Healthy Tilachi vadi Recipe in 10 Minutes| तिळाची वडी2026

Healthy Tilachi vadi Recipe in10 Minutes| तिळाची वडी2026 

Healthy Tilachi vadi मकरसंक्रांती म्हटली की तिळाच्या वड्यांचा खास गोडवा प्रत्येक घरात हमखास असतो. तिळ, गूळ  आणि शेंगदाणे  यांचे अप्रतिम मिश्रण म्हणजेच तिळाच्या वड्या. या वड्या बनवायला अतिशय सोप्या असून योग्य प्रमाण आणि योग्य वेळेवर केलेली प्रक्रिया वड्यांना परफेक्ट चव व आकार देते. आज आपण पारंपरिक पद्धतीने, खमंग आणि कुरकुरीत अशा तिळाच्या वड्या घरी कशा बनवायच्या ते पाहणार आहोत.Healthy Tilachi vadiतिळाची वडी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. तिळ आणि गूळ या दोन्ही घटकांमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असल्यामुळे तिळाची वडी शरीराला उष्णता व ऊर्जा देते. तिळामधील कॅल्शियम, लोह व चांगले स्निग्ध पदार्थ हाडे मजबूत ठेवण्यास, रक्तवाढीस आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, तर गूळ पचनशक्ती सुधारून थकवा दूर करतो. हिवाळ्यात तिळाची वडी खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते तसेच त्वचा व केस निरोगी राहतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास तिळाची वडी ही चविष्ट आणि पौष्टिक अशी आरोग्यदायी पदार्थ ठरते.

साहित्य (Ingredients)Healthy Tilachi vadi

  1. १ कप गूळ (किसलेला)

  2. १/२ कप पांढरे तीळ

  3. १/२ कप शेंगदाण्याचा कूट

  4. १ चमचा तूप

  5. १/२ चमचा वेलची पूड

  6. चिमूटभर जायफळ पूड (ऐच्छिक)

  7. तूप – ताटाला लावण्यासाठी

    कृती :Healthy Tilachi vadi

    Step 1: तीळ आणि शेंगदाणे भाजणे

    सुरुवातीला मध्यम आचेवर कढई गरम करून घ्या . त्यामध्ये १/२ कप पांढरे तीळ घालून मंद आचेवर सतत हलवत ५–६ मिनिटे भाजा. तीळ हलके सोनेरी रंगाचे झाले की गॅस बंद करा. जास्त मोठया आचेवर तीळ भाजू नका, नाहीतर तीळ जळतील आणि चवही कडसर लागते . तीळ भाजून झाले कि एका प्लेटमध्ये तीळ काढून घ्यायचे व नंतर मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे .

    Step 2: मिश्रण तयार करणे

    तीळ आणि शेंगदाणे थंड झाले कि मिक्सरच्या भांड्यात आधी भाजलेले शेंगदाणे घालायचे व बारीक कूट करून घ्यायचा व नंतर तीळ बारीक करायचे . तिळाची बारीक पूड होऊ नये म्हणून फक्त १ मिनिट मिक्सरवर फिरवा. मिश्रण थोडे खरबरीतच ठेवा.

    Step 3: तयारी करून ठेवणे

    एक ताट घ्या ,त्यावर एक चमचा साजूक तूप लावायचे . कढई, साहित्य सर्व जवळ ठेवा कारण पुढची प्रक्रिया पटकन करावी लागते.

    Step 4: गूळ वितळवणे Healthy Tilachi vadi

    कढईत १ कप किसलेला गूळ घाला आणि मध्यम आचेवर वितळू द्या. गूळ पूर्ण वितळला आणि फेस यायला लागला कि लगेच गॅस बंद करा.

    Step 5: सर्व साहित्य मिसळणे

    वितळलेल्या गुळात १ चमचा तूप घालून नीट मिसळा. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि तीळ मिश्रण, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून झटपट ढवळा.

    Step 6:वडीचा बेस तयार करणे Healthy Tilachi vadi

    हे मिश्रण लगेच तुप लावलेल्या ताटात ओता. वाटीच्या सहाय्याने चौरस किंवा गोलाकार आकारात पसरवायचे .

    Step 8: वड्या कापणे

    ५ मिनिटे थंड होऊ द्या आणि मग सुरीने वड्या कापा. पूर्ण थंड झाल्यावर वड्या अलगद काढा.

                            अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

    तिळाच्या वड्या बनवताना उपयुक्त टिप्स:Healthy Tilachi vadi

    1. तीळ भाजण्याची योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे.
      तीळ नेहमी मध्यम आचेवरच भाजावेत. सतत हलवत भाजल्यास तीळ समान रीतीने सोनेरी रंगाचे होतात. जास्त आचेवर भाजल्यास तीळ लगेच जळतात आणि वड्यांना कडू चव येऊ शकते.

    2. तीळ आणि  शेंगदाणे पूड न करता खरबरीत ठेवा.
      मिक्सरमध्ये हे मिश्रण फक्त १–२ पल्स द्या. तीळ आणि नारळाची बारीक पूड झाली तर वड्या चिकट आणि जड होतात. खरबरीतपणा राहिला तर वड्यांना छान टेक्सचर मिळते.
    3. गूळ वितळवताना पाक करू नका.
      गूळ फक्त वितळेपर्यंतच गरम करावा. पाक झाला तर वड्या खूप कडक होतात. गूळ वितळताच लगेच गॅस बंद करणे

    4. सर्व साहित्य पटकन मिसळा.
      गूळ गरम असतानाच शेंगदाण्याचा कूट, तीळ मिश्रण आणि मसाले घालून झटपट ढवळणे आवश्यक आहे. उशीर झाला तर मिश्रण घट्ट होऊन पसरवणे कठीण जाते.

    5. ताट आधीच तुपाने माखून ठेवा.
      वड्या पसरवण्यासाठीचे ताट आधी तयार ठेवले तर मिश्रण सहज पसरते आणि वड्या ताटाला चिकटत नाहीत.

    6. वड्या पसरवताना हाताला किंवा वाटीला तूप लावा.
      मिश्रण गरम आणि चिकट असते, त्यामुळे वाटी किंवा हाताला थोडे तूप लावल्यास वड्या नीट चौरस आकारात पसरवता येतात.Healthy Tilachi vadi

    7. वड्या कापण्याची वेळ योग्य ठेवा.
      मिश्रण पूर्ण थंड होण्याआधी, साधारण ५ मिनिटांत वड्या कापाव्यात. खूप थंड झाल्यावर कापल्यास वड्या तुटू शकतात.

    8. चव वाढवण्यासाठी मसाल्यांचा योग्य वापर करा.
      वेलची आणि थोडेसे जायफळ घातल्याने वड्यांना पारंपरिक सुगंध येतो आणि चव अधिक खुलते.

    9. साठवणूक योग्य पद्धतीने करा.          अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा 
      पूर्ण थंड झालेल्या वड्या हवाबंद डब्यात ठेवल्यास १०–१२ दिवस टिकतात आणि त्यांची चव तशीच राहते.

Leave a Comment