Rawa appe Recipe|10 मिनिटांत तयार होणारे झटपट रवा आप्पे
आज आपण पाहणार आहोत झटपट रवा अप्पे कसे बनवायचे. ही रेसिपी अगदी सोपी, पटकन होणारी आणि चवीलाही मस्त आहे. सकाळचा नाश्ता, मुलांचे टिफिन किंवा संध्याकाळचा हलका फराळ – सगळ्यासाठीच रवा अप्पे ही परफेक्ट रेसिपी आहे.ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना झटपट, सोपी आणि चविष्ट डिश हवी असते. (instant rawa appe recipe)रवा, दही आणि थोड्याशा भाज्यांचा वापर करून हे अप्पे अगदी हलके, पोटाला झटपट पचणारे आणि खूपच टेस्टी बनतात. यात कांदा, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, आले यांचा खमंग तडका लागल्यामुळे अप्प्यांना खास स्ट्रीट-स्टाईल स्वाद मिळतो. कमी तेलात होणारी ही रेसिपी आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम असून मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
रवा अप्पे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients):
Rawa appe Recipe|10 मिनिटांत तयार होणारे झटपट रवा आप्पे
- तेल – आवश्यकतेनुसार
- मोहरी – ½ टीस्पून
- जिरे – ½ टीस्पून
- कांदा (बारीक चिरलेला) – 1 कप
- ढोबळी मिरची (बारीक चिरलेली) – 1 टेबलस्पून
- हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – 1 टीस्पून
- गाजर (किसलेले – ऐच्छिक) – 2 टेबलस्पून
- कोंथिबीर -आवडीनुसार
- रवा – २ कप
- दही – ½ कप
- मीठ – चवीनुसार
- पाणी – १ ते २ कप (गरजेनुसार)
- इनो फ्रूट सॉल्ट – 1 टीस्पून
कृती:(instant rawa appe recipe)

1)सुरुवातीला कढईमध्ये २ टीस्पून तेल गरम करा. त्यात ½ टीस्पून मोहरी घालून ती फुलू द्या. मोहरी छान तडतडली की त्यात ½ टीस्पून जिरे घाला. आता त्यात १ कप बारीक चिरलेला कांदा घालून तो फक्त ३–४ मिनिटे परतून घ्या. कांदा जास्त लालसर किंवा तपकिरी करायचा नाही, फक्त हलका सोनेरी रंग आला पाहिजे.किंवा आवडीनुसार कांदा नाही परतला तरी चालतो .
2)यानंतर १ टेबलस्पून बारीक चिरलेली ढोबळी मिरची, १ टीस्पून हिरवी मिरची घाला . सगळं मिश्रण साधारण २ मिनिटे परता. अधिक रंग आणि पौष्टिकतेसाठी तुम्ही किसलेले गाजर किंवा वेगवेगळ्या रंगांची ढोबळी मिरची देखील घालू शकता. भाजी छान परतून झाली की गॅस बंद करून बाजूला ठेवा.
3)आता अप्प्याचे पीठ तयार करूया. एका भांड्यात १ कप रवा घ्या (हा न भाजलेला घेऊ शकतो,किंवा मग हवा असल्यास हलका भाजूनही घेऊ शकता). त्यात ½ कप दही आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिसळा. नंतर त्यात १ ते १¼ कप पाणी हळूहळू घालत पीठ सैलसर भिजवा. पाण्याचे प्रमाण दह्याच्या घट्टपणावर अवलंबून असते. इथे आपण अगदी १ कप पाणी वापरनार आहोत . आता त्यात तयार केलेली परतलेली भाजी घालून पुन्हा नीट मिसळा. हे मिश्रण झाकण ठेवून २० ते ३० मिनिटे विश्रांतीसाठी ठेवा.(instant rawa appe recipe)
4)अप्पे करण्याआधी अगदी शेवटी त्यात १ टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट आणि आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबिर घाला. हलक्या हाताने मिसळा. आता अप्पेपात्र मध्यम आचेवर गरम करा. प्रत्येक साच्यात थोडेसे तेल घाला आणि त्यात पळीने मावेल असे पीठ ओता. कडेला थोडेसे तेल सोडले की अप्पे अधिक छान कुरकुरीत होतात. थोड्या वेळाने चाकू किंवा चमच्याने हलक्या हाताने अप्पे उलटवा आणि दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी होईपर्यंत भाजा.
5)दोन्ही बाजूंनी छान भाजलेले, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे रवा अप्पे तयार होतात ! असेच सगळे अप्पे बनवून घ्या. अशाप्रकारे आपले सुंदर रंगाचे आणि चवदार अप्पे तयार होतात.
6)हे अप्पे नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत फारच छान लागतात.(instant rawa appe recipe)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
रवा अप्पे बनवताना लक्षात ठेवण्याच्या टिप्स:
-
रवा भाजलेला नसेल तरी चालतो, पण हवे असल्यास हलक्या आचेवर थोडा खरपूस भाजून घेतला तर अप्प्यांना अधिक छान चव येते.
-
दह्याचा आंबटपणा जास्त नसावा, फार आंबट दही वापरल्यास अप्प्यांची चव बिघडू शकते.
-
पिठाची घट्टपणा योग्य ठेवा – पीठ फार घट्ट असेल तर अप्पे आतून कच्चे राहतात आणि फार पातळ असेल तर आकार नीट धरत नाही.(instant rawa appe recipe)
-
इनॉ (Eno) शेवटीच घाला आणि लगेच अप्पे घाला, नाहीतर अप्पे नरम पडतात.
-
अप्पेपात्र मध्यम आचेवरच गरम करा, फार जास्त आचेवर केले तर अप्पे वरून पटकन भाजतात पण आतून कच्चे राहतात.
-
प्रत्येक साच्यात थोडेसेच तेल वापरा, जास्त तेल घातले तर अप्पे तेलकट होतात.
-
अप्पे उलटताना घाई करू नका, एक बाजू नीट भाजली कीच उलटा, म्हणजे रंग सुंदर येतो.
-
चव आणि रंगासाठी तुम्ही गाजर, स्वीट कॉर्न, बीट, कोबी, वेगवेगळ्या रंगांची ढोबळी मिरची वापरू शकता.
-
लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमी करा किंवा टाळा.
-
उरलेले अप्पे दुसऱ्या दिवशी गरम करताना पॅनवर थोडंसं पाणी शिंपडून झाकण ठेवून गरम केले, तरी ते छान मऊ राहतात.(instant rawa appe recipe)
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा