“Homemade Crunchy Samosa|घरगुती खमंग सामोसा रेसिपी”
Homemade Crunchy Samosaसमोसा “हा एक असा पदार्थ आहे कि तो सर्वांनाच आवडतो . त्यामुळे आज आपण सगळ्यांच्याच आवडीचा, खमंग आणि कुरकुरीत समोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. समोसा हा भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड असून त्याचा त्रिकोणी आकार आणि खुसखुशीत आवरण पाहूनच समोसा खाण्याची इच्छा होते. बाहेरून खारट, खमंग व कुरकुरीत आणि आतून चविष्ट मसालेदार सारण असलेला समोसा खूपच अप्रतिम लागतो. या खास रेसिपीत समोसे कमी तेलकट आणि हलके बनवले जातात, त्यामुळे सामोसा कधीही खाल्ला तरी छानच लागतो सोबतच, समोशाची चव द्विगुणित करणारे स्वादिष्ट असे चिंचेचं पाणी घरगुती पद्धतीने कसे बनवायचे ते देखील आज आपण पाहणार आहोत. घरीच अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत समोसे तयार करा आणि कुटुंबासोबत मित्रमंडळीसोबत ,आनंद घ्या.Homemade Crunchy Samosa
समोसा हा चहासोबत खाण्यासाठी, पार्टीसाठी, पिकनिकसाठी तसेच सण-समारंभांमध्ये खूप लोकप्रिय पदार्थ आहे. रस्त्यावरच्या एखाद्या स्थानिक विक्रेत्याकडून खाल्ला असो किंवा घरी बनवून सर्व्ह केला असो, समोसा नेहमीच आनंद देतो. समोसा हा जरी तळलेला आणि चविष्ट नाश्ता असला, तरी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तयार केल्यास तो काही प्रमाणात पौष्टिक ठरू शकतो. समोशाच्या सारणात वापरलेले बटाटे शरीराला ऊर्जा देतात, तर मटारमुळे प्रथिने व फायबर मिळते. जिरे, धने, आले, मिरची यांसारखे मसाले पचन सुधारण्यास मदत करतात. समोसा पोटभर वाटतो, त्यामुळे लगेच भूक लागत नाही. मात्र तो तेलात तळलेला असल्याने जास्त प्रमाणात खाणे टाळावे. कमी तेलात, मंद आचेवर तळलेला किंवा बेक केलेला समोसा तुलनेने हलका आणि आरोग्यासाठी चांगला ठरतो.
समोसा सारण साहित्य (Stuffing)
“Homemade Crunchy Samosa”
- ५०० ग्रॅम बटाटे
- १ टेबलस्पून तेल
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून बडीशेप
- चिमूटभर हिंग
- १ टेबलस्पून हिरवी मिरची-आले पेस्ट
- १ टेबलस्पून धने पावडर
- १ टेबलस्पून गरम मसाला
- १ टेबलस्पून लाल तिखट
- १/४ टीस्पून हळद
- २–३ टेबलस्पून पाणी
- अर्धी वाटी उकडलेला मटार
- चवीनुसार मीठ
- १/२ लिंबाचा रस
- बारीक चिरलेली कोथिंबीर (ऐच्छिक)
- गोड चटणी (Sweet Chutney)
- १/२ कप गूळ
- १ १/२ कप पाणी
- १/२ टेबलस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून काळे मीठ
- १/२ टीस्पून जिरे पावडर
- चवीनुसार मीठ
- १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- गरजेनुसार पाणी
- १/२ लिंबाचा रस
समोसा पीठ साहित्य (Dough)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
“Homemade Crunchy Samosa”
- २ कप मैदा
- १/२ टीस्पून ओवा
- १/२ टीस्पून मीठ
- १/४ कप तेल
- गरजेनुसार पाणी
- समोसे तळण्यासाठी
- तळण्यासाठी तेल
कृती:”Homemade Crunchy Samosa”
सारण तयार करण्याची पद्धत
Step 1:सुरुवातीला बटाटे दोन भागांत कापा आणि बाजूला ठेवा.
Step 2: कुकरमध्ये पाणी घालून त्यात बटाटे टाका.
Step 3: झाकण लावून मध्यम आचेवर ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. नंतर बटाटे काढून सोलून घ्या.
Step 4: कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला.
Step 5: जिरे तडतडले की बडीशेप व हिंग घालून परता. त्यानंतर हिरवी मिरची-आले पेस्ट घालून चांगले मिसळा.
Step 6: गॅस मंद करून धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट व हळद घालून मिसळा.
Step 7: थोडे पाणी घालून मिक्स करा व मटार घाला.
Step 8: उकडलेले बटाटे घालून हलक्या हाताने कुस्करून घ्या.
Step 9: मीठ, लिंबाचा रस व कोथिंबीर घालून सगळे नीट मिसळा.
Step 10: गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. सारण तयार आहे.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
पीठ मळण्याची पद्धत”Homemade Crunchy Samosa”
Step 11: मैदा, ओवा, मीठ व तेल एकत्र करून हाताने चोळा, मिश्रण कणकेसारखे झाले पाहिजे.
Step 12: थोडे-थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा.
Step 13: झाकून १५–२० मिनिटे विश्रांती द्या.
समोसे बनवण्याची पद्धत
Step 14: पीठ पुन्हा थोडे मळून छोटे छोटे गोळे करा.
Step 15: प्रत्येक गोळ्याची छोटी गोलाकार पोळी लाटून अर्धी कापा.
Step 16: एका अर्ध्या पोळीच्या सरळ बाजूला पाणी लावा.
Step 17: कोनाच्या आकारात घडी घालून नीट चिकटवा.
Step 18: त्यात सारण भरा व कडांना पाणी लावा.
Step 19: कडा नीट बंद करून समोसा तयार करा.
समोसे तळण्याची पद्धत”Homemade Crunchy Samosa”
Step 20: तेल मंद आचेवर फक्त कोमट होईपर्यंत गरम करा व त्यात समोसे टाका.
Step 21: मंद आचेवर समोसे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Step 22: एक बाजू तळली की उलटून दुसरी बाजू तळा.
Step 23: समोसे खुसखुशीत झाले की काढून जाळीवर ठेवा.
अशाप्रकारे आपले स्वादिष्ट ,खुसखुशीत समोसे होतात .
चिंच पाणी बनवण्यासाठी साहित्य
“Homemade Crunchy Samosa”
-
१/२ कप चिंच
-
२ ते ३ कप पाणी
-
१/२ टीस्पून जिरे पावडर
-
१/२ टीस्पून धने पावडर
-
१/४ टीस्पून काळे मीठ
-
चवीनुसार मीठ
-
१ ते २ टीस्पून गूळ किंवा साखर (चवीनुसार)
-
चिमूटभर लाल तिखट (ऐच्छिक)

Tamrind चिंच पाणी बनवण्याची कृती: “Homemade Crunchy Samosa
Step 1: चिंच अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवा.
Step 2: भिजलेली चिंच हाताने कुस्करून तिचा कोळ गाळून घ्या.
Step 3: त्या चिंच पाण्यात जिरे पावडर, धने पावडर, काळे मीठ, मीठ आणि लाल तिखट घाला.
Step 4: चवीनुसार गूळ किंवा साखर घालून सगळे नीट मिसळा.
Step 5: गरज असल्यास अजून पाणी घालून पातळ करा.
Step 6: अशाप्रकारे आपले टेस्टी चिंच पाणी तयार होते .