मसाले भात कसा बनवायचा? | सोपी, झटपट आणि चवदार रेसिपी| Masalebhat Recipe2025

मसाले भात कसा बनवायचा? | सोपी, झटपट आणि चवदार रेसिपी| Masalebhat Recipe

Masalebhat Recipeमसाले भात हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन मेन्यूतील एक खास पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी मसाले भात, जलेबी आणि मठ्ठा हा ठरलेलाच मेन्यू असायचा. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने, ताज्या मसाल्यांपासून मसाले भात बनवणार आहोत. या भाताचा सुगंध, रंग आणि चव अशी की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. चला तर मग सुरुवात करूया या स्वादिष्ट मसाले भाताची खास रेसिपी!

Masalebhat Recipeमसाले भात हा ताज्या भाज्या आणि घरच्या घरी भाजून केलेल्या सुगंधी मसाल्यांमुळे आणखीच चविष्ट बनतो. कोथिंबीर, धणे, लवंगा, दालचिनी, स्टार फुल यांसारखे मसाले हलके भाजून बनवला जाणारा ताजा मसाला या भाताला एक वेगळीच चव आणि अप्रतिम सुगंध देतो. सुरती कोलमच्या छोट्या दाण्यांमध्ये मिसळलेला हा मसाला, भाज्यांचा नैसर्गिक गोडवा, गोडा मसाल्याची चव आणि शेवटी घातलेले तूप — हे सर्व मिळून मसाले भाताला एकदम पारंपरिक, घरगुती आणि अस्सल महाराष्ट्रीयन स्वाद देतात.मसाले भात हे खरंच प्रत्येक घरात बनवला जाणारा आणि कधीही मन भरणारा पदार्थ आहे. वरून टाकलेले तूप, ताजी कोथिंबीर आणि खोबरं भाताच्या चवीला अजूनच उजाळा देते..

मसाले भात (Masalebhat Recipe)– साहित्य (Ingredients)

मसाले भात कसा बनवायचा? | सोपी, झटपट आणि चवदार रेसिपी| Masalebhat Recipe2025

ताज्या मसाल्यासाठी (Dry Masala)

  1. धणे — 1 चमचा
  2. स्टार फुल — 1
  3. लवंगा — 4-5
  4. दालचिनी — 1 लहान तुकडा

 भातासाठी (Main Masale Bhat Ingredients)Masalebhat Recipe

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मसाले भात कसा बनवायचा? | सोपी, झटपट आणि चवदार रेसिपी| Masalebhat Recipe

  1. तेल — 2 चमचा
  2. मोहरी — 1 चमचा
  3. जिरे — 1 चमचा
  4. तमालपत्र — 4-5
  5. कांदा — 1 मोठा (बारीक चिरलेला)
  6. किसलेले आले — 1 tbsp
  7. हिरवी मिरची — 1-2 तुकडे
  8. लाल तिखट — ½ tsp
  9. हळद — ¼ tsp
  10. गोडा मसाला — 1 tbsp
  11. फुलकोबी — 1 कप (मध्यम आकाराचे तुरे)
  12. बटाटा — 1 मध्यम (लहान तुकड्यांत)
  13. गाजर — थोडेसे (बारीक तुकडे)
  14. फरसबी / तोंडली (इच्छेनुसार)
  15. हरभरा /वाटाणा — ४ ते ५ चमचे
  16. टोमॅटो — 1 (बारीक चिरलेला)
  17. कच्चे शेंगदाणे — 1 चमचा
  18. सुरती कोलम तांदूळ/बासमती — २ कप (फक्त धुवून घ्यावा, भिजवू नये)
  19. पाणी — २¼ कप
  20. मीठ — चवीनुसार
  21. ताज्या मसाल्याचा खडा मसाला — ब्लेंड करून (जाडसर)
  22. तूप — 1 tbsp
  23. कोथिंबीर — सजावटीसाठी

    मसाले भात – कृती (Step-by-Step Method )Masalebhat Recipe

    मसाले भात कसा बनवायचा? | सोपी, झटपट आणि चवदार रेसिपी| Masalebhat Recipe

१) ताजा मसाला तयार करण्याची प्रक्रिया

सुरुवातीला मध्यम आचेवर एक पॅन गरम करा त्यात धणे, लवंगा, दालचिनी आणि स्टार अ‍ॅनिस घाला.हे मसाले 4–5 मिनिटे हलक्या आचेवर भाजून घ्या.मसाले जास्त भाजू नका; त्यामुळे कडूपणा येऊ शकतो.भाजलेला मसाला मिक्सरमध्ये जाडसर पावडर (खडा मसाला) करून बाजूला ठेवा.

 अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

२) मसाल्याचा तडका आणि भाज्या परतणे

एका कढईत २ tbsp तेल गरम करा.त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या.मग जिरे आणि तमालपत्र घालून एकदा हलवा.आता बारीक चिरलेला कांदा घाला आणि 4–5 मिनिटे परतून घ्या.कांदा लाल होऊ देऊ नका, फक्त मऊ होईपर्यंत परता.त्यात आले, हिरवी मिरची घालून 1 मिनिट परता.
आता लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला घाला आणि एक मिनिट मसाला परता.

३) भाज्या परतणे आणि मिसळणे

Masalebhat Recipe

आता फुलकोबीचे तुरे आणि बटाट्याचे तुकडे कढईत घालून चांगले मिसळा.झाकण ठेवून 4–5 मिनिटे पाणी न घालता शिजू द्या.
नंतर झाकण काढून पुन्हा एकदा हलवा.
आता गाजर, शेंगा/तोंडली (इच्छेनुसार), हिरवे वाटाणे, टोमॅटो आणि कच्चे शेंगदाणे घाला.सर्व साहित्य एकत्र परतून मसाल्याचा सुगंध उठेपर्यंत 1–2 मिनिटे शिजवा.

४) तांदूळ आणि पाणी घालणे

आता 1 कप सुरती कोलम तांदूळ (फक्त धुतलेला, भिजवलेला नाही) कढईत घाला.सर्व मिश्रण चांगले हलवून मसाला तांदळाला नीट लागेल याची खात्री करा.त्यात 1¼ कप पाणी, मीठ आणि जाडसर वाटलेला ताजा मसाला घाला.आचेवर उच्च तापमानावर ठेवून भाताला उकळी येऊ द्या.आणि नंतर मंद आचेवर भटशिजू द्या. अशाप्रकारे आपला स्वादिष्ट मसालेभात तयार होतो

मसाले भात बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स

Masalebhat Recipe

मसाले भात अधिक चविष्ट बनवण्यासाठी काही गोष्टी विशेष लक्षात घ्याव्यात. सर्वप्रथम, मसाले भाताचा अस्सल सुगंध आणि चव ताज्या भाजून केलेल्या मसाल्यावर अवलंबून असतो. त्यामुळे मसाले हलक्या आचेवरच भाजा आणि जास्त भाजू नका, नाहीतर कडवटपणा येतो. सुरती कोलम तांदूळ वापरत असाल तर तो भिजवू नये; फक्त धुवूनच वापरा, कारण जास्त भिजवल्यास दाणे फुटतात आणि भात चिकट होऊ शकतो. भाज्या परतताना सुरुवातीला पाणी अजिबात घालू नका—त्यामुळे भाज्यांचा नैसर्गिक क्रंच आणि रंग कायम राहतो. पाणी घातल्यानंतर भाताला उकळी येऊ द्या आणि मगच झाकण ठेवा. शिजताना झाकण वारंवार उघडू नका, यामुळे वाफ निघून जाते आणि भात योग्यरीत्या फुलत नाही. शेवटी थोडेसे तूप घातल्याने भाताचे दाणे चमकदार दिसतात आणि चवही अप्रतिम लागते. वरून कोथिंबीर आणि नारळ घातल्याने मसाले भाताची चव आणि देखावा दोन्ही खुलून येतात.

Leave a Comment