Instant Matar Masala Puri|झटपट बनणारी चविष्ट मटर पुरी
Instant Matar Masala Puriमटर पुरी हा पारंपरिक पुऱ्यांचा एक पौष्टिक आणि चविष्ट प्रकार असून तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. ताज्या हिरव्या मटारांची पेस्ट, गव्हाचे पीठ, थोडासा रवा, बेसनपीठ आणि घरगुती मसाल्यांचा वापर या पुऱ्यांना वेगळीच चव देतो. रवा वापरल्यामुळे पुऱ्या तळताना जास्त तेल शोषून घेत नाहीत आणि त्यामुळे त्या हलक्या, खुसखुशीत व अजिबात तेलकट न होता छान फुगतात. रंगाला सौम्य हिरवट झाक, आतून मऊ तर बाहेरून कुरकुरीत असा उत्तम टेक्स्चर मटर पुरीला मिळतो. Instant Matar Masala Puri या पुऱ्या मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मटर मसाला भाजीसोबत दुपारच्या जेवणासाठी अतिशय योग्य ठरतात. चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घेणारी ही मटर पुरी घरगुती स्वयंपाकात नक्कीच खास स्थान मिळवते.
साहित्य:Instant Matar Masala Puri
- २ कप गव्हाचे पीठ
- २ टेबलस्पून रवा
- २ टेबलस्पून बेसनपीठ
- १/२ कप ताजा मटर
- १/२ चमचा मीठ
- १/२ चमचा लाल तिखट / चिली फ्लेक्स
- १/२ चमचा धने पावडर
- आले
- लसूण
- तेल
- चिमूटभर हिंग
- १/२ चमचा तीळ
- १/२ चमचा ओवा
- २ छोटे चमचे तेल
- कोथिंबीर
कृती:Instant Matar Masala Puri
स्टेप १) सर्वप्रथम ओला वाटाणा सोलून घ्या ,नंतर स्वच्छ धुऊन १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या.वाटाणा थंड झाल्यानंतर त्यातील पाणी बाजूला काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेले वाटाणे ,सोललेला लसूण आलं कोथिंबीर इत्यादी साहित्य घालून जाडसर पेस्ट करून घ्यायची.
स्टेप २) पीठ मळताना एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात रवा,बेसनपीठ ,२ चमचे गरम तेलाचे मोहन , मीठ, लाल तिखट, हिंग, तीळ,ओवा आणि मिक्सरमध्ये बनविलेली मटारची पेस्ट घालायची नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत (मटर वाटलेलं पाणी वापरू शकता) घट्ट पीठ मळा.
पोळीपेक्षा थोडं घट्ट पण मऊ पीठ तयार करा.
शेवटी २ चमचे तेल लावून पुन्हा थोडं पीठ मळून घ्या.आणि १० मिनिटे पीठ झाकून ठेवा .
स्टेप ३)पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे .पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावायचे (पीठ वापरू नका).
पुरी थोडी जाडसर लाटा — खूप पातळ लाटू नका.Instant Matar Masala Puri
स्टेप ४)कढईत मध्यम आचेवर तेल गरम करायचे .
तेल गरम झाले की लाटलेली पुरी तेलात टाकायची आणि एक बाजू सोनेरी झाली की पलटून घ्या.
दोन्ही बाजूंनी छान फुगलेली व हलकी सोनेरी झाल्यावर काढा.
स्टेप ५) अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मटर पुरीसाठी उपयुक्त टिप्स:Instant Matar Masala Puri
-
रवा जरूर वापरा – १–२ टेबलस्पून रवा घातल्याने पुऱ्या छान फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत.
-
मटरची जाडसर पेस्ट ठेवा – फार पातळ पेस्ट केल्यास पीठ सैल होते आणि पुऱ्या नीट फुगत नाहीत.
-
पीठ घट्ट पण मऊ मळा – पोळीपेक्षा थोडं घट्ट पीठ ठेवलं तर पुऱ्या खुसखुशीत होतात.
-
पुरी पातळ लाटू नका – थोडी जाडसर पुरी लाटल्यास ती चांगली फुगते.
-
पीठ लाटताना पीठ वापरू नका – पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावा; त्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाहीत.
-
तेल योग्य तापमानावर ठेवा – फार थंड तेलात पुऱ्या टाकल्यास तेल शोषतात, खूप तापलेल्या तेलात रंग पटकन बदलतो.
-
मिडियम ते मिडियम-हाय गॅस वापरा – यामुळे पुऱ्या आतूनही नीट शिजतात.
-
झाऱ्याने हलकं दाबा – पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने हलकं दाबल्यास ती छान फुगते.
-
मुलांच्या डब्यासाठी – तिखट कमी ठेवा आणि ओवा–तीळ घातल्याने पचनास हलक्या राहतात.
-
स्टोरेज टिप – पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात ठेवा, त्यामुळे पुऱ्या नरम होत नाहीत.