Bajri Bhakri Recipe in Marathi|बाजरी भाकरी रेसिपी

Bajri Bhakri Recipe in Marathi|बाजरी भाकरी रेसिपी

Bajri Bhakri Recipe ग्रामीण महाराष्ट्राची ओळख असलेली बाजरी भाकरी ही केवळ चविष्टच नाही तर अत्यंत पौष्टिक अशी पारंपरिक भाकरी आहे. थंडीच्या दिवसांत विशेषतः खाल्ली जाणारी बाजरी भाकरी शरीराला उष्णता देते, पचनशक्ती सुधारते आणि दीर्घकाळ पोटभरल्यासारखे ठेवते. ठेचा, झुणका, उसळ किंवा भाजीसोबत बाजरी भाकरीची चव अप्रतिम लागते.बाजरी भाकरी हे असेच एक पारंपरिक व आरोग्यदायी अन्न असल्यामुळे मकरसंक्रांतीला तिचे विशेष महत्त्व आहे.Bajri Bhakri Recipe मकरसंक्रांतीला तीळ, गूळ यांसारख्या पदार्थांबरोबरच बाजरी भाकरी, झुणका, ठेचा, उसळ असा पारंपरिक जेवणाचा बेत असतो. हे पदार्थ एकत्रितपणे शरीराला उष्णता देतात व आरोग्य टिकवण्यास मदत करतात. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या सणात बाजरी भाकरी ही केवळ अन्न नसून परंपरा, आरोग्य आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाते.आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजरी भाकरी कशी बनवायची ते पाहूया.Bajri Bhakri Recipe

बाजरीची भाकरी (साहित्य)

  1. बाजरीचे पीठ
  2. आवश्यकतेनुसार पाणी
    Bajri
    Bajri

    बाजरीच्या भाकरीची तयार करण्याची कृती

    स्टेप १ : पीठ भिजवणेBajri Bhakri Recipe
    एका परातीत बाजरी पीठ चाळून घ्यायचे .पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पिठामध्ये थोडे थोडे पाणी टाकून पीठ मध्यम असे मळून घ्यायचे . पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावे.

    स्टेप २ : भाकरी थापणे
    मळलेल्या पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घ्या. तो कोरड्या पिठात घोळवा. नंतर परातीमध्ये चाळणीने थोडे पीठ भुरभुरायचे आणि हाताने अलगद भाकरी थापायची. कडा तुटू नयेत याची काळजी घ्या.

    स्टेप ३ : भाकरी भाजणे
    तवा मध्यम आचेवर गरम करा. नंतर थापलेली भाकरी अलगद उचलून गरम तव्यावर टाकायची तव्यावर टाकल्यावर संपूर्ण भाकरीला पाणी लावायचे आणि उलथन्याये वरची बाजू खाली करून भाकरी तव्यावर टाकायची  दुसऱ्या बाजूनेही नीट भाजा. हवे असल्यास थेट आचेवर धरून भाकरी फुलवा.

    स्टेप ४ : सर्व्ह करणे
    तयार झालेल्या बाजरी भाकरीवर थोडे लोणी किंवा तूप लावा. गरमागरम भाकरी झुणका, पिठलं, ठेचा किंवा भाजीसोबत सर्व्ह करा.

    बाजरी आरोग्यासाठी कशी उपयुक्त आहेBajri Bhakri Recipe

    बाजरी (Bajra) हे एक अतिशय पौष्टिक व आरोग्यदायी धान्य आहे. विशेषतः हिवाळ्यात बाजरीचे सेवन केल्यास शरीराला उष्णता मिळते आणि आजारांपासून संरक्षण होते. ग्रामीण व पारंपरिक आहारात बाजरीला महत्त्वाचे स्थान आहे.

    १. शरीराला उष्णता देते
    बाजरीचा उष्ण गुणधर्म थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवतो आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करतो.

    २. पचनशक्ती सुधारते
    बाजरीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुरळीत होते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलके राहते.

    ३. मधुमेहासाठी फायदेशीर
    बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्यामुळे डायबेटीस असणाऱ्यांसाठी बाजरी उपयुक्त ठरते.

    ४. वजन नियंत्रणात मदत
    बाजरी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही व दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

    ५. हाडे मजबूत करते
    बाजरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस असल्यामुळे हाडे व दात मजबूत राहतात.

    ६. हृदयासाठी चांगली
    बाजरी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.

    ७. ऊर्जादायक धान्य
    बाजरीत लोह, प्रथिने व जीवनसत्त्वे असल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते व थकवा कमी होतो.

    बाजरी वापरताना उपयुक्त  टिप्स :Bajri Bhakri Recipe

    बाजरी हे पौष्टिक धान्य असले तरी योग्य पद्धतीने वापरल्यासच त्याचे संपूर्ण आरोग्यदायी फायदे मिळतात. बाजरीचे पीठ वापरताना ते नेहमी ताजे असावे. जुने पीठ असल्यास भाकरी कडक होते व पचनास जड जाते. शक्य असल्यास बाजरी दळून लगेच पीठ वापरणे अधिक चांगले ठरते.                                                                                                                          अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

    बाजरीचे पीठ मळताना कोमट पाणी वापरल्यास पीठ मऊ होते आणि भाकरी थापायला सोपी जाते. पीठ फार घट्ट किंवा फार सैल नसावे; योग्य मऊसर घट्टपणा ठेवल्यास भाकरी छान मऊ होते. भाकरी थापताना हात ओले करून थापल्यास कडा तुटत नाहीत व भाकरी गोलाकार बनते.

    बाजरी भाकरी भाजताना तवा मध्यम आचेवर गरम असावा. जास्त आचेवर भाकरी भाजल्यास ती लवकर जळते आणि आतून कच्ची राहते. भाकरी उलटताना थोडे पाणी शिंपडल्यास ती मऊ राहते. शेवटी थेट आचेवर धरून फुलवली तर भाकरी अधिक चविष्ट लागते.                                                                                                                                                           अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

    बाजरी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे तिचे सेवन हिवाळ्यात अधिक फायदेशीर असते. उन्हाळ्यात बाजरी खाल्ली तरी ताक, दही किंवा भाजीसोबत खाल्ल्यास शरीरावर उष्णतेचा त्रास होत नाही. बाजरी भाकरीसोबत ठेचा, झुणका, पिठलं किंवा भाजी घेतल्यास जेवण संतुलित व पौष्टिक होते.

Leave a Comment