१ किलो गाजराचा अचूक प्रमाणातील परफेक्ट हलवा|1kg perfect Gajar Halwa Recipe

१ किलो गाजराचा अचूक प्रमाणातील परफेक्ट हलवा|1kg Gajar Halwa Recipe

perfect gajar halwa recipe2025हिवाळा आला की गाजराचा हलवा नाही बनवला, असं होतच नाही! बाजारात ताजी, रसाळ गाजरे मुबलक प्रमाणात मिळत असतात आणि अशा वेळी घरगुती, खमंग, सुगंधी गाजराचा हलवा बनवण्याची मजाच काही वेगळी असते. (Gajar Halwa Recipe)आज आपण अगदी १ किलो गाजराच्या अचूक प्रमाणात, सोप्या पद्धतीने, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याने मस्त चमचमीत गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.गाजर, दूध, तूप आणि सुकामेवा यांच्या पोषणमूल्यांमुळे गाजराचा हलवा शरीराला ऊर्जा देणारा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि हाडे मजबूत करणारा पदार्थ ठरतो. गाजरात मुबलक प्रमाणात Vitamin A असते.योग्य प्रमाणात सेवन केल्यास हा हलवा आरोग्यासाठी संजीवनी ठरू शकतो.

हिवाळा आला की गाजराचा हलवा नाही बनवला, असं होतच नाही! बाजारात ताजी, रसाळ गाजरे मुबलक प्रमाणात मिळत असतात आणि अशा वेळी घरगुती, खमंग, सुगंधी गाजराचा हलवा बनवण्याची मजाच काही वेगळी असते. आज आपण अगदी १ किलो गाजराच्या अचूक प्रमाणात, सोप्या पद्धतीने, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याने मस्त चमचमीत गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.गाजर, दूध, तूप आणि सुकामेवा यांच्या पोषणमूल्यांमुळे गाजराचा हलवा शरीराला ऊर्जा देणारा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि हाडे मजबूत करणारा पदार्थ ठरतो. गाजरात मुबलक प्रमाणात Vitamin A असते.योग्य प्रमाणात सेवन केल्यास हा हलवा आरोग्यासाठी संजीवनी ठरू शकतो.

गाजर हलवा – साहित्य :perfect gajar halwa recipe2025

१ किलो गाजराचा अचूक प्रमाणातील परफेक्ट हलवा|1kg Gajar Halwa Recipe

  1. १ किलो गाजर

  2. २ टेबलस्पून साजूक तूप

  3. २५० मि.ली. दूध (पाव लिटर)

  4. २५० ग्रॅम साखर (पाव किलो)

  5. २ टेबलस्पून काजू – तुकडे

  6. २ टेबलस्पून बदाम – तुकडे

  7. १ टेबलस्पून अक्रोड (वॉलनट) – तुकडे (ऐच्छिक)

  8. ½ टीस्पून वेलची पूड

कृती :(step by step process Gajar Halva)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

perfect gajar halwa recipe2025
perfect gajar halwa recipe2025
perfect gajar halwa recipe2025
perfect gajar halwa recipe2025

perfect gajar halwa recipe2025

1) सर्वप्रथम १ किलो गाजर घ्यायची . गाजरे भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर त्याचा वरचा आणि खालचा कठीण भाग नीट काढून टाकावा. गाजर सोलून घ्यावीत. आता ही गाजरे किसायची आहेत. हाताने किसणीने किसता येतात, पण त्याला वेळ आणि मेहनत जास्त लागते. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये फटाफट गाजरे किसता येतात. प्रोसेसर नसेल तर गाजर छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात फिरवूनही किस तयार करता येतो.

2) आता कढईत २ टेबलस्पून साजूक तूप गरम करा. तूप गरम झाले की त्यात काजू, बदाम आणि अक्रोड असे सुका मेव्याचे तुकडे घालून हलकासा परतून घ्या. सुका मेवा छान परतून झाला की त्यात किसलेली गाजरे घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि झाकण न ठेवता साधारण १० मिनिटे गाजरे परतत रहा. या प्रक्रियेमुळे गाजराला तुपाचा सुंदर स्वाद येतो आणि हलव्याची चव अप्रतिम लागते. या वेळेत गाजरातून थोडे पाणीही सुटायला सुरुवात होते.

3) १० मिनिटांनंतर आता त्यात पाव लिटर (२५० मि.ली.) दूध घाला. दूध घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि पुढील १० मिनिटे मंद आचेवर गाजर दूधात छान शिजू द्या. अधून-मधून हलवा करपणार नाही यासाठी एकदा दोनदा हलवून घ्या. या टप्प्यावर दूध पूर्णपणे गाजरात मुरते आणि हलव्याला मस्त क्रीमीपणा येतो.

4) आता या शिजलेल्या गाजरात पाव किलो (२५० ग्रॅम) साखर घाला. एक किलो गाजराला ही साखर अगदी अचूक प्रमाणात पुरेशी ठरते. गाजरात आधीच नैसर्गिक गोडवा असल्यामुळे जास्त साखर घातल्यास हलवा खूप गोड होऊ शकतो. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी वाढवू शकता. साखर घातल्यानंतर पुन्हा झाकण न ठेवता १० मिनिटे हलवा शिजवून घ्या. या वेळी हलव्याचा रंग पुन्हा छान केशरी खुलतो.

5)साखर पूर्ण मुरली, हलवा घट्ट झाला की गॅस बंद करा आणि शेवटी त्यात वेलची पूड घाला. सुगंधी, चमचमीत, मऊसूत असा घरगुती गाजराचा हलवा तयार!(Gajar Halwa Recipe)

6) गाजर हलवा फ्रिजमध्ये ठेवल्यास सहज ८–१० दिवस टिकतो, तर रूम टेम्परेचरला ३–४ दिवस टिकतो. पण गाजर हलवा एवढा सुंदर दिसतो की तो जास्त दिवस टिकेल असं कधी होतंच नाही!

7)गाजराचा हलवा योग्य प्रमाणात खाल्ल्यास तो डोळे, पचन, ऊर्जा, प्रतिकारशक्ती आणि हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.

 अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

गाजर हलवा परफेक्ट होण्यासाठी खास टिप्स:perfect gajar halwa recipe2025

१ किलो गाजराचा अचूक प्रमाणातील परफेक्ट हलवा|1kg Gajar Halwa Recipe

  1. ताजी, रसाळ गाजरे वापरा – जुनी, कोरडी गाजरे वापरल्यास हलवा कोरडा होतो.

  2. गाजरे बारीक किसा – बारीक किसलेली गाजरे लवकर शिजतात आणि हलवा मऊसूत बनतो.

  3. तूप कमी-जास्त करू नका – तुपामुळे हलव्याला चव, चमक आणि सुगंध येतो.

  4. गाजरे आधी कोरडीच परतून घ्या – दूध लगेच घातल्यास हलवा कच्चा स्वाद देतो.

  5. दूध फुलफॅट वापरा – हलव्याला मस्त क्रीमी टेक्सचर मिळते.

  6. साखर शेवटीच घाला – साखर आधी घातल्यास गाजरे नीट शिजत नाहीत.

  7. साखरेनंतर सतत हलवत रहा – नाहीतर हलवा तळाला लागण्याची शक्यता असते.

  8. वेलची पूड शेवटीच घाला – सुगंध टिकून राहतो.

  9. खूप घट्ट करू नका – थंड झाल्यावर हलवा आपोआप घट्ट होतो.

  10. स्टोरेज टिप – फ्रिजमध्ये ठेवल्यास ८–१० दिवस आणि बाहेर ३–४ दिवस टिकतो.

Leave a Comment