
प्रत्येक गोळा थोड्या कोरड्या पिठात घोळवून लाटण्याने हळूवार गोल पराठा लाटा. पराठा जास्त पातळ लाटू नका .
Step 7: पराठा भाजणे
तवा मध्यम आचेवर गरम करा. थोडेसे तेल लावून ग्रीस करून घ्या त्यावर लाटलेला पराठा टाका. खालची बाजू थोडी भाजल्यावर पराठा उलटा करा.
Step 8: तेल/तूप लावणे
दोन्ही बाजूंनी थोडं तेल किंवा तूप लावा आणि पराठ्याला सोनेरी रंग येईपर्यंत नीट भाजा. यामुळे पराठा खमंग आणि चविष्ट होतो.
Step 9: सर्व्ह करणे
अशाप्रकारे आपले गरमागरम पालक पराठे तयार होतात. हे पराठे दही, लोणचं, चटणी किंवा लोणीसोबत नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम लागतात.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
पालक पराठा टिप्स : Healthy Palak Paratha
- पालक पराठा बनवताना काही सोपे आणि उपयुक्त टिप्स लक्षात ठेवले तर पराठा आणखी स्वादिष्ट आणि पोषक होतो:
- पालक निवडताना – पालक घेताना कोवळा ,ताजा पालक वापरा.
पालकाची स्वच्छ करणे – पालक नीट स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या, त्यामुळे त्यामध्ये पाणी राहणार नाही. - कणीक मळताना – थोडं-थोडं पाणी घाला, जास्त पाणी दिल्यास पराठा जास्त मऊ आणि पातळ होतो.
- पराठा लाटताना – पराठा जास्त पातळ न लाटता , थोडा जाड ठेवला तर भाजताना चांगला खमंग लागतो.
- तव्यावर भाजताना – मध्यम आचेवर पराठा भाजा, मोठया आचेवर Healthy Palak Parathaभाजल्यास आतली बाजू नीट भाजली जात नाही. आणि पराठा आतून कच्चा राहू शकतो.
- तेल/तूप – भाजताना थोडंसं तूप किंवा तेल पराठ्यावर लावा, त्यामुळे पराठा बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ राहतो.
- सर्व्ह करताना – गरमागरम पराठा दही, लोणचं किंवा लोणीसोबत द्या, चव दुपटी होते.
- आवडीनुसार मसाले – लाल तिखट, हिंग किंवा गरम मसाला घालून चव वाढवता येते.