Crispy Soyabean Paratha in 10 Minutes|सोयाबीन पराठा
Crispy Soyabean Parathaनेहमीच्या भाज्या खाऊन मुलांना कंटाळा येतो, अशा वेळी सोयाबीन पराठा हा एक उत्तम आणि वेगळा पर्याय ठरतो. Crispy Soyabean Parathaप्रोटीनने भरलेला सोयाबीन मसाल्यांबरोबर परतून गव्हाच्या मऊ पराठ्यात भरला की पराठा अतिशय चविष्ट लागतो. शाळेच्या डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा झटपट पौष्टिक जेवण म्हणून हा पराठा खास आहे. आरोग्यदायी असूनही चवीला उत्कृष्ट असल्यामुळे मुलांना हा पराठा नक्कीच आवडतो. Crispy Soyabean Paratha
साहित्य :Crispy Soyabean Paratha
पराठ्यासाठी पीठ :
-
गव्हाचे पीठ – १½ कप
-
मीठ – चवीनुसार
-
पाणी – मळण्यासाठी
-
तेल – १ टीस्पून
सारणासाठी :
-
सोयाबीन (सोया चंक्स) – १ कप
-
कांदा – १ (बारीक चिरलेला)
-
आलं-लसूण पेस्ट – १ टीस्पून
-
जिरे – ½ टीस्पून
-
हळद – ¼ टीस्पून
-
लाल तिखट – चवीनुसार
-
धणे पावडर – १ टीस्पून
-
जिरे पावडर (भाजलेली) – ½ टीस्पून
-
गरम मसाला – ½ टीस्पून
-
हिंग – चिमूटभर
-
कोथिंबीर – बारीक चिरलेली
-
तेल – १ ते २ टेबलस्पून
-
मीठ – चवीनुसार
सोयाबीन पराठा कृती:
Crispy Soyabean Paratha
स्टेप १)सर्वप्रथम सोयाबीन मऊ आणि उग्रट न होण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने तयारी करणे फार महत्त्वाचे असते . एका कढईत किंवा पातेल्यात पुरेसे पाणी उकळायला ठेवा. पाणी चांगले उकळले की गॅस बंद करा आणि त्यात १ ते २ लवंग,२ तमालपत्र पाने आणि सोयाबीन घाला. झाकण ठेवून साधारण ५ ते १० मिनिटे सोयाबीन भिजू द्या. म्हणजे सोयाबीन फुलून मऊ होतात.नंतर ते चाळणीत काढून त्यावर थोडे थंड पाणी शिंपडा आणि हाताने नीट पिळून सगळी अतिरिक्त पाणी काढून टाका. त्यानंतर हे सोयाबीन मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या. फार बारीक वाटू नका, म्हणजे पराठ्याला Crispy Soyabean Parathaचांगला टेक्स्चर मिळतो.
स्टेप २)आता पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचे. एका परातीत गव्हाचे पीठ घ्या, त्यात मीठ घालून व्यवस्थित मिसळा. थोडे थोडे पाणी घालत मध्यमसर आणि मऊ पीठ मळा. शेवटी थोडेसे तेल लावून पीठ मळून घ्या. पीठ झाकून किमान १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा, त्यामुळे पराठे मऊ होतात.
स्टेप ३)सारण तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद आचेवर परता. कांदा हलका गुलाबी रंगाचा झाला की त्यात आलं-लसूण पेस्ट घाला आणि कच्चा वास जाईपर्यंत परता. आता गॅस थोडा कमी करून त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि चिमूटभर हिंग घालून मसाले हलके परता. मसाले जळू नयेत म्हणून गरज असल्यास थोडेसे पाणी शिंपडा.
स्टेप ४)यानंतर त्यात वाटलेले सोयाबीन आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण नीट परता. साधारण २ ते ३ मिनिटांत सारण छान परतून तयार होते. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्या, कारण गरम सारण घातल्यास पराठा फुटू शकतो.Crispy Soyabean Paratha
स्टेप ५)आता मळलेल्या पिठाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या करून घ्या. एक गोळी हाताने दाबून पातळ वाटीप्रमाणे आकार द्या. त्यात तयार केलेले सोयाबीनचे सारण ठेवा आणि कडा एकत्र करून नीट बंद करा. हाताने हलके दाबून गोळी सपाट करा आणि पीठ लावून पराठा लाटून घ्या.
स्टेप ६)तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्यावर थोडेसे तेल लावून पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर पराठा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. पराठा नीट फुगला आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाला की गॅस बंद करा.
स्टेप ७) गरमागरम सोयाबीन पराठा लोणी, दही किंवा सॉससोबत छान लागतो. हा पराठा शाळेच्या डब्यासाठीही उत्तम असून बराच वेळ मऊ राहतो आणि पौष्टिकही आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पराठ्यांचे प्रकार: Crispy Soyabean Paratha