Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipieदिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|

Table of Contents

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

दिवाळी म्हटलं की घराघरात आनंद, उजळलेले दिवे, फुलांचा सुगंध, आणि अर्थातच गोड पदार्थांचा सुगंध हवेत दरवळलेला!
या सणात बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ एक वेगळीच आठवण घेऊन येतो.
आणि त्या सर्वांमध्ये पहिल्या क्रमांकावर असतो — अनारसा!

हा महाराष्ट्रीय गोड पदार्थ केवळ चवीसाठीच नाही, तर त्याच्या तयारीतही एक संयम आणि परंपरेचं सौंदर्य घेऊन येतो.
अनारसा बनवण्यासाठी लागते आठवडाभराची तयारी, प्रेम, काळजी आणि वेळ.
तांदूळ भिजवणे, सुकवणे, त्याचं पीठ तयार करणे आणि मुरवणे —
या प्रत्येक प्रकियेतून गेल्यानंतर होतो तो खमंग, जाळीदार आणि तेलकट न होणारा परफेक्ट अनारसा!

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

1) लागणारे साहित्य

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

  • अर्धा किलो तांदूळ — वाडा कोलम, सुरती कोलम किंवा कोणताही चिकट न होणारा तांदूळ चालेल.

  • पावशर गूळ खिसलेला 

  • थोडी खसखस — सजावटीसाठी आणि अनारसाला सुंदर टेक्स्चर देण्यासाठी.

  • दोन चमचे दूध

  • साजूक तूप दोन चमचे

  • तेल — अनारसे तळण्यासाठी.

अनारसाचे पीठ तयार करण्याची सविस्तर प्रक्रिया

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

1)तांदूळ भिजवणे

सर्वप्रथम तांदूळ २–३ वेळा स्वच्छ धुऊन घ्या.
नंतर हे तांदूळ एका भांड्यात पाण्यात भिजत ठेवा.
दररोज पाणी बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे तांदळाला हलका आंबटपणा आणि फुलकं टेक्स्चर येतं.
सुमारे ५–६ दिवस ही प्रक्रिया सुरू ठेवा.
पाचव्या दिवसानंतर पाण्यावर हलका फेस दिसू लागेल — हेच संकेत आहे की तांदूळ आता पुढच्या टप्प्यासाठी तयार आहेत.

2)सुकवणे

भिजवलेले तांदूळ चाळणीत टाकून १५–२० मिनिटे पाणी पूर्ण निथळू द्या.
त्यानंतर हे तांदूळ स्वच्छ सुती कपड्यावर पसरून ठेवा.
फॅनखाली किंवा हलक्या नैसर्गिक वाऱ्यात थोडं सुकवा.
तांदूळ पूर्ण कोरडे नकोत — त्यांना हलकासा ओलसरपणा राहिला पाहिजे.
याच ओलसरपणामुळे पुढे पीठ आणि गूळ एकत्र येऊन मऊसर अनारसाचं पीठ तयार होतं.

 ३️)पीठ तयार करणे

हे सुकवलेले तांदूळ मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या.
खूप बारीक वाटायचं नाही — पीठाला हलका रव्याचा टेक्स्चर हवा.
नंतर हे पीठ चाळणीतून चाळून घ्या 
ही स्टेप टाळू नका, कारण चाळल्याने पीठ अधिक गुळगुळीत आणि समान होते, ज्यामुळे अनारसे अधिक सुंदर आणि एकसारखे होतात.

 ४️) मळणे आणि मुरवणे

आता एका भांड्यात दोन कप तांदळाचं पीठ आणि एक कप खिसलेला गूळ घ्या.
दोन्ही हातांनी छान एकजीव करून मळा.किंवा गूळ खिसलेला आणि ते पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकत्र होईपर्यंत फिरवा 
पाणी अजिबात घालू नका गुळाचे पाणी सुटेल आणि पीठ हलकं ओलसर होईल.
हे तयार पीठ एका स्टीलच्या डब्यात घट्ट झाकण ठेवून ठेवा आणि किमान एक दिवस मुरवू द्या.
मुरवण्यामुळे गुळाचा ओलसरपणा पीठात मुरतो आणि अनारसे अधिक मऊ आणि जाळीदार बनतात.

 अनारस बनविणे आणि तळण्याची प्रक्रिया संपूर्ण माहिती

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

  1. मुरवलेलं पीठ थोडं मऊ करून घ्या.पीठ खूप घट्ट झाले असेल तर मऊ करण्यासाठी किंचित तीन ते चार थेंब दूध घालू शकता.  पिठाचे लहान लहान  गोळे तयार करा.

  2. ताटामध्ये थोडी खसखस घेऊन त्यावर बनवलेला पिठाचा गोळा ठेवा आणि  हाताला थोडेसे साजूक तूप लावूनहाताच्या बोटांनी हलकेसे थापून घ्या .अनारसा जास्त जाडसर नको आणि जास्त पातळ पण नको.ताटामध्ये अनारसा थापताना चिकटत असेल तर तुम्ही ताटा ऐवजी पेपरचा वापर करू शकता पेपरला अनारसा चिकटत नाही

  3. कढईत तेल गरम करा. तेल पुरेसं तापल्यावर आच मध्यम करा.

  4. खसखस लावलेली बाजू वर ठेवून अनारसे तळा.अनारसा तळताना उलथन्याने गरम तेल अनारसे वर शिंपडत रहावे.

  5. सुंदर सोनेरी रंग आला की अनारसे काढून टिशू पेपरवर उलटं ठेवून तेल निथळू द्या.

तळताना संपूर्ण घरभर एक अप्रतिम खमंग सुगंध दरवळतो —
आणि ते पाहून आपल्याला वाटतं, “अरे वा! आता दिवाळी खरी सुरू झाली!”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 खास टिप्स — परफेक्ट अनारसा बनवण्यासाठी

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

  • तेल फार थंड किंवा फार गरम नको. मध्यम तापमान ठेवा.

  • एकावेळी खूप अनारसे टाकू नका, अन्यथा ते चिकटतात. एकावेळी एकच अनारसा तळावा.

  • अनारसा टिशूवर खाली ठेवल्यास अतिरिक्त तेल आपोआप निघून जातं.

  • गरम अनारसे टिशूवर ठेवा म्हणजे तेल पटकन ड्रिप होतं.

  • पीठ फार सैल झालं तर थोडं चाळलेले पीठ त्यात मिसळा, आणि फार घट्ट झालं तर किंचित दुधाचा वापर करा.

  • तेलात टाकण्यापूर्वी अनारसे ची गोळी टाकून पहा — तो वर येत असेल तर तेल योग्य तापमानावर आहे.

निष्कर्ष 

दिवाळी फराळाची सुरुवात अनारसापासून — खमंग, कुरकुरीत आणि जाळीदार अनारसा रेसिपी|Diwali faralachi suruvat anarasapasun-khamang,kurkurit ani jalidar anarasa recipie

असं हे अनारस बनवायला वेळखाऊ असलं तरी त्यात मिळतो एक वेगळाच आनंद.
प्रत्येक पायरीमध्ये आपल्याला जाणवते ती आपल्या घरातील परंपरेची गोडी,
आई–आजीच्या हातचा सुगंध आणि सणाचा आत्मा.

दिवाळीच्या सकाळी हा सोनसळी, खुसखुशीत अनारस पाहताना
मनात येतं — “हाच खरा फराळाचा राजा!”

या दिवाळीत घरच्या घरी बनवा तेलकट न होणारे,  जाळीदार आणि कुरकुरीत अनारसे.
स्वतः बनवा, आपल्या कुटुंबाला खाऊ घाला आणि दिवाळीचा आनंद अनेक पटीने वाढवा!

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment