Healthy & Quick Moong Dal Khichdi in 10 minutes| कमी वेळात झटपट मूग डाळ खिचडी
Moong Dal khichadi आज आपण बनवणार आहोत पचायला अगदी हलकी, सोपी आणि झटपट तयार होणारी मूग डाळ खिचडी. ही खिचडी रोजच्या जेवणात, उपवासानंतर किंवा आजारीपणात देण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. मूग डाळीचा मऊपणा, तुपाचा सुवास आणि भाज्यांची नैसर्गिक गोडी यामुळे ही खिचडी अगदी घरगुती, पौष्टिक आणि चविष्ट लागते. पटकन काहीतरी हेल्दी बनवायचं असेल तर ही खिचडी नक्की करून बघा.वेळ कमी असेल, लहान मुलांना भूक लागली असेल किंवा पटकन काहीतरी गरमागरम जेवण तयार करायचं असेल, तर ही खिचडी एकदम उत्तम पर्याय ठरते.Moong Dal khichadi
साहित्य (Ingredients) Moong Dal Khichdi
(४ ते ५ लोकांसाठी)Moong Dal khichad
- २ कप तांदूळ
- १ कप पिवळी मूग डाळ
- 1 मध्यम आकाराचा कांदा (चिरलेला)
- 1 टोमॅटो (चिरलेला)
- 1/4 कप गाजर (चिरलेले)
- 1/4 कप हिरवे वाटाणे
- 1 चमचा आले-लसूण पेस्ट
- 1 चमचा मोहरी
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा हळद
- 1 चमचा तेल
- 1 चमचा तूप
- मीठ चवीनुसार
- हिंग -चिमूटभर
- ५ ते ६ कप पाणी
- हिरवी कोथिंबीर (सजावटीसाठी)
- ओले खोबरे (आवडीनुसार)
कृती (Step-by-Step process) Moong Dal Khichdi
सर्वप्रथम तांदूळ आणि पिवळी मूग डाळ स्वच्छ धुऊन ५ मिनिटे भिजत ठेवा.कुकरमध्ये तेल गरम करा.त्यात मोहरी आणि जिरे घालून तडतडू द्या.नंतर चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता.आले-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता, सुगंध येऊ द्या.मग चिरलेला टोमॅटो, गाजर आणि वाटाणे घालून नीट मिक्स करा.हळद, चिमूटभर हिंग आणि मीठ घालून भाज्या 2–3 मिनिटे शिजू द्या.आता धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ कुकरमध्ये घाला.सर्व मिश्रण मंद आचेवर छान परतून घ्या .सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर ५ ते ६ कप पाणी घाला आणि नीट हलवा.एक उकळी आली कि कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या होऊ द्या.वाफ पूर्ण उतरल्यावर झाकण काढा 2 चमचे साजूक तूप घाला आणि खिचडी Moong Dal khichadi हलक्या हाताने ढवळा.वरून कोथिंबीर घाला आणि आवडीनुसार थोडासा ओल्या खोबऱ्याचा खिस पण घालू शकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
टिप्स (Tips) Moong Dal Khichdi
Healthy & Quick Moong Dal Khichdiin 10 minutes| कमी वेळात झटपट मूग डाळ खिचडी
- खिचडीला छान चव यावी म्हणून तूपाची फोडणी देणे उत्तम.
- खिचडी पातळ हवी असल्यास पाण्याचे प्रमाण ½–1 कपने वाढवा.
- अधिक पौष्टिक बनवायचे असल्यास गाजर, बटाटा, मटार, दुधी भोपळा अशा भाज्या घालू शकता.
- तांदूळ आणि डाळ १० ते १५ मिनिटे भिजवल्यास खिचडी फार छान मऊ होते.
- आजारी व्यक्तींसाठी करताना टोमॅटो व तिखट टाळून साधी खिचडी Moong Dal khichadi बनवा.
- चवीत वैविध्य आणण्यासाठी शिजल्यावर वरून थोडी काळी मिरी पावडर किंवा लिंबाचा रस घालू शकता.
- कुकरमध्ये शिट्ट्यांची संख्या कमी-जास्त करून खिचडीची टेक्स्चर नियंत्रित करता येते.
- खिचडी जाड झाली तर थोडे गरम पाणी घालून हलक्या हाताने ढवळा.
Moong Dal Khichdi How to serve
Moong Dal khichadiगरमागरम मूग डाळ खिचडी सर्व्ह करताना तिच्यावर तुपाची हलकी धार सोडली की चवीला अप्रतिम लागते. बाजूला पापड, लिंबाची फोड, किंवा लोणचे दिल्यास खिचडीची चव आणखी खुलते. काहीजण खिचडीसोबत दही, ताक किंवा काकडीचे रायते देणे पसंत करतात—जे पोटाला हलके आणि पचायला सोपे असते.Moong Dal khichad लहान मुलांसाठी खिचडी चांगली मऊ बनवून थोडेसे तूप आणि थोडा लिंबूरस घालून दिल्यास त्यांनाही ती खूप आवडते. संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी ही खिचडी गरम सूप किंवा कढीसोबतही अप्रतिम लागते.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
Moong Dal Khichdi
मूग डाळ Moong Dal khichadi खिचडी ही आपल्या रोजच्या आहारातील सर्वात पौष्टिक आणि पचायला सोपी डिश मानली जाते. मूग डाळ प्रोटीनने समृद्ध असल्यामुळे शरीराला ऊर्जा देते आणि स्नायू मजबूत ठेवते. तांदूळ आणि डाळ शरीराला आवश्यक असे सर्व अमिनो अॅसिड पुरवते, त्यामुळे ही डिश पूर्ण पोषणमूल्य असलेली होते. खिचडी हलकी असल्यामुळे पचनसंस्था कमजोर असल्यावर, आजारीपणातून उठल्यानंतर किंवा लहान मुलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातल्या भाज्या तुमच्या इम्युनिटीला सपोर्ट देतात आणि फायबर वाढवतात. तुपाची एक धार खिचडीला फक्त चवच नाही, तर पचनासाठी आणि शरीरातील पोषकद्रव्ये शोषण्यासाठीही मदत करते. त्यामुळे ही खिचडी चवदार, हेल्दी आणि सर्व वयोगटांसाठी परफेक्ट असा घरगुती आहार आहे.मूग डाळ खिचडी ही इतकी हलकी आणि पचायला सोपी आहे की ती दिवसातील कोणत्याही वेळी खाऊ शकतो. सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा रात्री हलकं जेवायचं असेल तेव्हाही ही खिचडी उत्तम पर्याय ठरते.Moong Dal khichad