Healthy Avala Candy|घरगुती आवळा कॅन्डी रेसिपी2025
Healthy Avala Candy आंबट-गोड, चिवी आवळा कॅन्डी आजही अनेकांच्या आठवणींमध्ये ताजी आहे. हलकीशी आंबट, त्यावर साखरेची गोडसर चकाकी आणि खाताना दाताखाली येणारा परफेक्ट च्युई टेक्सचर – ही कॅन्डी खाण्याचा आनंदच वेगळा होता. Healthy Avala Candyआज बाजारात अनेक प्रकारच्या कॅन्डी मिळतात, पण त्या पारंपरिक चवीचा, नैसर्गिकपणाचा आणि समाधानाचा अनुभव फार क्वचित मिळतो.घरच्या घरी बनवलेली आवळा कॅन्डी ही केवळ चवीला मस्त नसून आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C,Healthy Avala Candyअँटीऑक्सिडंट्स आणि पोषणमूल्ये असतात. योग्य पद्धतीने शिजवून, साखरेत मुरवून आणि हळूहळू सुकवलेली कॅन्डी वर्षभर टिकते आणि तिची चव, रंग व टेक्सचर अगदी परफेक्ट राहते.

Making your own Healthy Avala Candy allows you to control the ingredients and enjoy a delicious treat full of health benefits.
साहित्य:Healthy Avala Candy
-
आवळे – ½ किलो
-
साखर – 300 ग्रॅम
-
लवंग – 6 ते 7
-
दालचिनी – 1 छोटा तुकडा
-
पिठीसाखर – थोडीशी (भुरभुरण्यासाठी)
कृती (Stepwise Recipe)
Healthy Avala Candy|घरगुती आवळा कॅन्डी रेसिपी
Healthy Avala Candy
१) आवळे स्वच्छ करणे
आवळे स्वच्छ पाण्यात घालून नीट धुवून घ्यायचे .नंतर धुतलेले आवळे सुती कापडाने पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे
आवळे ओलसर ठेवायचे नाहीत.
२ आवळे वाफवणे Healthy Avala Candy
आवळे चांगले कोरडे केले कि आवळे चाळणी किंवा स्टीमरमध्ये ठेवायचे
स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आणि झाकण लावून मध्यम आचेवर २० ते २५ मिनिटे वाफवून घ्यायचे.
20 ते २५ मिनिटांनंतर आवळ्याच्या पाकळ्या आपोआप सुटतात.
हे आवळे थोडेसे थंड होऊ द्यायचे .
३) आवळ्याच्या फोडी तयार करणे
थंड झाल्यावर आवळ्याच्या पाकळ्या हाताने सहज वेगळ्या कराता येतात . वाफवलेले आवळे अगदी मऊ असल्यामुळे ही प्रक्रिया खूप सोपी असते.
४) साखरेत आवळे शिजवणे
गॅसवर मंद आचेवर कढईमध्ये आवळ्याच्या फोडी,साखर, लवंग, दालचिनी सगळे एकत्र
करायचे. पाणी अजिबात घालायचे नाही.मंद आचेवर सतत हलवत शिजवायचे .१० मिनिटांत साखरेला आवळ्यामुळे पाणी सुटू लागते.
नंतर सुमारे १० ते १५ मिनिटांत साखर पूर्ण विरघळून सैल पाक तयार होतो.
या प्रक्रियेमुळे आवळ्याला सुंदर चकाकी येते आणि पाक आतपर्यंत मुरतो.
५) मिश्रण मुरवणे
गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत तसेच ठेवा,मिश्रण थंड झाल्यामुळे साखरेचा पाक व्यवस्थित मुरतो
These steps ensure that your Healthy Avala Candy has the perfect texture and flavor.

६) सिरप वेगळा करणे
थंड झाल्यावर आवळा कॅन्डी चाळणीत काढून घ्यायची व राहिलेला सगळा सिरप पूर्णपणे निथळू द्यायचा.
८) कॅन्डी सुकवणे
कँडी सुकवताना कँडी सुती कापडावर सुकवायची .१ ते २ दिवस फॅनच्या हवेखाली सुकवायचे.नंतर 1 ते २ तास जास्त टिकण्यासाठी उन्हात ठेवायची. सुकलेल्या कॅन्डीवर थोडीशी पिठीसाखर भुरभुरायची
यामुळे कॅन्डी बाजारात मिळते तशी सुंदर दिसते आणि चिकटत नाही.उरलेल्या सिरपचा उपयोग आपण “आवळा सरबत” म्हणून करू शकतो.उरलेला आवळा सिरप बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवायचा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सरबत बनवण्यासाठी साहित्य :
Healthy Avala Candy|घरगुती आवळा कॅन्डी रेसिपी
- 1 पळी आवळा सिरप
- थंड पाणी
- चिमूटभर काळे मीठ
कृती: Healthy Avala Candy
आवळा सरबत बनवताना एक चमचा आवळा सिरप ,एक थंड ग्लास पाणी आणि चिमूटभर मीठ एकत्र करून मिक्स करायचे .
आवळा कॅन्डी परफेक्ट होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Healthy Avala Candy
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
-
आवळे कोरडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे
आवळे धुतल्यानंतर त्यावर पाण्याचा अंश अजिबात राहू देऊ नका. ओलसर आवळे वापरल्यास कॅन्डी चिकट होते आणि टिकत नाही.When stored properly, your Healthy Avala Candy can last for months while retaining its delightful taste.
-
आवळे फक्त वाफवायचे, उकळायचे नाहीत
उकळल्यास आवळे पाणचट होतात आणि त्यांचा नैसर्गिक स्वाद कमी होतो. वाफवलेले आवळे मऊ होतात व पाक छान मुरतो. -
साखर घालताना पाणी अजिबात वापरू नका
आवळ्याच्या नैसर्गिक रसावरच साखर विरघळू द्या. त्यामुळे कॅन्डीला सुंदर ग्लेझ आणि ट्रान्सपरंट टेक्सचर मिळते. - कॅन्डी पाकातच ठेवा
आवळ्याच्या फोडी आणि साखर एकत्र करायचे , तीन दिवस चांगले मुरून द्यायचे कॅन्डी पाक शोषून घेते, त्यामुळे चव आणि टेक्सचर सुधारते. -
आंबट फळे धातूच्या भांड्यात सुकवू नयेत
आवळा आम्लयुक्त असल्याने धातूशी संपर्क टाळा. सुती कापड, ओढणी किंवा प्लास्टिक ट्रे वापरा. -
उन्हात जास्त वेळ ठेवू नका
सुरुवातीला फॅनच्या हवेखाली सुकवा. शेवटी फक्त 1 तास उन्हात ठेवल्यास कॅन्डी वर्षभर टिकते. -
पिठीसाखरेचे कोटिंग विसरू नका
थोडीशी पिठीसाखर भुरभुरल्याने कॅन्डी चिकटत नाही आणि बाजारात मिळते तशी दिसते.For an exciting twist, consider adding spices to your Healthy Avala Candy for an extra kick.
-
हवाबंद साठवण करा
कॅन्डी पूर्ण सुकल्यावरच हवाबंद डबा किंवा झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा. योग्य साठवणीत कॅन्डी अनेक महिने टिकते. -
चटपटीत फ्लेवरसाठी वेगळा ट्विस्ट
लाल तिखट, चाट मसाला किंवा जिरेपूड लावून पुन्हा सुकवली तर झणझणीत कॅन्डी तयार होते. -
उरलेला सिरप वाया घालवू नका
हा सिरप फ्रिजमध्ये ठेवून सरबत, पाणीपुरीचे पाणी किंवा हेल्दी ड्रिंक म्हणून वापरता येतो.