Khamang bhajni chakli Diwali2025|खमंग भाजणी चकली दिवाळी

दिवाळी फराळासाठी खुसखुशीत चकलीची परफेक्ट एक किलो वजनाची भाजणी रेसिपी

Khamang bhajni chakli Diwali2025 दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंद, उत्साह आणि घराघरात खमंग फराळाचा सुवास दरवळतो.आपण दिवाळीला वेगवेगळे खमंग पदार्थ बनवत असतो त्यातलाच एक झटपटीत होणारा आणि चटपटीत लागणारा सगळ्यांच्या आवडीचाअसा एक पदार्थ म्हणजेच चकली! आणि त्यामध्ये ती चकली भाजणीची असेल तर सोने पे सुहागा!सर्वांचे दिवाळीचे पदार्थ करण्याची वेगवेगळी पद्धत असते तसेच चकली बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत जसे की कोणी मुगडाळ आणि मैदा वापरून चकली करतात तर कोणी डाळीच्या पिठाची चकली करतात पण आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या डाळींचा वापर करून त्याची एकत्रित भाजणी करून बनवणार आहोत पौष्टिक अशी खायला रुचकर भाजणीची चकली! पण चकली कुरकुरीत व्हावी, चवदार यावी आणि जास्त दिवस टिकावी, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तिची भाजणी. आज आपण अगदी सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धतीने चकलीसाठी परफेक्ट एक किलो वजनाची भाजणी कशी तयार करायची ते पाहूया.

🪔 दिवाळी फराळासाठी खुसखुशीत चकलीची परफेक्ट  एक किलो वजनाची भाजणी रेसिपी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

🌾 Khamang bhajni chakli Diwali2025 लागणारे साहित्य (भाजणीसाठी)

तांदूळ (रेशनचा किंवा बासमती) — ½ किलो (२½ कप)

चणाडाळ — २०० ग्रॅम (१ कप)

मूगडाळ — १०० ग्रॅम (½ कप)

उडदाची डाळ — १०० ग्रॅम (½ कप)

पोहे (नायलॉनचे) — १०० ग्रॅम

धने — २० ग्रॅम

जिरे — २० ग्रॅम

🧂मसाले व चवीनुसार घटक (चकलीसाठी Khamang bhajni chakli Diwali2025

मीठ — चवीपुरते

लाल तिखट — १ ते १½ चमचा

हिंग — चिमूटभर

साजूक तूप / मोहन / लोणी — ३ चमचे

ओवा आणि तीळ — ऐच्छिक (चव वाढवतात)

🔥 चकलीसाठी भाजणी करण्याची कृती Khamang bhajni chakli Diwali2025

सर्वप्रथम डाळी आणि धान्य वेगवेगळे स्वच्छ धुऊन सुकवून घ्यावीत. यासाठी तांदूळ, चणाडाळ, मूगडाळ, उडदाची डाळ, पोहे, धने आणि जिरे हे सर्व घटक स्वच्छ धुवून कापडावर पसरवून फॅनखाली वाळवावे. हे घटक रात्रभर वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक-एक वेगवेगळे करून भाजायचे.

सुरुवातीला तांदूळ हलका बदामी रंग येईपर्यंत भाजावा, त्यानंतर चणाडाळ, मग मूगडाळ आणि उडदाची डाळ भाजावी. शेवटी पोहे, धने आणि जिरे एकत्र करून भाजावेत. भाजताना काळजी घ्या — कोणतंही धान्य करपवू नका.

भाजलेले धान्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दळून घ्या आणि मग चाळणीने चाळून घ्या. अशा प्रकारे तयार झालेली भाजणी चकलीसाठी परफेक्ट असते.

चकलीसाठी पीठ (उकड) तयार करणे Khamang bhajni chakli Diwali2025

दोन कप भाजणी घ्या. एका कप पाण्याला उकळी आणा आणि त्यात मीठ, लाल तिखट, हिंग आणि साजूक तूप घाला. गॅस बंद करून त्यात भाजणीचं पीठ टाका आणि चांगलं मळून घ्या. हे पीठ मऊ पण घट्ट असावं. थोडं थंड झाल्यावर पुन्हा मळा म्हणजे ते एकसंध आणि लवचिक होईल.

🍳 चकली तळण्याची पद्धत Khamang bhajni chakli Diwali2025

सोऱ्यात हे पीठ भरून एकसारख्या चकल्या पाडा. सुरुवातीला तेल गरम करून घ्या आणि नंतर आच मध्यम करा.तळताना तेल मध्यम आचेवर ठेवा. आधी एक लहान तुकडा टाकून पाहा — जर तो विरघळत नसेल, तर तेल आणि पीठ दोन्ही योग्य आहे. मग चकल्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा. नंतर तेल निथळून काढा आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.अशा प्रकारे आपली चटपटीत आणि झटपटीत चकली तयार आहे.

💡 खास टिप्स  Khamang bhajni chakli Diwali2025

मोहनाचं प्रमाण अचूक ठेवा; जास्त झालं तर चकली विरघळते.

उकड गरम असतानाच पीठ मळा, जास्त वेळ ठेवू नका.

भाजणी करताना धान्य करपवू नका, नाहीतर चकलीचा रंग आणि चव बदलते.

पीठ जास्त घट्ट किंवा सैल ठेवू नका — मध्यम एकसंध असावं.

सर्व डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुवाव्यात

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

Khamang bhajni chakli Diwali2025 अशा प्रकारे आपली चटपटीत आणि झटपटीत चकली तयार आहे

आजकालच्या धावपळीच्या जगात घरगुती पदार्थ कमी बनविले जातात लोकांचा कल वेळेअभावी तयार गोष्टींकडे जात आहे परंतु तरीही आपल्या काही हौशी महिला असतात ज्या घरगुती पदार्थांवर विशेष लक्ष देतात आणि घरी बनवलेल्या पदार्थांची चवही अप्रतिम असते परंतु काही वेळा घरी पदार्थ केले आणि ते पाहिजे असे नाही झाले तर सर्वच नाराज होतात आणि त्या पदार्थाची चवही चाखता येत नाही त्यामुळेच आपण पदार्थ अचूक आणि अप्रतिम बनविण्यासाठी हा लेख लिहिला आहे धन्यवाद..चकली हा फक्त फराळाचा पदार्थ नाही — ती दिवाळीच्या आठवणींचा एक सुगंध आहे. या दिवाळीत ही सोपी आणि परफेक्ट भाजणी वापरून खुसखुशीत चकली बनवा आणि आपल्या घरात आनंद, स्वाद आणि परंपरेचा सुगंध दरवळू द्या. 🪔✨. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Leave a Comment