Crispy Jwariche Ghavan and chatny|कुरकुरीत ज्वारीचे घावन आणि चटणी
Crispy Jwariche Ghavan and chatnyआजची आपली रेसिपी आहे “ज्वारीचे घावन आणि चटणी”.हि रेसिपी म्हणजे झटपट तयार होणारी , बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट कुरकुरीतअशी पारंपरिक महाराष्ट्रीयन नाश्त्याची रेसिपी आहे. खूप कमी वेळात होणारे हे घावन मुलांच्या डब्यासाठी तसेच हलक्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही हे एकदम परफेक्ट आहे. ज्वारीपासून तयार केलेले हे घावन फक्त चविष्ट तर आहेतच आणि पचायला हलके आणि पौष्टिकही आहे.कोणी डाएट करत असेल तर किंवा वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ही रेसिपी खूपच उपयोगी आहे. हे कुरकुरीत घावन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या संध्याकाळच्या फराळासाठीही हे एक परफेक्ट पर्याय आहे. ज्वारीपासूनCrispy Jwariche Ghavan and chatny तयार झाल्यामुळे हे घावन पचायला हलके, पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे.स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून ही रेसिपी झटपट तयार करता येते.Crispy Jwariche Ghavan and chatnyघावन हा महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक पातळ, कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ आहे. या रेसिपीत आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत, ज्यामुळे घावन अधिक कुरकुरीत आणि हलके लागते. घावन साधंही छान लागते किंवा मसालेदार चटणी, भाजी किंवा आमटीसोबतही सर्व्ह करता येते.
डोशाच्या तुलनेत घावन बनवण्यासाठी आंबवण्याची गरज नसते, त्यामुळे ही रोजच्या स्वयंपाकासाठी झटपट होणारी रेसिपी आहे. सोबतची चटणीही खूपच सोप्या पद्धतीने, कमी वेळात तयार होते.Crispy Jwariche Ghavan and chatny
साहित्य:
Crispy Jwariche Ghavan and chatny
- ज्वारीचे पीठ – २ कप
- तांदळाचे पीठ – १/४ कप
- हळद – १/४ टीस्पून
- धणे पूड – १ टीस्पून
- लाल तिखट – १ टीस्पून
- जिरे – १/४ टीस्पून
- ओवा – १/४ टीस्पून
- आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट – १ टीस्पून
- चवीनुसार मीठ
- पाणी – ३ १/२ कप (आवश्यकतेनुसार)
- बारीक चिरलेली कोथिंबीर पाने
- १ बारीक चिरलेला टोमॅटो (ऐच्छिक)
- तेल – आवश्यकतेनुसार

Crispy Jwariche Ghavan
कृती:
Crispy Jwariche Ghavan and chatny
ज्वारीचे घावन
स्टेप 1:
एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, धणे पूड, लाल तिखट, जिरे, ओवा, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घ्यायचे . सर्व साहित्य एकत्र मिसळायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळसर पीठ भिजवायचे .
स्टेप 2:
पीठ भिजवणात बारीक चिरलेली कोथिंबिरीची पाने घालून नीट मिक्स करायचे आणि पीठ बनवायचे .
स्टेप 3:
हे भिजवलेले पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवायचेCrispy Jwariche Ghavan and chatny
स्टेप 4:
नंतर मध्यम आचेवर गॅसवर तवा चांगला तापवून घ्यायचा आणि तेल लावून तव्याला ग्रीस करायचे .
स्टेप 5:
भिजवलेले पीठ परत एकदा चांगले हलवून घ्यायचे आणि तव्याच्या कडेला पासून मध्यभागाकडे गोलाकार पद्धतीने मिश्रण ओतायचे आणि पळीने तव्यावर एकसारखे करून घ्यायचे .
स्टेप 6:
नंतर खालची बाजू छान भाजून सोनेरी रंग आल्यावर घावन उलटवायचे आणि कडेला तेल सोडून आणि दुसऱ्या बाजूनेही नीट भाजायचे
स्टेप 7:
दोन्ही बाजूंनी घावन चांगले भाजले की ते तव्यावरून काढून जाळीदार स्टँडवर ठेवा. अशाप्रकारे ज्वारीचे घावन तयार आहे.
नारळाची चटणी
साहित्य
- किसलेला ताजा नारळ – १ कप
- हिरव्या मिरच्या – २ ते ३
- लसूण पाकळ्या – २ ते ३
- चिंच – छोटा तुकडा
- मीठ – चवीनुसार
- पाणी – आवश्यकतेनुसार
- फोडणीसाठी
- तेल – १ टीस्पून
- मोहरी – १/२ टीस्पून
- सुक्या लाल मिरच्या – १ ते २
- कढीपत्ता – ६ ते ८ पाने
- हिंग – चिमूटभर
कृती:
Crispy Jwariche Ghavan and chatny
स्टेप 1:
मिक्सरच्या भांड्यात किसलेला नारळ, हिरव्या मिरच्या, लसूण, चिंच आणि मीठ घाला.
स्टेप 2:
थोडे पाणी घालून चटणी जाडसर किंवा मध्यम घट्ट अशी वाटून घ्या.
स्टेप 3:
चटणी एका वाटीत काढून ठेवा.
स्टेप 4:
फोडणीसाठी कढईत तेल गरम करून मोहरी घाला.
स्टेप 5:
मोहरी तडतडली की सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
स्टेप 6:
ही गरम फोडणी चटणीवर घाला आणि नीट मिसळा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ज्वारीचे घावन – टिप्स
Crispy Jwariche Ghavan and chatny
-
भिजवणाची कन्सिस्टन्सी
घावनासाठी भिजवण पातळ, ओतण्यासारखे असावे. खूप घट्ट भिजवण असेल तर घावन जाड होईल आणि नीट पसरत नाही. -
तवा योग्य तापलेला असावा
घावन टाकण्याआधी तवा चांगला तापलेला असावा. खूप थंड किंवा फार गरम तवा असेल तर घावन नीट बसत नाही. -
तेल कमी वापरा
घावन कुरकुरीत व्हावे यासाठी जास्त तेलाची गरज नसते. फक्त तवा हलकासा ग्रीस करा. -
भिजवण प्रत्येक वेळेस ढवळाCrispy Jwariche Ghavan and chatny
ज्वारीचे पीठ पटकन खाली बसते, त्यामुळे प्रत्येक घावन टाकण्याआधी भिजवण नीट ढवळणे आवश्यक आहे. -
मध्यम ते जास्त आचेवर भाजा
घावन मध्यम-जास्त आचेवर भाजल्यास छान कुरकुरीत होते. खूप कमी आचेवर भाजल्यास ते नरम राहते. अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा -
तव्याच्या कडेला पासून ओता
भिजवण तव्याच्या कडेला पासून मध्यभागाकडे ओतल्यास घावन पातळ आणि एकसारखे पसरते. -
उलटताना घाई करू नका
खालची बाजू नीट भाजून सोनेरी रंग आल्यानंतरच घावन उलटावे, नाहीतर ते तुटू शकते. -
जाळीदार स्टँडवर ठेवा
भाजलेले घावन थेट प्लेटमध्ये ठेवण्याऐवजी जाळीदार स्टँडवर ठेवल्यास ते कुरकुरीत राहते. -
चव बदलण्यासाठी पर्याय
चव वाढवण्यासाठी भिजवणात कांदा, कोथिंबीर किंवा थोडी भाजलेली तीळ पूड घालू शकता. -
डाएट-फ्रेंडली पर्याय
तेल कमी वापरून आणि भाजी-चटणीसोबत खाल्ल्यास ज्वारीचे घावन डाएटसाठी उत्तम पर्याय ठरतो.