Makarsankrant special Mix Bhaji
Makarsankrant special Mix bhajiमकरसंक्रांत म्हटलं कि आठवते ती “भोगीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी” हिवाळ्याच्या गारव्यामध्ये साजरी होणारी मकरसंक्रांत आणि तिच्या आदल्या दिवशी येणारी भोगी ही मराठी संस्कृतीतील एक खास परंपरा आहे. या दिवशी घराघरात हंगामी भाज्यांनी बनवलेली पौष्टिक भोगीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देणाऱ्या, चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशा या पारंपरिक पदार्थांचे महत्त्व वेगळेच आहे. विविध भाज्यांचे मिश्रण, सुगंधी मसाले आणि बाजरीच्या भाकरीची साथ यामुळे हा संक्रांत स्पेशल बेत सणाची मजा द्विगुणीत करतो. अशी ही अस्सल, घरगुती आणि चवदार भोगीची भाजी व बाजरीची भाकरी नक्कीच सर्वांना आवडेल.ही एक अस्सल आणि पारंपरिक रेसिपी आहे. Makarsankrant special Mix bhajiहिवाळ्यात भरपूर प्रकारच्या भाज्या सहज उपलब्ध होतात आणि त्या किफायतशीर दरात मिळतात. थंडीच्या दिवसांत भूकही चांगली लागते, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडे जास्त खाण्याकडे कल असतो. महाराष्ट्रात प्रत्येक सण वेगवेगळ्या आणि खास पद्धतीने साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगी हाही त्याला अपवाद नाही. या दिवशी सर्व मराठी घरात “भोगीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी” खास मेनू आवर्जून केला जातो. विविध भाज्यांचे पौष्टिक मिश्रण असलेली ही रेसिपी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर तर आहेच, शिवाय चवीलाही उत्तम लागते. अशी ही पारंपरिक, पौष्टिक आणि चवदार भोगीची खास मेजवानी नक्कीच सर्वांना आवडेल. त्यामुळे सर्वानी Makarsankrant special Mix bhajiहि रेसिपी नक्की करून बघा. आणि आपल्या “स्वादमॅजिक” या पेजला फॉलो करा.
मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून तो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या निमित्ताने साजरा केला जातो. साधारणपणे १४ जानेवारीला येणारा हा सण नवीन ऋतूची सुरुवात, शेतीचे यश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी “तीळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत गोडवा वाटला जातो. तीळ, गूळ, भाजी, भाकरी यांसारखे पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात, जे हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. पतंग उडवणे, वाण देणे आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा जपणे ही मकरसंक्रांतीची खास वैशिष्ट्ये आहेत. हा सण आनंद, आरोग्य आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संदेश देतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Makarsankrant special Mix Bhaji
साहित्य-भोगी भाजीसाठी
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जिरे
- २ चमचे लसूण पेस्ट
- अर्धी वाटी खोबऱ्याचे काप
- अर्धी वाटी शेंगदाणे
- २ ते ३ चमचे पांढरे तीळ
- ३ ते ४ चमचे तेल
- किसलेले आले (चवीनुसार)
- २ चमचे लाल तिखट
- १ चमचा गोडा मसाला
- चवीनुसार मीठ
- गरम पाणी आवश्यकतेनुसार
- अर्धी वाटी ओला पावटा
- अर्धी वाटी ओले हरभरMakarsankrant special Mix bhaji
- अर्धी वाटी ओला वाटाण्याचे दाणे
- ¼ कप वालपापडी
- ३ ते ४ ऊसाचे छोटे काप
- ४ टे ५ बोरे
- अर्धी वाटी चिरलेली गाजर
-
2–3 लहान वांगी भोगीची भाजी – कृती
Makarsankrant special Mix Bhaji
स्टेप 1: सर्वप्रथम ओला पावटे, हरभरे,वालपापडी आणि वाटाण्याचे दाणे सोलून घ्यायचे व नंतर स्वच्छ पाण्याने धुवायचे .
नंतर वांगी, गाजर कापून घ्यायचे.नंतर वरिल सर्व साहित्य कुकरमध्ये ठेवून २ ते ३ शिट्या करून घ्यायच्या
ऊसाचे छोटे तुकडे आणि बोरे वेगळे ठेवा. Makarsankrant special Mix bhaji स्टेप 2: कढईमध्ये ३ ते ४ चमचे तेल गरम करायचे तेल चांगले तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे घालून फोडणी द्या. स्टेप 3: आता त्यात किसलेले आले आणि लसूण पेस्ट घाला. मंद आचेवर परतत राहा. लसूण-आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परता. स्टेप 4: नंतर खोबऱ्याचे काप,थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले पांढरे तीळ एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे व कढईमधे आले लसूण परतून झाले कि त्यामध्ये टाकायचे व सर्व साहित्य हलक्या आचेवर थोडावेळ परतून घ्या, त्यामुळे भाजीत छान चव येते. स्टेप 5: नंतर मध्यम आचेवर लाल तिखट,हळद गोडा मसाला आणि मीठ घालून सर्व मसाले नीट मिसळा.स्टेप 6: मसाले परतून झाले कि त्यामध्ये शिजवलेला ओला पावटा , हरभरे, वाटाण्याचे दाणे ,गाजर, वांगी आणि वालपापडी घाला. सर्व भाज्या मसाल्यात नीट मिसळा.स्टेप 7: आता ऊसाचे छोटे तुकडे आणि बोरे घाला. यामुळे भाजीत नैसर्गिक गोडसर चव येते.
स्टेप 8: आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून भाजी हलवा. भाजीला थोडासा घट्टसर रस राहील इतकेच पाणी घाला.
स्टेप 9:नंतर कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
स्टेप 10: शिजल्यानंतर झाकण उघडून भाजी एकदा नीट हलवा. सर्व भाज्या छान मऊ झालेल्या आणि मसाला नीट मुरलेला दिसेल.
स्टेप 11: गरमागरम भोगीची भाजी सर्व्ह करण्यास तयार आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा भोगीची भाजी – कृती